सेवा - एक आंदोलन

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
16 Mar 2012 - 12:02 pm

समाज सेवेशी माझा सर्वप्रथम परिचय इशान्य भारतात झाला तो २००८ मध्ये.. तेथे, गेल्या ६० वर्षापासुन सेवा भारती, विद्या भारती, कल्याणाश्रम, विवेकानंद केन्द्र, रामकृष्ण मिशन या संस्थांद्वारे होत असलेले कार्य बघुन मी खुपच प्रभावित झालो. आपला देखील यात खारीचा वाटा असावा या हेतुने मग मी होइल तसे तिकडे जात राहीलो अर्थात ते देखील निवृत्तीनंतर. नोकरीत असतांना कामातुन वर मान करायला देखील उसंत नव्ह्ती.

गोहाटी ला ,समाज सेवे चे कार्य कसे सुरु करावे यावर सेवा विभागाने काढलेली एक छोटी पुस्तिका माझ्या वाचनात आली त्यातील काही माहिती मी आपणासोबत शेअर करीत आहे. आपल्या छोट्या विश्वात आठवड्या पंधरवाड्यात किंवा महिन्यातुन एकदा आपण वेळात वेळ काढुन खालील पैकी एखादे तरी सेवा कार्य करु शकतो का? प्रत्येकाचे मनात आपण काही तरी करावे असे असते पण संसाराच्या गराड्यात ते जमत नाही त्यांच्या साठी सुचविलेले काही मार्ग. बघा जमते का.

आपल्या घरातील सर्व सदस्य हे सेवा भावी विचारांचे व्हावे या साठी खालील गोष्टी अमलात आणण्याचा प्रयत्न करा:-
१) आपल्या घरासमोर मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय करा. गाय कुत्रा इत्यादी पाळीव प्राण्यांना आपल्या हाताने खाउ घाला. रोज गोग्रास ठेवा.
२) पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीत किंवा टेरेस वर अन्न व पाणी ठेवा.
३) झाडांच्या रोपांना रोज पाणी देण्याची व्यवस्था करा.
४) जेवण झाल्यानंतर उरलेले अन्न कचरा कुंडीत किंवा भांडे घासतेवेळी नालीत फेकु नका. ते जनावरांना खाउ घाला किंवा खत व तत्सम कार्यासाठी उपयोगात आणा.
५) मुलांमध्ये लहानपणापासुन दुसर्‍यांसाठी त्याग करण्याची भावना निर्माण व्हावी यासाठी मंदिरातील दान पेटीत त्यांच्या हातुन पैसे टाका. भिक्षुकाला त्यांच्या हातुन पैसे अथवा धान्य दान करा. त्यांच्या मित्रांना मदत करण्याबद्दल त्यांना प्रोत्साहीत करा.
६) घरात सेवेच्या घटनांचे/ बातमीचे सामुहीक वाचन करा व त्यावर चर्चा करा.

दैनिक अथवा साप्ताहीक सेवा कार्य सुरु करण्यासाठी सोयीनुसार व वेळेनुसार खालील कार्यक्रम राबवता येतात.

१. मंदिर स्वच्छता.
२. संस्कार वर्ग
३. घरकाम करणार्‍या बायांसाठी व त्यांच्या मुलांना शिकवणे. त्यांना गोष्टी सांगणे, नि:शुल्क अभ्यास वर्ग, गीता पठण, धार्मिक श्लोक,(रामरक्षा, हनुमान चालीसा, गणपति अथर्वशिर्ष इत्यादि.)
४.प्रौढ साक्षरता वर्ग
५.भजन बैठक
६. रक्तदान शिबीरात सहभाग
७. महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, स्व सहायता समुह,
८. आपल्या सभोवताल्च्या वस्तीतील माहिती देणारे आपले घर असणे(Information Centre)
९. शेजारी आजारी असल्यास तर त्यास मदत करणे, दवाखान्यात भरती असल्यास त्यास सांन्त्वना देणे. त्याच्या डब्याची वगैरे व्यवस्था करणे. त्याच्या सोबत राहण्याची व्यवस्था करणे.
१० आपल्या घरी काम करणार्‍या बाया, भाजी विक्रेत्या, सलुन वाले, परिट व्यवसाय करणारे इत्यादींना निरक्षर असल्यास साक्षर करणे, त्यांच्या मुलांना अभ्यासात मदत करणे. त्यांच्याशी सौजन्याचा व्यवहार करणे, घरातील समारंभात त्यांना निमंत्रीत करणे त्यांच्या सुख दु:खात सहभागी होणे इत्यादी स्वभावीक व सहज व्यवहाराने समाजात सर्व वर्गात आत्मीयतेची भावना निर्माण होवुन सामाजिक स्वास्थ्य वृध्दींगत होण्यात मदत होते.

सर्वे भवन्तु सुखिन: - सर्वे सन्तु निरामय:

मांडणीविचार

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

16 Mar 2012 - 11:53 pm | मी-सौरभ

हे असे कार्य आपल्यातले बरेच जण अजाणता करतही असतील.
आणि जे करत नाहीत त्यांनी ही सुरवात करावी. :)

सर्वे भवन्तु सुखिन: - सर्वे सन्तु निरामय: :)

----------------