जगणे असेच का असते?
जगता जगता मरायचे असते.
जगण्याकरिता लढणे असेच का असते?
लढता लढता हरायचे असते.
जगण्यातले सुख असेच का असते?
सुखाचि वाट बघता बघता दु:ख भोगायचे असते.
जगण्यातली आशा अशीच का असते?
आशेवर जगताना निराश व्हायचे असते.
जगणे हे स्वप्नासारखे का असते ?
सत्यात येता येता मोडुन ते पडते.
खरच जगण हे एक कोड असते.
ऊत्तर सापडल अस वाटत असताना
नव कोड देउन ते शोधण्यात संपायचे असते.
प्रतिक्रिया
15 Mar 2012 - 9:59 pm | गणामास्तर
अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहे..;)
15 Mar 2012 - 10:02 pm | प्रचेतस
नको नको. आता तरी नको. ;)
16 Mar 2012 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा
प्र.का.टा.आ.
16 Mar 2012 - 1:20 am | जेनी...
छान
:D
16 Mar 2012 - 10:39 am | गवि
पूजाताई, धन्यवाद...
( नाही नाही.. मी "निश" नाही.. धन्यवाद हे निम्ननिर्दिष्ट कारणांसाठी:
१. स्वाक्षरीला शेपरेटर टाकल्याबद्दल.. हुश्श..
२. जीभ काढण्याच्या स्माईलीशिवाय प्रतिसाद लिहीण्याच्या नवीन पद्धतीबद्दल.. )
16 Mar 2012 - 9:14 pm | जेनी...
त्यासाठी आम्हिच तुम्हाला धन्यवाद म्हटल पाहिजे ,:)
बाकि अत्रुप्त आत्म्याची क्रुपा :P
:P
:P
:P
:D
16 Mar 2012 - 11:21 pm | अत्रुप्त आत्मा
बाकि अत्रुप्त आत्म्याची क्रुपा >>> सगळ्या स्मायल्यांसह वाक्याला धन्यवाद ;-)
(स्मायल्या अवडणारा)
अ-त्रुप्त आत्मा ;-)
16 Mar 2012 - 8:37 am | पक पक पक
वाहताना सुद्धा कुठे कसलाच, अडथळा मिळत नाही,
अहो हे असे नसते :bigsmile: :bigsmile:
बद्ध कोष्ठी दगड गोटे
वाहात जाती पाण्या वाटे... ;)
16 Mar 2012 - 8:49 am | जेनी...
कैच्या कैच ..
ती एक चारोळी आहे ,उगा तिची वाट लावु नगा
|( \( :angry:
17 Mar 2012 - 6:27 pm | चौकटराजा
निश, या सगळ्या चढ उतारात तर जीवनाची मजा आहे.
नसते दु:ख या जगी, सुखाला कोणी असते विचारले ?
नसते मूर्ख या जगी, शहाण्याला कोणी असते विचारले?
नसते दु:शासन या जगी, कृष्णा कोणी असते पुकारले ?
नसते कुरूप या जगी, सुंदरीस कोणी असते निरखिले ?
कविता मस्त जमली आहे.
19 Mar 2012 - 12:44 pm | निश
चौकटराजा साहेब, प्रोत्साहना करिता धन्यवाद.
पण खर सांगु साहेब तुम्हि वर केलेली कविता निव्वळ लाजवाब.