चुकवू नये अशी - कहानी

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
13 Mar 2012 - 11:46 am

नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर एका दमट दुपारी ती दारातून बाहेर पडते - विद्या वेंकटेशन-बाग्ची; सहा-सात महिन्यांची पोटुशी, चालताना दम लागणारी. टॅक्सीचालकांचा गराडा तिच्याभोवती पडतो. त्यातला एक जण चलाखीने तिच्या बॅगचा ताबा घेतो आणि तिला आपल्या टॅक्सीत बसवतो. बहुतेक लोक घराचा किंवा हॉटेलचा पत्ता सांगतात, पण चालकाला आश्चर्य वाटते कारण तिला जायचं असतं कालीघाट पोलीसचौकीत.
पोलीसचौकीत ती तक्रार नोंदवते. तिचा नवरा - अर्णब बाग्ची - लंडनहून दोन महिन्यांपुर्वी नॅशनल डेटा सेंटरमध्ये असाईंनमेंटवर आलेला असताना अचानक गायब झालेला आहे; तिच्याकडे त्यांच्या लग्नात काढलेला त्याचा एकमेव फोटो आहे. त्याला फोटो काढणे आवडत नाही असं ती सांगते. कोलकोत्यात तो राहात असलेल्या गेस्टहाऊसचा पत्ताही तिच्याकडे आहे. नवरा हरवल्याने ती रडकुंडीला आली असली तरी ती एक सुशिक्षित आणि आत्मविश्वास असलेली स्त्री आहे.
चौकीत एक नवा पोलीस वारंवार एरर मेसेज देणार्‍या कॉम्प्युटरशी झटापट करतोय. 'बिद्दा' बाग्ची स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याने इंन्स्पेक्टरच्या विनंतीवरून झटकन दुरुस्ती करते. FIRवर सही करायला म्हणून खुर्चीतून उठताना मात्र तिला अचानक चक्कर येते. तिची अवस्था पाहून इन्स्पेक्टर त्या नवोदिताला - सात्योकी सिन्हा ऊर्फ राणाला - तिला सोडून यायला सांगतो.
अर्णब बाग्चीने तो जिथे राहतोय असं सांगितलेलं असतं ते गेस्टहाऊस. एकदम बकाल. एका अरुंद गल्लीच्या शेवटी असलेलं. गेस्टहाऊसचा मालक म्हणतो अर्णब बाग्ची नावाचा माणूस कधी तिथे राहिलाच नाही. विद्या मात्र नवर्‍याने सांगितलेल्या गेस्टहाऊसच्या आतल्या खाणाखुणा बरोबर सांगते. अर्णब बाग्ची तिथे राहायला नव्हता यावर व्यवस्थापक ठाम .सगळेच गोंधळलेले. विद्या आपल्या नवर्‍याच्याच खोलीत म्हणजे रूम नंबर १५ मध्ये राहायचा निर्णय घेते.
दुसर्‍या दिवशी विद्या नॅशनल डेटा सेंटरमध्ये जाऊन तिथल्या एचआर मॅनेजरला - अ‍ॅग्नेस डिमेलोला - भेटते. अर्णब बाग्ची नावाचा कोणीही इसम तिथे कामाला नव्हता हे सांगून अ‍ॅग्नेस विद्याला धक्का देते. विद्या तिला परोपरीने सांगायचा प्रयत्न करते. अ‍ॅग्नेस ठाम. विद्या तिला फोटो दाखवते. तरीही अ‍ॅग्नेस आपल्या म्हणण्यावर ठाम. विद्या निराशेने तिथून बाहेर पडते. राणा तिला भेटून सांगतो की त्यांनी तिने सांगितलेल्या तारखांचे सगळे इमिग्रेशन रेकॉर्डस तपासले पण अर्णब बाग्ची नावाचा कोणीही माणूस त्या दिवशी इंग्लंडहून निघाला नाही आणि भारतातही आला नाही. अर्णब बाग्ची नावाचा माणूस मुळात अस्तित्वात आहे की नाही इथवर शंका व्यक्त केली जाते.
ती राणाला घेऊन अर्णब ज्या गावात शिकला त्या ठाकूरपुकुरलाही घेऊन जाते. तिथल्या शाळेतही अर्णब बाग्ची नावाचा कोणीही विद्यार्थी सापडत नाही. त्याच्या काकांच्या पत्यावर राहणार्‍या जोडप्याने अर्णब बाग्ची हे नाव ऐकलेलेच नसते.
पुढे काय होते? विद्याला तिचा नवरा मिळतो का? अर्णब बाग्ची अस्तित्वातच असतो की नाही? ती एकटी या सगळ्याला कशी तोंड देते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही 'कहानी' प्रत्यक्ष पडद्यावर पाहून मिळवणे हेच श्रेयस्कर.
सुजोय घोष आणि कुशल गाडा यांनी निर्मिलेला आणि सुजोय घोष यांनी दिग्दर्शित केलेला कहानी हा चित्रपट दोन-अडीच तास प्रेक्षकाला खुर्चीत खिळवून ठेवतो आणि संपल्यावरही तास-दोन तास त्याबद्दल विचार करण्यास भाग पाडतो.
कथा, पटकथा, छायाचित्रण आणि दिग्दर्शन या सर्वच बाबतीत चित्रपट अत्यंत उच्च दर्जा गाठतो आणि एक सुंदर चित्रपट पाहिल्याचे सुख नक्कीच मिळवून देतो.
कोणत्याही प्रकारचा भडक हिंसाचार, हायटेक गॅजेट्स, गाड्यांचा पाठलाग किंवा गाड्या स्फोटाने उडणे वगैरे सवंग प्रकार नसूनही आणि संपूर्ण भारतीय वातावरणातला असूनही 'थ्रिल' म्हणजे काय याचे प्रत्यंतर हा चित्रपट देतो.
कोलकोता शहरातली गर्दी, दुर्गापूजेचा माहौल आणि एकंदरीतच बंगाली संस्कृती याचा खुबीने वापर करून पटकथाकार, छायाचित्रकार आणि दिग्दर्शकाने या चित्रपटात अप्रतिम रंग भरले आहेत.
चित्रपटाची पात्रनिवडही अगदी चपखल आहे. विद्या बालन सोडल्यास कोणीही खूप प्रसिद्ध म्हणता येईल असा कलाकार नाही पण सगळ्यांनी आपापली कामे चोख केली आहेत. विद्या बागचीचे मध्यवर्ती पात्र अर्थातच विद्या बालनने निभावले आहे आणि ती विद्या बालन आहे हे प्रेक्षक विसरून जाईल इतक्या सहजतेने आणि चपखलपणे तिने अभिनय केला आहे. चित्रपटाच्या उत्कर्षबिंदूला बदलणारे स्वरुपही तिने उत्कृष्टपणे आणि विश्वसनीयरीत्या दाखवले आहे.
अर्थात हा चित्रपट विद्या बालनचा म्हणून ओळखला गेला तरी पटकथा आणि दिग्दर्शनाचा हात त्यात नक्कीच जास्त आहे.
बॉलीवूडमध्ये बनलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या उत्कृष्ट थ्रिलर्समध्ये कहानीचा समावेश केला जाईल हे नक्की.

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

13 Mar 2012 - 11:52 am | रणजित चितळे

मी पण एवढ्यात पाहिला. आवडला.

आपले परीक्षण आवडले.

टागोरांचे एकला चलोरे जे अमिताभने म्हटले आहे ते पिक्चरच्या मध्ये असते तर जास्ती आनंद घेतला गेला असता. शेवटी क्रेडीट्स बरोबर येते तेव्हा लोकांना आपल्या पार्किंग केलेल्या गाड्यांबद्दल जास्ती काळजी असते व ते ह्या टागोरांच्या कवितेचा आस्वाद घेऊ शकत नाहित त्याचे वाईट वाटते

सुहास झेले's picture

13 Mar 2012 - 12:01 pm | सुहास झेले

बघायचा आहेच... परीक्षण वाचून उत्सुकता वाढलीय. :) :)

स्पा's picture

13 Mar 2012 - 12:06 pm | स्पा

झकास परीक्षण

पाहिला नाहीये.. पण त्यात म्हणे ती पोटुशी नसतेच :P

तर्री's picture

13 Mar 2012 - 12:12 pm | तर्री

पहावा म्हणतो.

पाहायचा आहे, ह्यालाच समांतर विषयावरचा मॅरीड टु अमेरिका सुद्धा येउ घातलाय म्हणे ना, अर्चना जोगळेकरांचा.

मस्त परीक्षण...

बाकी..

अर्णब बाग्ची अस्तित्वातच असतो की नाही?

या एका सूचक वाक्याने एकदम वेगळेच तर्क सुरु झाले..

अन्य वाचकांना विनंती : कृपया शक्यतो कोणीही इथे स्पॉईलर्स टाकू नयेत :(

बघायचा होताच.
बाकी विद्याच्या अभिनयाबद्दल बोलायच तर ती समकालिन पुरुष अभिनेत्यांच्याही (हिरोंच्या नव्हे.) दोन पावलं पुढे आहे. पुरुष प्रधान चित्रपटांच्या काळात खास तिच्यासाठी चित्रपट लिहिले आणि बनवले जातात आणि ती ते यशस्वी करुन दाखवते यातच तिच यश सामावलेल आहे.

रणजित चितळे's picture

13 Mar 2012 - 2:18 pm | रणजित चितळे

स्मिता पाटीलचा भास होतो विद्या बालन चे अभिनय बघून

गणेशा's picture

13 Mar 2012 - 7:16 pm | गणेशा

परिक्षणा मुळे उत्सुकता वाढली.
एकंदरीत प्रमोज वरुन मला तरी पिक्चर साफ आपटेल असेच वाटले होते.

नक्कीच पहावा लागेल आता.

पैसा's picture

13 Mar 2012 - 8:18 pm | पैसा

बघायच्या यादीत घातला!

स्वाती दिनेश's picture

14 Mar 2012 - 1:28 pm | स्वाती दिनेश

छान परीक्षण, बघायच्या यादीत घातला!

असेच म्हणते,
स्वाती

छान परिक्षण.
बघायलाच हवा हा शिनुमा.

चेतनकुलकर्णी_85's picture

13 Mar 2012 - 8:34 pm | चेतनकुलकर्णी_85

बघत बसलोय... :bigsmile:

आवडलेला दिसत नाहीये.
नाही बघता बघता मध्येच येउन प्रतिसाद दिलात तो.

पक पक पक's picture

14 Mar 2012 - 4:28 pm | पक पक पक

पॉपकॉर्न संपले असतिल..... ;)

वासरात लंगडी गाय शहाणी ह्या न्यायाने सिनेमा चांगला आहे म्हणायला हरकत नाही. चित्रीकरण छान जमलंय, परंतू शेवट बघून चिडचिड होऊ शकते, त्यासाठी तयार रहा.
सर्वात जास्तं आवडलं कोलकाता शहराचं दर्शन (म्हणजे रियालिस्टीक वाटलं), आणि बॅकग्राउंडमध्ये आलेली आरडींची गाणी!

वासरात लंगडी गाय शहाणी ह्या न्यायाने सिनेमा चांगला आहे

का ब्वॉ? आणि शेवट बघून चिडचिड का होते?
अतिशय समर्थपणे पेललेला शेवट आहे.

- ('कहानी' जस्ट बघून आलेला) सोकाजी

प्राजु's picture

13 Mar 2012 - 8:52 pm | प्राजु

अरे वाह! नक्कीच बघेन.

नक्की बघायला पाहिजे..

- पिंगू

मन१'s picture

13 Mar 2012 - 11:10 pm | मन१

चित्रपट भयंकर आवडला आहे.

यकु's picture

13 Mar 2012 - 11:24 pm | यकु

विद्या बालनला (किंवा कुणालाही) प्रेग्नंट बाई म्हणून रस्त्यानं बोंबलत फिरवणारा आणि शुटींग घेणारा कोण तो चांडाळ?
कशाला 'बेट' करावं याचे काहीही नियम असू नयेत वाटते.
आणि लोकही एवढ्या चवीचवीनं आवडल्याचं सांगत आहेत, वरुन पुन्हा 'अरे, ते फक्त मनोरंजन, कल्पनारंजन आहे' हेही म्हणायला मोकळे.
या असल्या भुक्कड कल्पनेनं मनोरंजन करुन घेण्यापेक्षा ते मन भ्रष्ट करुन टाकण्यास जास्त पसंती दिली जाईल अर्थात पिक्चर चुकूनही पाहिला जाणार नाही.
पूर्वी बलात्काराचे सीन मुद्दाम लांबवले जायचे, आता प्रेग्नंट बाया - उद्या गँग बँगमध्ये सापडलेल्या बाईची कथा, परवा अजुन काही.
लोक मानसिक रूग्ण आहेत की हळूहळू मीच शुध्द हरवतोय हे एकदा कुणीतरी सांगा.

परिक्षणाबद्दल मात्र धन्यवाद.

चेतनकुलकर्णी_85's picture

13 Mar 2012 - 11:36 pm | चेतनकुलकर्णी_85

बंडल आहे पिच्चर..
बघायचाच असेल त्यांनी जाला वरून पाहावा..

तुम्ही सर्व सिनेमे जालावरच बघता का...?

तुमच्या मते बंडल असेलही, पण कसा हे जरा स्पष्ट केलेत तर वाचायला आणि कळायला मदत होइल असे नाही तुम्हाला वाटत ?

- ( बंडल नाही असे मत असलेला) सोकाजी

रणजित चितळे's picture

15 Mar 2012 - 9:16 am | रणजित चितळे

असे गलिच्छ काय आहे त्या सिनेमात कळले नाही. मन भ्रष्ट होईल असेही काही नाही त्याच्यात. एक चांगली मिस्ट्री थ्रिलर आहे झाले. मिस्ट्री थ्रिलर सरळ सात्विक जिवनात होऊ शकत नाहीत. सरळ सात्विक जिवन स्वतःसाठी छान असते पण दुस-यांसाठी रटाळ होऊ शकते - त्यावर पिक्चर तर मुळीच होऊ शकणार नाही.

असे गलिच्छ काय आहे त्या सिनेमात कळले नाही. मन भ्रष्ट होईल असेही काही नाही त्याच्यात. एक चांगली मिस्ट्री थ्रिलर आहे झाले. मिस्ट्री थ्रिलर सरळ सात्विक जिवनात होऊ शकत नाहीत. सरळ सात्विक जिवन स्वतःसाठी छान असते पण दुस-यांसाठी रटाळ होऊ शकते - त्यावर पिक्चर तर मुळीच होऊ शकणार नाही.

पोट आलेली बाई (सो क्रूड वर्ड! पण तरीही 'प्रेग्नंट' शब्द वापरणार नाही) सिनेमाभर अवघडत नवर्‍याला शोधत फिरवली जाते आहे .. ही कल्पना आहे नाही का? ..
मला ती कल्पना म्हणूनही भुक्कड वाटते.. तिच्या प्रेग्नंन्सीमध्ये (किंवा त्या अवघडलेल्या पोटामध्येच) थ्रील किंवा क्लायमॅक्स असेल तर गोष्ट वेगळी होती..
मुळात विद्या बालनची पोस्टर्स पाहूनच नको वाटलं.

पण ननिंचं हे परिक्षण, सोकाजींच्या ब्लॉगवरचं आजचं परिक्षण, आणि सगळ्यांची वाहवाही पाहून मन बदलतं आहे.

मी सात्विक नाही.

खरंतर चित्रपट बघताना विद्या गरोदर नसती दाखवली असती तरी चालले असते असे वाटत होते. तसे का दाखवले आहे असा विचार करत असतानाच चित्रपटातले एक पात्र त्याचा खुलासा करते. अतिशय 'लॉजीकल रिजनींग' आहे त्या मागे. चित्रपट बघितल्यावर ते कळेलच ;)

- (विद्यामय) सोकाजी

पिलीयन रायडर's picture

16 Mar 2012 - 12:15 pm | पिलीयन रायडर

पोट आलेली बाई (सो क्रूड वर्ड! पण तरीही 'प्रेग्नंट' शब्द वापरणार नाही) सिनेमाभर अवघडत नवर्‍याला शोधत फिरवली जाते आहे .. ही कल्पना आहे नाही का? ..
मला ती कल्पना म्हणूनही भुक्कड वाटते.. तिच्या प्रेग्नंन्सीमध्ये (किंवा त्या अवघडलेल्या पोटामध्येच) थ्रील किंवा क्लायमॅक्स असेल तर गोष्ट वेगळी होती..

कळालं नाही बुवा... म्हणजे गरोदर बाइ नवर्‍याला शोधतेय ह्यात गैर, भुक्कड इ. इ. काय आहे नक्की?
तुम्ही बहुदा हे लिहिताना बघितला नसावा चित्रपट, कारण त्या शिवाय असं बोलला नसतात.. जे दाखवलय त्यला व्यवस्थित कारण पण दिलय...

पण तसंही मला त्यात गैर असं काही वाटलं नाही...

यकु's picture

16 Mar 2012 - 12:33 pm | यकु

कळालं नाही?
मग सांगू म्हणता?
ऐका-
मला फक्त त्या पिक्चरच्या पोस्टर्सवर, प्रोमो मध्ये त्या गर्भ असलेल्या पोटाचं केलेलं प्रदर्शन आवडलेलं नाही. आणि ती बाई ते पोट घेऊन का भणभण फिरतेय ती उत्सुकता शमवायला मी जाणार नाही असं म्हणालो कारण तो डायरेक्टरने केलेला भुक्कडपणा आहे. उत्सुकता निर्माणच होत नाही, मग पहायला जाण्याचा प्रश्न कुठे? ते पोट म्हणजे शिकार (अर्थात तिकिटं काढून जाणारे लोक, विशेषतः प्रेग्नंसीशी संबंधीत इमोशनल कंटेट्ला रिलेट होऊन विद्याला पहायला जाणारं सर्वलिंगी पब्लिक ) गटवण्यासाठी बकरी जंगलात बांधली जाते तसं ते मला वाटलं.

माझा मुद्दा फार छोटासा आहे, आणि तो याच्यापेक्षा जास्त एक्स्प्लेन करता येणार नाही, त्यामुळं इत्यलम्.

पिलीयन रायडर's picture

16 Mar 2012 - 2:04 pm | पिलीयन रायडर

चित्रपट पहा... सगळं कळेल...
आणि तसही... असं न बघता मत बनवणं बरोबर नाही...
बाकी आपआपली आवड...

डर्टीपिक्चर नंतर विद्याबालनने पुन्हा एकदा एक कहानी मध्ये आपले जबरदस्त अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे.
अर्थात हे वाक्य दुसर्‍यांच्या मतावरुन काढलेले नाही. एक कहानी हा मी स्वतः पाहीलेला आहे!
चित्रपटातील काही बोअरिंग घटना वगळता, एकंदर पिक्चरचा फ्लो बर्‍यापैकी आहे.
शेवटच्या वेळी घेतलेला जबरदस्त ट्विस्ट पुर्ण कथानकच फिरवून टाकतो.
विद्याबालनच्या अभिनयाने जिवंत झालेले नॉट व्विद्या दॅटस व व 'विद्या' या पात्राला पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा. ;)

विद्याबालनच्या अभिनयाने जिवंत झालेले नॉट व्विद्या दॅटस व व 'विद्या' या पात्राला पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा.

यातलं "नॉट व्विद्या दॅटस"" म्हणजे काय? :)

ऊत्सुकता वाढलीय हा चित्रपट बघण्याची
नक्कीच बघेन

चित्रपट पहायचची उत्सुकता कधी पुरी होईल ति होईल. पण लेखातुनसुद्धा छान धावति चित्रपट फेरी झाली. फारच छान.

गोंधळी's picture

14 Mar 2012 - 1:21 pm | गोंधळी

मराठी चित्रपटांची अशी परिक्षणे,मिसल पाव प्रसिद्धी व्हावयास ह वी.

बाकि डर्टीपिक्च ही पाहिला नाहि आहे. थोड्क्यात परिक्षण करावे.

मराठी चित्रपट प्रेमी

सोत्रि's picture

15 Mar 2012 - 1:26 am | सोत्रि
गोंधळी's picture

15 Mar 2012 - 11:39 am | गोंधळी

धन्यवाद
बघायचा योग जुळुन आल्यास नक्की बघु.

कहानी पाहिल्या गेले आहे आणि आवडला पण आहे.

- पिंगू

आताच बघून आलो. योग्य पिक्चर निवडल्याचं समाधान मिळालं. खरोखरीच चुकवू नये अशीच आहे कहानी.

सोत्रि's picture

15 Mar 2012 - 3:05 am | सोत्रि

खरंतर विद्याच्या ह्या कहानीवर,बघून झाल्यावर, मला धागा काढायचा होता पण ननिंनी 'भांजी मार ली' :(
असो, त्यामुळे इथे हौस भागवली आहे.
चित्रपट भयंकर आवडला गेल्या आहे.

- (विद्याच्या 'कहानी'त गुंगलेला) सोकाजी

गणपा's picture

16 Mar 2012 - 2:30 pm | गणपा

हा हा हा
इतके दिवस मला वाटत होतं की माझ्या कानपुरातच संप चालू आहे की काय?
एकदा श्रवणयंत्राच्या दुकानापाशीही घुटमळलो होतो.
पण आज जीव भांड्यात पडला. =))

नगरीनिरंजन's picture

16 Mar 2012 - 5:30 pm | नगरीनिरंजन

सोकाजी,
आत्ताच तुम्ही लिहीलेले परीक्षण वाचले. तुम्ही थोडं जास्त उघड केलंय पण लिहीलंय अगदी व्यवस्थित. तुम्हीच इथे लिहायला हवे होते असे वाटले. असो. एक डाव माफी द्या देवा!
तुमच्या आवडत्या विद्या बालनच्या चित्रपटावर लिहीण्याच्या गुस्ताखीबद्दल, ज्यांना पाहूनही झेपला नाही त्यांच्या आणि ज्यांचा पाहायच्या आधीच कात्रजचा घाट झालाय त्यांच्या, शेलक्या प्रतिसादांची शिक्षा मला मिळाली आहे. त्यामुळे माफी द्याच.
इथून पुढे कानाला खडा.

चिगो's picture

15 Mar 2012 - 5:31 pm | चिगो

मला लै आवडला पिच्चर.. विद्या आणि इतर मुख्य पात्रंतर जमलीच आहेत, पण आपल्याला तर त्प "युवर मॅजेस्टी" म्हणणारा लॉजवाला आणि तो मासूम हत्यारा पण आवडला..

नक्की बघावा असा..

थोडक्यात विद्या बालन चा कमल हसन होतो आहे, ओएसओएस, कहानी अजिबात पटली नाही. पण काही पात्रं उत्तम, विशेषतः एजंट, जबरा उभं केलंय त्याला. हॅकिंग हा प्रकार तर, पेन ड्राइव्हमधुन टेक्स्ट फाईल कॉपि करावी तसा दाखवला आहे,

विशिष्ट सॉफ्टवेअरच्या सिस्टिम एररला मेमरी फ्री करणे हे सोल्युशन कसे असु शकते यावर कुणी उजेड पाडेल का ?
अजुन एक भयाण शंका, त्या अपघातात मेलेल्यांच्या नावाची लिस्ट नव्हती का कुणी बनविली ?

अभिनय मात्र सगळ्यांचाच चांगला आहे, खान, राणा, विष्णु इ. इ.

मी आत्ताच ट्रेलर पाहिला. शेवट काय आहे ते व्यनितून कळवता का कोणी?
या सोकाजींमुळे मीही विद्याची फ्यान व्हायाला लागलिये.

एकंदर माझ्या मते कहानी या चित्रपटाची कथा चांगली थ्रिलर आहे परंतु त्याचे ज्या प्रकारे सदोष शूट झाले त्यामुळे काही जणांचे मुड ऑफ झाले. त्याचप्रमाणे अशा कथेला जो डायलॉगचा पंच हवा तोही कुठेतरी मुळमुळीत झाला या कारणांमुळेच खरा सिनेमा डल झाला.
आता प्रेग्नंसी हा विषयच मुख्य कथेला चालविण्यासाठी येथे वापरलेला आहे. त्यामुळेच ती पोलिसांची दिशाभूल करुन त्यांना आपल्या बाजुने वळवण्यास यशस्वी होते. त्यामुळे याचा इश्यू कथेत नक्कीच नाही.
आता कथेत तिला अशा अवस्थेत फिरवण्याबद्दल म्हणाल तर पोलिसांच्या बाबतीत अपराधी लोकांना पकडण्यासाठी कोणतीच दया माया बाळगली जात नाही. मग तेथे ही बळीचा बकरा बनवायची गोष्ट तर खुपच लाब राहते!
कोणाला मुंबईचा गुंड "माया" याच्या इन्काऊंटरची खरी कथा माहीत असेल त्यांना ही गोष्ट नक्की पटेल.

आता प्रेग्नंसी हा विषयच मुख्य कथेला चालविण्यासाठी येथे वापरलेला आहे. त्यामुळेच ती पोलिसांची दिशाभूल करुन त्यांना आपल्या बाजुने वळवण्यास यशस्वी होते.

हम्म. इथल्याच पोलीस स्टेशनमध्ये आली होती म्हणे तक्रार कशी दाखल करतात ते दाखवा, मला तक्रार दाखल करायचीय म्हणत. पोलिसांनी दिली काढून - अशी खोटी तक्रार दाखल करता येत नाही म्हणून.

तिला अशा अवस्थेत फिरवण्याबद्दल म्हणाल तर पोलिसांच्या बाबतीत अपराधी लोकांना पकडण्यासाठी कोणतीच दया माया बाळगली जात नाही.

या वाक्यावरुन पोलिसांचा विद्यावरच वहिम असतो असं वाटतं. मग हे थ्रीलर कसं?

अन्नू's picture

15 Mar 2012 - 10:22 pm | अन्नू

हम्म. इथल्याच पोलीस स्टेशनमध्ये आली होती म्हणे तक्रार कशी दाखल करतात ते दाखवा, मला तक्रार दाखल करायचीय म्हणत. पोलिसांनी दिली काढून - अशी खोटी तक्रार दाखल करता येत नाही म्हणून.

ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेलेली होती! पण माझे म्हणणे ते नाही, पोलिसांनी तिचा प्रेग्नंसी हा विक पॉईंट पकडून तिच्या नवर्‍याला जो त्यांच्या मते एक आतंकवादीपैकी होता त्याला पकडण्यासाठी तिला बळीचा बकरा करावा ही तिचीच इछा असते व ती सफलही होते.

पोलिसांचा विद्यावरच वहिम असतो असं वाटतं

अपराध्यांना पकडण्यासाठी त्यांचा विकपॉईंट म्हणजे त्याचे आप्त आणि फॅमिली मेंबर यांना टार्गेट करणे हे काही इथल्या पोलिसांना नवीन नाही.
काहींना सहनशक्तीपेक्षा जास्त त्रासही दिला जातो, कारण एकच ते बघून तरी तो अपराधी समोर यावा!

नगरीनिरंजन's picture

16 Mar 2012 - 4:04 pm | नगरीनिरंजन

प्रकाटाआ.

गणामास्तर's picture

15 Mar 2012 - 10:57 pm | गणामास्तर

>>>पोलिसांनी तिचा प्रेग्नंसी हा विक पॉईंट पकडून तिच्या नवर्‍याला जो त्यांच्या मते एक आतंकवादीपैकी होता त्याला पकडण्यासाठी तिला बळीचा बकरा करावा ही तिचीच इछा असते व ती सफलही होते.

गवि काकांनी दिलेला सल्ला पाळावा हि नम्र इनंती.

सोत्रि's picture

15 Mar 2012 - 11:13 pm | सोत्रि

प्रचंड सहमत!

आपल्याला जरी सिनेमा आवडला नसेल तरीही कृपया कथेसंदर्भात काही लिहीणे टाळावे. बर्‍याच जणांना सिनेमा आवडू शकतो.

- (कहानी आवडलेला) सोकाजी

हो मान्य. मला हा सिनेमा आवडू शकतो पण व्यनीतून शेवट कळवा हो सोत्री.

सोत्रि's picture

15 Mar 2012 - 11:38 pm | सोत्रि

आज्जे, व्यनि केला आहे!

- (ईच्छा नसताना शेवट व्यनि केलेला) सोकाजी :(

गवि काकांनी दिलेला सल्ला पाळावा हि नम्र इनंती.

इनंती मान्य हाये!

आपल्याला जरी सिनेमा आवडला नसेल तरीही कृपया कथेसंदर्भात काही लिहीणे टाळावे

१०१% अनुमोदन :)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2012 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार

परिक्षणाबद्दल धन्यवाद.

बायकांच्या आडियन्सला रडवायला काढलेले चित्रपट मुळीच आवडत नाहीत. आता महाराष्ट्र शासनाच्या कृपेने कोणी निर्माता-दिग्दर्शक अलका कुबल किंवा ऐश्वर्या नारकरांना घेउन ह्यावरती मराठी शिणिमा काढेलच. मुख्य म्हणजे किल बिल बघितला असल्याने हा चित्रपट पाहण्याची शक्यता धूसरच आहे.

बाकी कोणी निर्माता दिग्दर्शक माझ्यासारख्या मिपाकरांना घेऊन 'अकलेचे तारे' असा चित्रपट का काढत नाही ?

बाकी कोणी निर्माता दिग्दर्शक माझ्यासारख्या मिपाकरांना घेऊन 'अकलेचे तारे' असा चित्रपट का काढत नाही ?

काढील हो, काढील कुणीतरी..
आपल्या अकलेकडे लक्ष जायची वेळ आहे फक्त
ती आपल्याला अशी एवढ्या कद्रूपणे दाखवत सुटावे लागते
मग कसं होणार

माझीही शॅम्पेन's picture

16 Mar 2012 - 1:33 pm | माझीही शॅम्पेन

चित्रपट बघून पार गंडला गेल्यची भावना आमच्या पदरी (म्हणजे ती-शर्ट मध्ये) पडली .. आता कारण सांगतो (गवी काका यांचा सल्ला मानून)

  • हल्ली "वेगळ्या" चित्रपटाला "चांगला" चित्रपट म्हणण्याची फॅशन आलेली दिसतेय :)
  • शेवट बघून प्रचंड चीड-चीड झाली , आधे-मध्ये पण काही गोष्टी इतक्या अतर्क्य आहेत
  • विद्या बालन ने वेळोवेळी केलेल हॉकिंग केल ते साफ बन्डल वाटल
  • राणा ची भूमिका चांगली वाटली पण खानने अभिनयाच्या नावाखाली आरडा-ओरडा केलाय त्याची शरीर-यष्टी सुध्दा अगदी याता-तथा वाटली

का बघावा ? -

  • दुसरा कुठलाही चित्रपट सध्या(रिलीज झालेल्यात) कहाणी एवढा ही चांगला नाही
  • विद्या बालन भयंकर आवडत असेल तर (पण डार्टी पिक्चर नंतर त्यातल काहीही इथे मिळणार नाही)

का बघू नये

  • काहीच्या काही शेवट
  • डोक घरी ठेवून जाता येत नसेल तर मुळीच जौ नका
नगरीनिरंजन's picture

16 Mar 2012 - 2:53 pm | नगरीनिरंजन

•डोक घरी ठेवून जाता येत नसेल तर मुळीच जौ नका

तुम्ही तसेच (म्हणजे डोके घरी ठेवून) गेला होता का? :-D

अनेकांची झालेली चिडचिड पाहून वाईट वाटले म्हणून शेवटी पश्चातबुद्धीने ढुस्क्लेमर टाकत आहोत.
डिस्क्लेमरः
हे परीक्षण वाचून आपले मत बनवू नये.
आपापले डोके घेऊन जायचे की ठेवून जायचे ते ज्याचे त्याने ठरवावे.
काही लोक आपले डोके घेऊन गेले तरी कदाचित उपयोग होणार नाही. ते डोक्यात काय आहे त्यावर अवलंबून आहे.
प्रेग्नंट बाईचा वापर करणार्‍या चित्रपटाला विकृत समजणार्‍यांसाठी: चित्रपट अत्यंत विकृत आहे. तुमची वेगळी अशी खास चिडचिड होईल.
डिस्क्लेमर संपला.

ज्यांना चित्रपट समजला आणि आवडला त्यांचे एक संध्याकाळ आनंदात गेल्याबद्दल अभिनंदन!

काय राव ननि,
एरव्ही आम्ही पुरेसे विकृत असलो तरी तुम्ही पण निनावी डिस्क्लेमरं देताना पाहून अंमळ तळ हात छातीकडे गेला.
असो.

मन१'s picture

16 Mar 2012 - 3:06 pm | मन१

छी छी.
इतके विक्रुत असाल ह्याची कल्पना नव्हती.

नगरीनिरंजन's picture

16 Mar 2012 - 3:11 pm | नगरीनिरंजन

निनावी डिस्क्लेमरचा विकृतपणा करण्यात वेगळीच वि़कृत मज्जा आहे बघा! ;-)

हॅहॅहॅ
थँक्स.
काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
वगैरे गात ट्रान्समध्‍ये जाणार होतो नाहीतर. ;-)

माझीही शॅम्पेन's picture

16 Mar 2012 - 11:23 pm | माझीही शॅम्पेन

प्र. का टा आ

माझीही शॅम्पेन's picture

16 Mar 2012 - 11:22 pm | माझीही शॅम्पेन

तुम्ही तसेच (म्हणजे डोके घरी ठेवून) गेला होता का?

अर्थातच घेऊन गेलो होतो म्हणून तर एवढ्या चुका दिसल्या , कितीतरी प्रसंग सदोष वाटले
अरे बाबा पहिल्याच दिवशी चित्रपट पहिला आणि नंतर हे परीक्षण पण मुद्दामन काही दिवासने प्रतिक्रिया टाकली , सुरुवातीलाच प्रतिकूल प्रतिक्रिया नाही दिली..
शेवट चार्ली'ज एन्जल सारखा करण्याचा मोह टाळला असता तर बर्‍या पैकी परिणाम साधता आला असता :)

असो गरोदर बाई-कडून माझ्या कुठल्याही भलत्या सालत्या अपेक्षा नाहीत .. बाकी तुमच चालू द्या

सोत्रि's picture

16 Mar 2012 - 11:27 pm | सोत्रि

शेवट चार्ली'ज एन्जल सारखा करण्याचा मोह टाळला असता तर

आवरा...
:bigsmile:
:bigsmile:
:bigsmile:

- (हसून हसून फुटलेला) सोकाजी

स्पंदना's picture

16 Mar 2012 - 5:17 pm | स्पंदना

धन्यु नगरी!

(आता इथल्या दुकानात ५० च बिल कराव लागणार, कारण मग दुकान्दार मोठ्या प्रेमाने तुम्हाला हवी ती सी डी उचला अस म्हणतो मग, तो फिर निकालो पचास वाली ग्रोसरी लिस्ट अन चलो दुकान ! )

मुक्त विहारि's picture

17 Mar 2012 - 11:20 am | मुक्त विहारि

@ नगरी निरन्जन,

कालच सिनेमा बघितला ..नाही नाही अनुभवला...

एक चान्गला सिनेमा सुचवल्याबद्दल परत एकदा धन्यवाद...