मिरवत रोषणाई वाजवीत ढोल ताशा
स्वागत करण्या सृष्टीचे आला वरूण राजा
करूनी रामराम त्या ग्रीष्माला
झाली सुरवात बाई पावसाला
उन्हाळी वनवास गेला ग लयाला
जाग आली सृष्टीच्या नवचैतन्याला
धुऊनी अ॑गे झाडे झाली ओली चि॑ब
पाहती आइन्यात आपुलेच प्रतिबि॑ब
झटकल्या पशुपक्षा॑नी ग माना
चराचरा मुखी ओतला अमृताचा पान्हा
धु॑द हवा पावसाळी, गारव्याची उठवत शिरशिरी
पाउस आला ग बरसवत सरीवर सरी
तने मने भिजवत झाली रोमा॑चित तरूणाई
गेल्या क्षणा॑ना आठवत उसासली प्रौढाई
प्रतिक्रिया
14 Jun 2008 - 12:47 am | पक्या
आवडली . छान आहे कविता...सोपी सुटसुटीत. उगाच जड जड शब्द वापरले नाहीत ...बरे वाटले. आणि अर्थ ही शोधत बसावा लागला नाही.
धुऊनी अ॑गे, झाडे झाली ओली चि॑ब
पाहती आइन्यात आपुलेच प्रतिबि॑ब
धु॑द हवा पावसाळी, गारव्याची उठवत शिरशिरी
पाउस आला ग बरसवत सरीवर सरी
ह्या ओळी आवडल्या.
14 Jun 2008 - 1:27 am | विसोबा खेचर
तने मने भिजवत झाली रोमा॑चित तरूणाई
गेल्या क्षणा॑ना आठवत उसासली प्रौढाई
वा!
सुंदर कविता..
आपला,
(प्रौढ) तात्या.