मजल
आम्हाला गझल लिहीता येत नाही - म्हणून गजलेच्या दिशेने आम्ही मारलेली ही मजल)
हे गोड आठवांनो बरसू नकात आता
स्मृतीशेष त्या स्थळांना उकरू नकात आता
भोगून प्राक्तनाचे मी वार तृप्त झालो
विसरून त्या क्षणांना केव्हाच मुक्त झालो
असता असेही काही गलती अमान्य नाही
पुसण्यास जाच आता देईल ती ही ग्वाही
तो स्वर्ग, स्वर्ग जिंकण्याची संधी अमोल होती
उमजून सर्वकाही नियती कठोर होती
तुटताच प्रेमधागा जुळण्यास वाव नाही
सांगून रहीम गेला गाठीस भाव नाही
या बुजूर्ग सांगण्याला झालो मी न राजी
धाडून पाहिली मी आमंत्रणे तहाची
शेवटी मानले मी रहिमन तुझेच आता
हे गोड आठवांनो बरसू नकात आता
प्रतिक्रिया
13 Mar 2012 - 1:20 am | अत्रुप्त आत्मा
व्वा...! व्वा...! व्वा...! यक्कूशेठ आधी या गझलसाठी अहो काय विलक्षण काव्य प्रतिभा आहे हो तुमची...! मधनच एखादा चौकार मारता,पण येकदम ऑऊट अँन्ड आऊट... मानलं बाबा तुंम्हाला...
आपल्या कडुन या रचनेला सलाम आणी
13 Mar 2012 - 7:55 am | प्रचेतस
सुरेख.
छानच झाली आहे गझल.
रहिमन म्हणजे काय ते समजले नाही.
13 Mar 2012 - 8:27 am | यकु
या मजलेचं बीज -
रहिमन धागा प्रेम का, मत तोडो छिटकाय
टूटे तो फिर ये ना जुडे, जुडे तो गाठी पड जाय
या दोह्यामध्ये सांगितलेल्या वास्तवामध्ये आहे. अनुप जलोटांनी फार सुंदर म्हटले आहेत असे दोहे.
अब्दुल रहिम खानखाना हे कबीरांचे समकालिन मुस्लिम संत, कवी. ते कोणा बादशहाच्या पदरी सरदारही होते.
त्यांच्या रचना सुंदर आहेत.
आता आठवलीच आहे एक तर लिहून टाकतो.
रहिम दानधर्म करीत असत.. दान देताना डोळ्यांच्या पापण्या झुकवत.
ते पाहून कबीरांनी त्यांना दोह्यातून प्रश्न विचारला -
'ऐसी करनी देन ज्यूं कित सीखे हो सैन
ज्यों ज्यों कर ऊंचो करो, तो तो नीचे नैन'
रहिम यांनी कबिरांना प्रत्युत्तर पाठवलं -
देनहार कोई और है, जो भेजत दिन रैन
लोग भरम हम पर करे, तासो नीचे नैन
अनुप जलोटांच्या चदरिया झीनी रे झीनी मध्ये हे असायलाच पाहिजे.. यातच आहे का ते आता पक्कं आठवत नाही.
http://www.youtube.com/watch?v=uR2VAl-AXQ4
'
13 Mar 2012 - 8:29 am | प्रचेतस
सुंदर विवेचन रे येशा.
कबिर आणि रहिम यांच्या रचनाही उत्कट.
13 Mar 2012 - 9:43 am | पियुशा
यक्कु .....तेरी ये मजाल ???? ;)
आय मीन " मजल " छान झालिये :)
13 Mar 2012 - 9:40 am | सुहास झेले
यशवंता, लै भारी रे....
ही मजल दर मजल हर गझल वाढत राहो :) :)
13 Mar 2012 - 9:55 am | गवि
लव्हली... मस्त रे येशा.
13 Mar 2012 - 11:21 am | चाणक्य
असेच म्हणतो. हे विशेष आवडल
13 Mar 2012 - 10:06 am | प्यारे१
खूपच मस्त येशा!
13 Mar 2012 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मजल आवडली. अशीच मजल दरमजल करत जा.
कुठेतरी नक्कीच पोहचाल.
पहिल्या तीन द्वीपदी खासच.
-दिलीप बिरुटे
13 Mar 2012 - 10:40 am | मिसळलेला काव्यप्रेमी
काय लिहीलय! काय लिहीलय!! व्वाह!!!
दिल खुश कर दिया मालिक!!
वाह!! जियो __/\__
13 Mar 2012 - 11:07 am | पक पक पक
दिल खुश हो गया.... :) मस्त लिहील आहे....
13 Mar 2012 - 11:35 am | जाई.
छान जमलीय गजल
13 Mar 2012 - 11:46 am | मालोजीराव
या गजलेची मजल झक्कास जमलीये कि !
अश्याच सुंदर गजला येउदेत आणि हृदयाच्या तारा छेडूदेत
- मालोजी :)
13 Mar 2012 - 1:07 pm | गणेशा
मस्त एकदम.
बाकीच्या ओळी मात्र आवडल्या नाहित
13 Mar 2012 - 10:43 pm | पैसा
कबीर आणि रहिमनबद्दल लिहिलेलं आवडलं, पण एक शंका आहे तुझा परत एकदा प्रेमभंग झालाय का? ;)
14 Mar 2012 - 12:12 am | यकु
काय हे?
लाजलो ना मी एवढ्या पब्लिकमध्ये विचारल्यानं. ती लाजल्याची स्मायली पोरींसाठी असते म्हणून टाकत नाही.
प्रेमभंग नाही झाला, मी पुन्हा एकदा प्रेमात पडू शकतो याचा शोध लागला... च्यायला मला आधी वाटलेलं माणूस आयुष्यात एकदाच प्रेमात पडू शकतो की काय.
पण हे बरंय, दिल को बहलाने के लिये ग़ालिब ये खयाल अच्छा है.
कधी प्रेमात पडणं, कधी हृदयभंग.
काल कविता लिहायला बसलो तर काही सुचेना पण.. मग मागच्याच प्रेमभंगाच्या वेळी केलेली टाकलीय. पण मिपाकरांसाठी नवीनच.
पोरींनो, जरा मनापासून प्रेम करा.. कविताही धड होत नाहीयेत.. काय दिवस आलेत..
आणि लोकहो, सगळ्यांचे धन्यवाद बरं का, ते राहून गेलं होतं.
(सभ्यतेच्या बुरख्याआडचा विकृत) यशवंत (विकृतीचा बुरखा करुन सभ्य व्हावं का या विचारात)
14 Mar 2012 - 12:13 am | कवितानागेश
जितके जास्त प्रेमभंग होतील तितके कवितेतील भाव अधिकाधिक गहीरे होत जातील.
All the Best!
13 Mar 2012 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा
@एक शंका आहे तुझा परत एकदा प्रेमभंग झालाय का?>>>बाबौ..यक्कूशेठ काय हो हे प्रकरण..?