फोडली आहे बाटली .. बाटली तोडली का कधी.. नसेल तोडली तर तोडून बघा.. फोडून बघा .. बाटली तेलाची.. हो हो तेलाची.. .. एक बाटली कळकटलेली, मळकटलेली .. किंचित राकट त्या हातात घट्ट धरलेली.. जणू काही स्वप्ने गाठीशी बांधलेली.. फोडलीस तू म्हणून रागानी ती पाही .. मटकन बसून खाली.. तुकडे गोळा करी.. अर्ध्या तुकड्यात त्या वाचले होते तेल काही.. उरलेले ती बोटांनी गोळा करी.. विखुरलेली स्वप्ने वाकुल्या दाखवी.. मुक्या त्या डोळ्यात होता कल्लोळ..लागली काच रक्त वाहे भळभळ .. तमा न कशाची तिला.. हात तसाच पदरास पुसला.. परत सुरु खेळ तिचा.. भू पण स्त्री.. ती पण हट्टी .. तेल सारे सोडेल कशी.. तिचा हिस्सा तिने घेतलाच.. अर्धी बाटली तुटलेली सांभाळत निघाली ती घरला.. कोपऱ्यात उभां कोणी पाहत असे खेळ सारा.. कुतुहलाने पाठलाग केला.. पोचली ती वेशिबाहेरच्या वस्तीला.. शेंबडी कार्टी दोन ..बिलाग्ती तिजला.. म्हणती माय .. वाढ गं आम्हाला.. डाफरे नाटकी.. हाकले पोरांना.. वळताच पाठ.. हात लावे डोळ्यांना.. झरकन गेली खोपट्यात त्या.. रांधली चूल... शिजली भाकरी.. उरल्या सुरल्या तेलात केले कालवण..मायचं ती कशी पोरांची विसरेल आठवण.. गोल गोल भाकऱ्या त्या .. पांढऱ्या शुभ्र होत्या.. हातावर तिच्या जखमा मात्र ताज्या होत्या.. हळूच फिरावी हात ते गालावरून माझ्या..म्हणे भूक लागली कारे राजा.. जखम तिची का खुपली मला.. मीच फोडली होती बाटली.. कळली किमत बाटलीची मला..
प्रतिक्रिया
10 Mar 2012 - 12:37 pm | कॉमन मॅन
नि:शब्द..!
10 Mar 2012 - 12:50 pm | तर्री
10 Mar 2012 - 1:01 pm | अन्नू
___/\___ शब्द नाहीत आता! :(
10 Mar 2012 - 1:50 pm | प्रचेतस
अत्रुप्त आत्म्याच्या प्रतिसादाच्या प्रति़क्षेत.
10 Mar 2012 - 2:00 pm | हर्षद आनंदी
10 Mar 2012 - 2:00 pm | प्रचेतस
प्रतिसाद आला की कळेलच. :)
10 Mar 2012 - 2:12 pm | हर्षद आनंदी
10 Mar 2012 - 2:04 pm | मन१
च्च....
10 Mar 2012 - 2:22 pm | फास्ट पुणेकर
10 Mar 2012 - 2:48 pm | हर्षद आनंदी
10 Mar 2012 - 4:06 pm | पैसा
आवडलं.
10 Mar 2012 - 4:24 pm | पक पक पक
बाट्ली चढली......? :crazy: ..हे आपल आवड्ली ;)
छान !छान!! चालु द्या चांगल आहे ,पण काव्य आहे की कथा...?
10 Mar 2012 - 4:27 pm | पक पक पक
बाट्ली चढली......? :crazy: ..हे आपल आवड्ली ;)
छान !छान!! चालु द्या चांगल आहे ,पण काव्य आहे की कथा...?
ते जे काही आहे ते वाचुन मला थोड झिंगल्या सारख झाल........ ;)
10 Mar 2012 - 4:32 pm | गणपा
मुक्तक आवडल.
10 Mar 2012 - 4:42 pm | sneharani
मस्त!!
:)
10 Mar 2012 - 4:43 pm | अत्रुप्त आत्मा
दारिद्र्य रेषेखालचं जिवन जगणार्या आणी संसाराशी झुंज घेऊन उभ्या घरादाराला वाचविणार्या अश्या अनेक..माय...आजही आपल्या समाजात आहेत...याचं उत्तम चित्रण तुमच्या मुक्तकातुन झालय... :-)
पण,,,,सुरवातीलाच या गरिबीवर चिडुन/कंटाळुन किंवा अजुन आपल्याला जे वाटलं असेल त्या कल्पना चित्रा नुसारही....ही माय असमंजस पणानी तेलाची बाटली फोडते का..? ते नीट स्पष्ट झालेलं नाही...
आपण लिहिलेलं मुक्तकही बरच चांगलं उतरलय...पण अजुन नीट जमलं असतं,तसा मनापासुन प्रयत्न झाला असता तर...!
10 Mar 2012 - 4:45 pm | पैसा
मायच्या पोरानं बाटली फोडलीय.
10 Mar 2012 - 5:40 pm | अत्रुप्त आत्मा
@मायच्या पोरानं बाटली फोडलीय.>>> अस आहे होय...! बरं मग चालु द्या... मला कदचित त्याच्या लेखनाच्या फॉरमॅट मुळे आणी एकंदरच रचना हवी तितकी सुटसुटीत न लिहिल्यामुळे लक्षात आलं नसावं... असो ...
10 Mar 2012 - 5:14 pm | ५० फक्त
सुरुवात ते शेवट लाईन जुळायला वेळ लागला पण जेंव्हा जुळली तेंव्हा आवडलं,
10 Mar 2012 - 6:19 pm | निश
हर्षद साहेब
ह्याला म्हणतात कविता जिवाला चटका लावुन गेलि....
अन डोळ्यात पाणि आणुन गेलि.
हिच असते कविचि खरि ताकत.
ति तुमच्या कवितेत आहे नक्किच आहे.
मस्त
11 Mar 2012 - 10:39 am | हर्षद आनंदी
11 Mar 2012 - 1:54 am | इन्दुसुता
आईची आठवण आली... कविता हळवं करून गेली...
11 Mar 2012 - 6:05 am | सांजसंध्या
नि:शब्द !
11 Mar 2012 - 10:38 am | हर्षद आनंदी
मिपाकरांनि भरभरुन दिलेल्य प्रतिसादासाठी खरेच मनापासुन आभार.
अत्रुप्त आत्मा .. तुम्ही म्हणता ते खरेच आहे, एक अनुभव थोडा बदलुन मांडला आहे, त्यामुळे कदाचित थोडा विस्कळितपणा आला असेल.
एका वाक्यात सांगायचे तर.. रस्त्यावरुन जाणार्या कोण्या बाईच्या हातातली बाटली एका पोराचा धक्का लागुन फुटते, फुटक्या बाटलित तेल गोळा करताना पाहुन तो तिचा पाठलाग करतो, तेव्हा त्याला अज्ञात असलेलि जिवनाची बाजु त्याच्यासमोर उघडी होते.. असा विचार होता.
परत एकदा धन्यवाद!!
11 Mar 2012 - 6:15 pm | पक पक पक
आता परत दुसरी कविता पण करणार का....??? :tired: :tired: :tired:
12 Mar 2012 - 12:31 pm | अमृत
;) ;-) :wink:
अमृत
12 Mar 2012 - 12:32 pm | अमृत
अमृत