टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मुली / स्रिया असण्याचे फायदे!
काय ? विषय वाचून दचकलात का?
अहो ,दचकू नका मला माहीत आहे मुली / स्रिया असण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे ही आहेत पण आज आपण फायदे बघुया.
प्रत्येकाला कधी ना कधी काही ना काही चांगले, वाईट अनुभव आले असतील तर चला करुया सुरुवात.
शनिवारची गोष्ट आहे, शनिवारी संध्या़काळी मी "सॅर्टरडे क्लब ठाणे" ( मराठी व्यावसायि़कांची सभा ) येथे माझ्या दुचाकीवरुन चालले
होते, डोक्यावर हेल्मेट नाही , तोंडावर अतिरेकी गुंडाळतात तसा स्कार्फ गुंडाळला होता, अंमळ उशीरच झाला होता म्हणून गाडी
वेगात चालली होती आणि अचानक लाल सिग्नल लागललेला माझ्या लक्षात आलं नाही आणि मी सिग्नल तोडला , मागून मला ट्रॅफिक
हवालदारच्या शिट्टीचा आवाज आला मी गाडी मागे वळवली (स्वगतः आलीया भोगासी असावे सादर) मनातल्या मनात म्हटलं आता
किती पैशाची काशी होणार कोणास ठाउक
कारण एकतर सिग्नल तोडला होता + हेल्मेट घातलं नव्हतं, मी गाडीवरुन खाली
उतरले साहेबांना एक छानसं स्माईल दिलं
, साहेबांनी सिग्नल तोडल्याचं कारण विचारलं मी त्यांना चूक झाली म्हणून सांगितलं
आजुबाजुचे बघे मनातल्या मनात म्हणत असतील चला साहेबांना एक बकरा सॉरी बकरी मिळाली
आणि अहो आश्चर्य साहेबांनी
मला काही दंड न करता जा म्हणून सांगितलं
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


त्याजागी
कोणी पोरगा असला असता तर चेचला असता त्याने .. हसला असता तर "काय दातड विचकतो असे? "असे म्हटला असता ..
असे अजुन बरेच फायदे एन्लिष्ट करता येतिल हो..
खरं आहे...
मालक, तुम्ही म्हणताय ते १०१% खरं आहे. ते दाताड घशात पण घालून दिले असते कदाचित.
अवांतरः मी विचार करतोय, ते तात्याला पकडलं होतं तेव्हा जर का 'वहिनी' पण असत्या त्याच्या बरोबर तर एखादवेळेस तात्याला तो अनुभवच आला नसता.
बिपिन.
थोरले
थोरले आनंदराव पेशव्यांशी सहमत!
फायदा क्र.२ : हापिसात बॉस जास्त चावत नाही. एकतर गोग्गोड हसलं की बॉस निम्मा खल्लास किंवा डोळे टिपले की बॉसचंच पाणी पाणी होऊन जातं...
तेच जर मुलगा/पुरुष असेल तर...अग्गायायाया..उभा-आडवा घेतो बॉस/बॉसीण! पार चिंधड्या करुनच शांत होणार!
बर बॉसिण
बर बॉसिण असेल एखाद्याला तर काय विशेष फायदा नाही, उलट अजुनच जपुन रहावे लागते. पण मात्र पोरींना बॉस मात्र भरभरुन उजवे माप देणार. च्यामारी पुरुषांना अप्राईजल्स मधे ७०% आरक्षण द्यावे अशी मागणी आम्ही यानिमित्ताने करतो.
असहमत ...
जर तुला "बॉस" च्या जागी एखादी "बॉसीण" असेल तर फायदाच फायदा असतो ...
तिचा फक्त "वीक पॉइंट" हुडकून काढायचा , एकदा ते झाले की मग काय "होल वावर इज अवर" ...
"इमोशनल रिलेशनशीप्स" लवकर बनतात ...
"बॉस" ला हा चान्स नसतो ... त्याला पटवायचे म्हणजे एक तर मरोस्तोवर काम करा आणि जमले तर "असात्विक पार्ट्या" द्या ...
"बॉसीण" ला ह्यातलं काही लागत नाही, फक्त आपण तेवढे "शहाणे" पाहिजे ...
अजून काय टिप्स हव्या असतील तर "खासगी वार्तालापात" देईन ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
असहमत ...
ए भौ, बॉस परवडला......बॉसीण नको......
लै सोसलं रे!
उलटा प्रतिसाद
वरचा प्रतिसाद उलटा कसा काय आला? तो असा हवा होता -
जर तुला "बॉसीण" च्या जागी एखादा "बॉस" असेल तर फायदाच फायदा असतो ...

त्याचा फक्त "वीक पॉइंट" हुडकून काढायचा , एकदा ते झाले की मग काय "होल वावर इज अवर" ...
"इमोशनल रिलेशनशीप्स" लवकर बनतात ...
"बॉसिण" ला हा चान्स नसतो ... तिला पटवायचे म्हणजे एक तर मरोस्तोवर काम करा आणि जमले तर "सात्विक पार्ट्या" द्या ...
"बॉस" ला ह्यातलं काही लागत नाही, फक्त तो तेवढा"शहाणा" (असे दाखवले) पाहिजे ... -- हाच तर वीकप्वाईंट असतो
पण टिंग्याला बॉसशी रिलेशनशिप नको असावी. इमोशनल झाली म्हणून काय झालं?
ह. घ्या
पुन्हा तेच सांगतो ...
पुन्हा तेच सांगतो, प्रतिसाद सरळ का उलटा, बॉस चांगला की बॉसीण ह्या सर्व गोष्ती "सापेक्ष" आहेत ...
प्रत्येकाचे अनुभव वेगळे ...
इथे हाताची ५ बोटे सारखी नसताना आपण लगेच एक "डीसीजन" घेऊ शकत नाही व दुसर्याला चुकही म्हणू शकत नाही ...
जगातल्या प्रत्येक गोष्टी २ प्रकारे डिफाईन करता येतील "चांगल्या आणि वाईट", डीसीजन तुमच आहे ...
हे म्हणजे "पाण्याने अर्ध्या भरलेल्या ग्लासासारखे " आहे, तुम्ही ठरवायचे तो अर्धा "भरलेला " आहे की अर्धा "रिकामा" ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
सहमत!
>>तेच जर मुलगा/पुरुष असेल तर...अग्गायायाया..उभा-आडवा घेतो बॉस/बॉसीण! पार चिंधड्या करुनच शांत होणार!
सहमत! सहमत!! सहमत!!!
त्रिवार सहमत!
(आमच्या बॉसीणीकडुन बर्याच वेळा चिंधड्या झालेला) टिंग्या
परवा
परवा बेलापुरला नो पार्किंगचे २५० रु भरले. स्त्रिया/ मुली ही होत्या
( कदाचीत स्माइल करायच्या विसरल्या असतील.)
ठाणेकर ( स्त्रिया/ मुली ) मात्र नशिबवान दिसतात.
धमुभाय,
धमुभाय, खुशीभाय, टिंग्या भाय कायपण बोलू नका उगीचच!! हापिसमधे आम्हाला पण तेवढीच कडवी वागणूक असते!!
अजुन १
आयला चहा-वडापाव खाताना बिलं नेहेमी आम्हीच द्यायची.......
आयला डेली २०-२५ रुपये काय झाडाला उगवतात काय?
पण च्यायला काय करणार्.......सुट्टे नाही म्हणत आपल्यापुढं ५००ची नोट नाचवली अन् गोड स्माईल दिलं की निघालेच आपल्या खिशातुन पैसे
सहमत ...
>>सुट्टे नाही म्हणत आपल्यापुढं ५००ची नोट नाचवली अन् गोड स्माईल दिलं की निघालेच आपल्या खिशातुन पैसे
=)) 
पुण्यातील "शिवाजीनगर भागातल्या कालेजातल्या" सर्व पोरी [ आधी चुकुन म्हशी लिहले होते] तुर्तास [ व पुराण काळापासून ] अशाच काय रे टिंग्या ???
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
:)
>>पुण्यातील "शिवाजीनगर भागातल्या कालेजातल्या" सर्व पोरी [ आधी चुकुन म्हशी लिहले होते] तुर्तास [ व पुराण काळापासून ] अशाच काय रे टिंग्या ???
वत्सा, पुराणकाळापासुन ते अनंतकाळापर्यंत शेम २ शेम!
टिंग्या
मला एक किस्सा आठवला माझ्या एका मैत्रीणीला खूप सवय होती असं करायची रोज १०० ची नोट काढायची कँटीन मधे वडापाव आणि कटींग मारताना...एकदा सगळ्या मित्रांनी ठरवलं हिची जिरवायची......तिने १०० ची नोट काढल्यावर एकाने ९५ सुट्टे दिले आणि घेतली ती नोट्...मग बस मधे गेलो म्हणाला आज तुझ्याकडे सुट्टे आहेत ना आज सगळ्यांचं तिकीट तुच काढ...वर परत स्टेशन ला पोचल्यावर...इथे भेळ मस्त मिळते आणि आज हिच्याकडे सुट्टे आहेत चल दे सगळ्यांना म्हणून भेळ उकळली ती वेगळीच्....काय फोटोजनिक चेहेरा झाला होता तिचा......
आयला
आयला चहा-वडापाव खाताना बिलं नेहेमी आम्हीच द्यायची.......
जाऊ नये मग अश्या वेळी सोबत!! कुणी ओढून नेतं का????
हो.....
अहो, लाडिकपणे चहासाठी विचारलं की नकार देववत नाही हो
असं करा
एकदा तुम्हीच तिला लाडीकपणे विचारून बघा!
नको.....
किती वेळा नकार ऐकायचे ते
मग तर
मग तर मेलाच टिंग्या .. गिफ्ट, पिक्चर, डिनर .. गेले टिंग्याचे १००० पाउंड्स... बेस्ट ऑफ्फ लक्क टिंग्या !
(तु ललनेला टिंग्या पिक्चर दाखव
)
सोप्पंय !
मुली/स्त्रिया अस्तित्वातच नसल्या तर जे तोटे होतील असे मनात येत असतील त्यांचा विचार करा, आपोआप उपरोल्लिखित प्रश्नाचे उत्तर असलेले सग्गळे अनुभव झर्रकन डोळ्यासमोरुन तरळून जातील !
मग तक्रार
मग तक्रार का करावी म्हणे??
स्त्रिया फायदे घेतात का?
माझे उत्तर : हमखास घेतात आणि जरूर घ्यावेत. काय चुकलं त्यात? प्रत्येकजण आपापला फायदा बघत असतो. गैरफायदा घेत असतील तर मात्र त्यांची आणि गैरफायदा घेऊ देणार्याचीही तितकीच चूक आहे.
अगदी, अगदी
अगदी, अगदी वेदश्री!!
प्रियाली सही!!
डॉन्या
डॉन्या (अगदीच राहवलं नाही!!), कुठल्या जमान्यात वावरतोस!! तुझी बॉसीण असेल, तर तिने तुला समजू न देता तुला कधीच गुंडाळलेलं आहे हे नक्की!! तुलाच ते कळलेलं नाहीय!!
आयला, डान्य
आयला,
डान्याची बॉसीण यशभायच तर नाही ना?
बघ रे येड्या...
नायतर अप्रेझलच्या वेळी टाकेल तुला मुंडक्यावर! तुझे सगळे प्रतिसाद आणि हापिसातला कामाचा वेळ मिपावर काढलेल्याचं बॅलन्सशीटच मांडेल...
असं काही नाही ...
गुंडाळले का नाही हे सर्व सापेक्ष आहे ...
अपना अपना नजरिया ...
माझे म्हणणे मी चांगल्या भावनेने मांडले, बोसीणबरोबर काम करताना "पॉलीटीक्स, मुद्दामुन एखाद्याला त्रास देणे, रिजनॅलिझम, ग्रुपीझम " अशा गोष्टी घडत नाहीत हा माझा अनुभव आहे ...
बाकी आपली मते जी मते असतील त्याबद्दल मला आदर आहे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
अरारारा
>>बाकी आपली मते जी मते असतील त्याबद्दल मला आदर आहे ...
अरारारा ... बेक्कार्..............
असं काही नाही रे डॉन भाऊ
बॉसीणी पक्क्या पण असतात्...भयंकर राजकारणी आणि नको त्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवणार्या...ग्रुपीजम तर बायकाच जास्त करतात्..त्यांच्या खास मैत्रीणी असतात आणि मग त्याप्रमाणे लंच ग्रुप्स ठरतात्..मग कोण कोणाबरोबर आणि का ह्यावर रोज चर्चा होतात्....अजुन मुलींच्या टोळक्यात जाऊन पाहिलं नाही तुम्ही....
मान्य आहे ...
पण हे "असेच " आहे असे आपण "फायनल कंक्ल्युजन" काढू शकत नाही ...
"अपना अपना नजरिया" असतो हे मान्य करावे लागेल ...
माझेच पहाल तर माझा "जी एम" म्हणजे कर्दनकाळ आहे बाकींच्यासाठी, तो समोरुन चाल्ला तर लोक घाबरुन रस्ता बदलतात. पण मला विचाराल तर मी म्हणेन "ही इज बेस्ट वन !!!" , त्याला तशी कारणे पण आहेत ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
प्रगती
तुझ्याशी सहमत गं...आम्हाला ठाणे मुन्सिपल कॉर्पो. मधे काहीतरी काम होतं.. नवरा दोनदा जाऊन आला...रांगेत २ तास उभ राहून खिडकी बंद झाली म्हणून आला परत म्हटलं तुला लागलेय अमेरिकेची हवा दे मी जाते....मी गेल्यागेल्याच बायकांची वेगळी लाईन असायला पाहिजे म्हणून आरडाओरडा सुरु केला....बायकांना एवढा वेळ उभ राहून त्रास होतो..तुमचं काय वगैरे वगैरे...मग १५ मिनटानी दिली त्यानी वेगळी लाईन लावायला...अर्ध्या पाऊण तासात काम उरकून मी बाहेर्.... नवरा सॉलीड वैतागला जिकडे तिकडे आरक्षण ...पण फायदा त्याचाही झालाच की....
असेच.
म्हणजे छोटी टि॑गी तुम्ही जाणुन बुजुन खड्यात पडता.
काहीही!
त्याऐवजी मी म्हणेन की मला जाणुन्-बुजुन खड्यात पाडण्यात येत
डॉन भाव,
डॉन भाव, अहो जरा हलके घ्या हो


धमुभाय
शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ गं, वरदा
वरदा, माझा
वरदा, माझा अनुभव जर वेगळा. बॉस लोक्स अतिशय घाणेरड राजकारण खेळतात...
हो गं असतील
तसलेही असतील...
लकीली मला भेटलेले बॉस चंगले भेटले.....बॉसीणी जाम बेक्कार....
खरयं खरयं
>>बॉसीणी जाम बेक्कार
खरयं
हापिसात बॉस जास्त चावत नाही
हापिसात बॉस जास्त चावत नाही. एकतर गोग्गोड हसलं की बॉस निम्मा खल्लास किंवा डोळे टिपले की बॉसचंच पाणी पाणी होऊन जातं...
१००% सहमत
(अनेक मदनिकांबरोबर कंपनीमध्ये काम करता करता बॉसच्या पक्षपाताने बेजार झालेला)
चावटमेला
अवांतर
>>अनेक मदनिकांबरोबर कंपनीमध्ये काम करता करता बॉसच्या पक्षपाताने बेजार झालेला
अरेच्चा! चावटमेला कुठल्या फ्लोअरला असता तुम्ही?
आपल्या कंपनीत चक्क मदनिका
अवांतर....
>>आपल्या कंपनीत चक्क मदनिका
टिंग्या येउ का परत तिकडे ,,,,,
थांब.....
मला आधी R&D करु देत्.......तसचं असेल तर तुला लगेच बोलवेन
आहात कुठे?
अहो, आहात कुठे??
)
आपल्या कंपनीत, इतर कंपन्यांच्या तुलनेत मुलींची संख्या (आणि ओघाने सुंदरललनांची ) जरा जास्तच आहे
(हा निष्कर्ष अनेक कंपन्यांच्या गेटबाहेर पक्षीनिरीक्षण करुन काढलेला आहे
अरे
माझी समस्या वेगळिच आहे.
माझ्या हाताखाली २ मुली आहेत. एकजण नीट काम करेल तर शप्पथ.
सकाळी ९.३० ते लंच टाइम ह्या मध्ये २५ मिनीटांचा एक असे २ कोफी ब्रेक घेतात.
लंच नंतर अर्धातास फिरायला जातात. दुपारचा कोफी ब्रेक वेगळाच.
एकतर चेतिंग नाहि तर फोनवर.दिवसाभरात ह्यांना एवढे फोन तरी कोण करते?
परत ५ वाजले कि ह्यांची आवराआवर सुरु. संध्याकाळि बसून काम पुर्ण करायचि वगैरे बातच नाहि.
माझ्या डोक्यात जातात ह्या असल्या पोरी.
बर,काहि बोलले कि एकतर फिदिफिदि दात काढतात,नाहितर एकदम रडायला लागणार अशेच अविर्भाव.!
काम झाले नाहि कि बोसच्या शिव्या मलाच खायला लागतात.
आता ह्यावर काय करावे?अनुभवी मि.पा.करांनी आम्हाला ह्या बाबत काहितरी सुचवावे.
(वैतागलेला) अभिज्ञ.
नोकरी बदला ...
>>बर,काहि बोलले कि एकतर फिदिफिदि दात काढतात,नाहितर एकदम रडायला लागणार अशेच अविर्भाव.!
>>काम झाले नाहि कि बोसच्या शिव्या मलाच खायला लागतात.
>>आता ह्यावर काय करावे?अनुभवी मि.पा.करांनी आम्हाला ह्या बाबत काहितरी सुचवावे.
यावर उपाय , नोकरी बदला.
मी हेच करतो.
( ८ वर्षात ६ नोकर्या बदलेला , आणि परत नवीन नोकरीच्या शोधात असलेला)
कुंदन
खी खी खी!
>>यावर उपाय , नोकरी बदला.
>>मी हेच करतो.
ह्म्म्म्म्.......मलादेखील हेच करावे लागेल असं वाटतयं!
(महिला पीयम अन् महिला डेव्हलपर्सच्या सासुरवासाला प्रचंड कंटाळलेला) टिंग्या
नोकरी बदलून काय होणार?
तुम्हाला ती इसापनीतीतली गोष्ट ठाऊक आहे ना?
दाट जंगलातून जाताना एका कोल्ह्याला जळवा घेरुन टाकतात त्याच्या अंगावरचे रक्त पिऊन त्या अगदी टम्म फुगतात. तो सुरुवातीला बेजार होतो पण जळवा जशा रक्त शोषून घेईनाशा होतात तसा तो शांत होतो. जंगलातून बाहेर आल्यावर एक करकोचा त्याला बघतो आणि म्हणतो "अरे काय हे? मी माझ्या चोचीने काढू का त्या जळवा?" कोल्हा म्हणतो "नको. अजिबात नको त्या आता शांत झालेल्या आहेत. त्यांचा त्रास नाही. तू त्यातल्या काहींना काढून टाकलेस की नव्या ज्या येतील त्या नव्या जोमाने रक्त पिऊ लागतील त्यामुळे जास्त त्रास! त्यामुळे आहे ही अवस्था फार सुखाची! काय करायचे ते आत्ताच्याच परिस्थितीत."
(स्वगत - इसाप कोणत्या मॅनेजमेंट कॉलेजात शिकला होता कोण जाणे?
)
चतुरंग
अभिज्ञ,
त्यांच्या बरोबर कॉफी ब्रेकला तूही जा! मलाही यायला आवडेल म्हणावे आणि जरा निवांत गप्पा वगैरे माराव्यात म्हणजे कामाचे पण बोलताना टेन्शन नको!
चेष्टा सोड. त्यांना असाइनमेंट देताना तोंडी देतोस का? तसे असेल तर आता ई-मेल वरुन द्यायला सुरुवात कर. जे काही कामाचे बोलायचे ते ई-मेल वरुन त्यामुळे रेकॉर्ड रहाते.
ऑलरेडी ई-मेल करत असशील तर निदान महत्त्वाच्या ई-मेल्सवर तुझ्या बॉसला सीसी टाकत जा त्यामुळे त्यालाही कळते की असाईनमेंट कोणती, डेडलाईन कधी, कोण काम करतंय आणि मुली शहाण्या असल्या तर आपसूकच दोरीत येतील. आणि कामाच्या जागी काम त्यात हयगय नाही, रडण्याला वगैरे भीक घालायची नाही!
चतुरंग
बरोब्बर
चतुरंग....
+१
चतुरंग यांच्याशी १००% सहमत.
मला हेही सांगावेसे वाटते की अभिज्ञ जे वर्णन करत आहेत त्यात हे कर्मचारी मुलीच्या जातीच्या असण्याचा फार संबंध आहे असे मला वाटत नाही. कामचुकारपणाला "जेंडर" नसते - जसे कामसूपणालाही नसते!
+१०००
>>>कामचुकारपणाला "जेंडर" नसते - जसे कामसूपणालाही नसते!
सहमत !!!
कामचुकारपणाला "जेंडर" नसते - जात नसते - धर्म नसते - पंथ नसतो.