द परफेक्ट स्टोर्म......
एकदा एक सिनेमा बघून कट्ट्यावर गेलो.....मित्राने विचारले "कुठला सिनेमा बघितला"....मी म्हणालो "कबुतर का बदला"....तो म्हणाला " हे काय सिनेमाचे नाव आहे का?"....मी म्हणालो "हो....त्याला तुम्ही "मैने प्यार किया" असे म्हणता".....
आम्ही चित्रपट शौकीन...आम्हाला कुणी एका वाक्यात जरी कथानक सांगितले तरी चालते...कोलेजच्या नावाखाली टाइमपास करत असतांना केवळ पोस्टर बघून "वेट अंटिल डार्क" नावाचा अप्रतिम सिनेमा बघितला......कुणीतरी कथानक सांगितल्यावर आणि मग ते ऐकल्यावर सिनेमा पहायला जाण्यात काय मजा?.....आणि "वेट अंटिल डार्क" सारखे सिनेमे जर कोण कथानक ऐकून बघत असतील तर त्यांना माझा सलाम...."वेट अंटिल डार्क" चे सजेशन फक्त एकाच वाक्यात होऊ शकते.....आंधळ्या बाईने केलेले स्व-संरक्षण....कसे ते पडद्यावर बघा की.....
अहो "तुफान" नावाचा अमिताभचा सिनेमा आला होता...त्यावर सर्व वर्तमान पत्रांनी दणकून टीका केली तरीपण "अमिताभच्या" रसिकांनी तो पहायचा सोडले नाही....आणि वर्तमान पत्रांनी नावाजलेला "काकज के फूल"चे पोस्टर बघायला पण कोण गेले नाही.......थोडक्यात ज्याला सिनेमा बघायचा असेल तो कसाही बघेलच आणि ज्याला तो बघायचा नसेल तो तसाही बघणार नाही....मग उगाच कथानक सांगण्यात आपला वेळ का वाया घालावा?....त्यामुळे मी मला आवडलेला सिनेमा सांगत आहे....मला आवडला म्हणून तुम्हाला पण तो आवडलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे आणि माझा तो आग्रह पण नाही आहे.........कधीकधी चांगले सिनेमे नाव माहित नसल्याने बघितल्या जात नाहीत.......म्हणून लिहित आहे.....
मागील आठवड्यात काम करत असतांना पेन ड्राईव मध्ये व्हायरस शिरला...ट्रोझन हॉर्स...नावाचा....त्याला योग्य त्या रित्या नामशेष करून टाकले....."ट्रोझन हॉर्स" वरून "ट्रोय" नावाचे काहीतरी वाचलेले आठवले म्हणून गुगलची मदत घेतली आणि मग "ट्रोय" डाऊनलोड करून बघितला...डिरेक्टर आवडला आणि मग "द परफेक्ट स्टोर्म" ह्या सिनेमाचा शोध लागला...जरा चांगला असेल असे वाटले म्हणून त्याला पण कॉम्पूटरच्या हार्डडिस्क टाकून दिले....आणि बघितला....
लिंक देत आहे...कथानक वाचा आणि मग ठरवा....
http://en.wikipedia.org/wiki/The_Perfect_Storm_(film)
प्रतिक्रिया
23 Feb 2012 - 5:19 pm | असुर
इतक्या गावगप्पा मारायच्या ऐवजी चित्रपटाबद्दल लिहीलं असतं तर बरं होतं.
त्यात तुम्ही विकीपेडीयाची लिंक देऊन टाकलीत. हे म्हणजे क्याडबरीच्या रॅपरखाली हिंगाची गोळी निघाल्यासारखं वाटतंय. चव तर बेक्कारच, पण घाण वाससुद्धा येतो त्याचा.
--असुर
23 Feb 2012 - 7:04 pm | विजुभाऊ
म्हणजे क्याडबरीच्या रॅपरखाली हिंगाची गोळी निघाल्यासारखं वाटतंय.
अरारारारारारारा बेक्कार प्रतिसाद............... १००००००० % मार्क
23 Feb 2012 - 9:55 pm | तुषार काळभोर
बेक्क्क्क्क्कार्र!!
23 Feb 2012 - 5:23 pm | मुक्त विहारि
@ असुर.....चित्रपट बघावा हा सल्ला आहे....परिक्शण नाही.....
23 Feb 2012 - 6:17 pm | आत्मशून्य
अगदी तंत्रज्ञानाने अत्यंत ओतपोत भरलेलं. मुक्तक म्हणुन टॅग न केल्याने लोकांचा गोधळ उडतोय, मजा येतेय, लगे रहो. पुभाप्र ;)
असो स्टारकास्ट सॉलीड होती म्हणुन बघायला गेलो होतो. कथा म्हणुन फार आवडला नाही. कथेचा संबंध नाही पण टीटॅनीक च्या लाटेवर प्रेक्षकांच्या डोक्यावर मारलेली अजुन एक शोकांतीका इतकच वाटुन गेलं. वादळाची द्रुश्ये नक्किच थरारक आहेत पण ...
23 Feb 2012 - 6:15 pm | वपाडाव
नेमका कुठला सिनेमा सुचवलाय काही कळेल का?
23 Feb 2012 - 6:45 pm | उदय के'सागर
ओके...