गुन्हेगारीचे राजकीयकरण ....

यशोधन वर्तक's picture
यशोधन वर्तक in जनातलं, मनातलं
22 Feb 2012 - 5:26 pm

आयबीएन लोकमत वाहिनी वर प्रसारित झालेल्या " आजचा सवाल " या कार्यक्रमात ...राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावर चर्चा झाली. राजकीय पक्षाचे प्रमुख आणि जबाबदार पदाधिकारी गुन्हेगारांना निवडणुकीची तिकिटे का देतात नेते आणि उमेदवार गुंडांची मदत का घेतात किंवा घेतात की नाही ? असा साधारण चर्चेचा विषय होता . ही चर्चा बघताना आणि ऐकताना ..." सिंघम " सिनेमा बघताना जितकी करमणूक झाली नाही तेवढी करमणूक झाली. अनेक पक्षांचे नेते येवून गुंडांना निवडणूक लढवण्यापासून कसे रोखता येईल त्याची उपाययोजना करण्याच्या गप्पा मारत होते. त्यांच्या चेहेर्यावरील साळसूद भाव बघताना खूप गम्मत वाटली.

निवडणुकीमधील २५० गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांची यादी आयबीएन लोकमत ने प्रसिद्ध केली ....या उमेदवारान वर खून ....दरोडा... खंडणी...जुगार ..बेटिंग ...विनयभंग इत्यादी गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत. आता या लोकांना जनता निवडून देते का हे पुढच्या काही दिवसात कळेलच. परंतु या निमित्ताने एक गोष्ट लोक लक्षात घेत नाही आहेत कि अगदी ९९.९९ टक्के ( ०.०१ टक्का काही खरच सज्जन उमेदवारांकरिता राखला आहे ) उमेदवार हे मनगटशाही चा वापर करतातच. वे वर पाहणाऱ्या सामान्य जनतेला काही काळात नसेल परंतु वरून अतिशय सभ्यपणा दाखवणारा उमेदवार आतून अतिशय खुनशी असतो . आपल्या प्रभागात कोणी इतर व्यक्तीने मोठे होवू नये अशी सतत धडपड हे लोक करत असतात. साधारणतः सामान्य मतदार प्रचार वागिरे च्या भानगडीत नसतात परंतु हे संभावित उमेदवार आपल्या विरोधी प्रचार करण्याचा कोणी सामान्य माणसाने प्रयत्न केल्यास त्या ला धमक्या ..धाक धाखावला जातो परंतु काही वेळा तर मारहाण केली जाते आणि त्याला वैयात्तिक हेवे दावे असे रूप देण्यात येते. नीट निरखून पाहिल्यास आपल्या उमेदवाराच्या आजूबाजूला वावरणारे चेहरे पाहिल्यास हे सहज लक्षात येईल कि बाहेरील गुंडांची किंवा मावाल्याचीच नाही तर अतिशय सोफास्टीकेटेड गुंडांची देखील मदत घेतली जाते हेच सत्य आहे. किंबहुना मनी पॉवर बरोबरच जोरदार मसल पॉवर नसेल तर उमेदवारांना तिकिटेच मिळणार नाही. कारण मनी पॉवर जरी असली तरी ती उपयोगात आणण्याकरिता मसल पॉवर ही लागतेच. आपण उमेदवारांकडे लायसन्स पिस्तुल असण्याची चर्चा ऐकतो परंतु आजकाल उमेदवारांच्या मागे उभे असणाऱ्या अनेक लोकांकडे देखील अशी लायसन्स किंवा बेकायदा पिस्तुले असतात ही वस्तुस्थिती आहे . निवडणुकींच्या तोंडावर आणि त्या आधीही प्रभागातील विकासकामे आणि त्यांचा दर्जा या विषये शंका उभ्या करणाऱ्या नागरिकांना कोठला आणि किती त्रास होतो ते न विचारालेलेच बरे . गाड्यांचे नुकसान करणे . विजेचे किंवा फोन च्या कनेक्शन वायरींचे नुकसान करणे ...घरासमोर कचरा टाकणे कचरा उचलायला नकार देणे ..घरातील महिलांची छेडछाड करणे त्यांना त्रास देणे ......मारहाण करणे ..धमक्या देणे ....या आणि अश्या अनेक पातळीवरील मनस्तापाला तोंड द्यावे लागते . सरकारी यंत्रणा अश्या लोकांच्या पायाशी लोळण घेत असल्या मुळे आधारही मिळत नाही आणि हळू हळू त्यांच्या ही नकळत हे असे कर्तव्य दक्ष नागरिक या दडपशाही पुढे झुकू लागतात.
त्यामुळे तुमचा प्रभागात कार्याचा डोंगर उभा करणारा...सो कॉल्ड...धर्मवीर ...कर्मवीर...दानवीर.....कार्यसम्राट ..हृद्य सम्राट ...असा लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात कसा आहे याचा अंदाज घ्या. असे साळसूद दिसणारे कार्यासाम्रात प्रत्यक्षात वेगळे असू शकतात.
फक्त निवडणुकीत मदत केली नाही किंवा विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून रक्तपात करणारे राजकीय गुंड नेत्यांचा सूळसुळाट झाला आहे . आता एवढ्या छोट्या गोष्टींवरून प्रतिस्पर्ध्याचा जीव घ्यायला तयार होणारे हे राजकीय गुंड पुढे जावून महानगर पालिकेतील कंत्राटे मिळवण्या करिता स्थाई समिती सदस्यांचे देखील खून पडतील. त्या मुले आपण सर्व सुज्ञ नागरिकांनी मिळून अश्या समाज कंटकांना सत्तेच्या सोपणापासून कटाक्षाने दूर ठेवले पाहिजे .

यशोधन वर्तक
9323938290

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Feb 2012 - 6:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मला वाटले तुम्ही काही उपाय शोधलात कि काय यावर..
पण तुमचे आपले तेच.

त्या मुले आपण सर्व सुज्ञ नागरिकांनी मिळून अश्या समाज कंटकांना सत्तेच्या सोपणापासून कटाक्षाने दूर ठेवले पाहिजे .

अगदी बरोब्बर, पण कसं ते सांगा की. :(

अन्या दातार's picture

22 Feb 2012 - 6:44 pm | अन्या दातार

काशीस जावे नित्य वदावे ;)

मोदक's picture

22 Feb 2012 - 7:47 pm | मोदक

+११११११११

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

रघुपती.राज's picture

24 Feb 2012 - 5:28 pm | रघुपती.राज

वद जाउ कुणाला शरण?
करील जो हरण सकटाचे....

अनुस्वार कसा देतात ते कुणी सागेल का?