' सच्या दिलाचा राजा '
हातावर बसलेली माशी जशी पटकन आपण उडवावी तशीच माझ्या अंगावरील पांघरुणे मी उडवली कारण आज होता; निवडणुकीचा निकाल या धावपळीत दिवस गेला. मावळत्या दिशेला पाहिलं तर दिवस कासराभर राहिला होता. पाहता - पाहता अजगराने जसा बेडूक गिळावा तसा अंधाराने दिवस गीळाला. मी माझ्या वाड्यात आलो तर सर्व वाडा चीडीचाप स्मशान शांतता. एरवी असणाऱ्या दिवसात आणि आजच्या असणाऱ्या दिवसात जमीन आसमानाचा फरक होता हे पाहुन मला काही वेळ करंट बसल्यासारखे झ|ले असा का ?
आत येवून बसलो तर अंगणात ७० ते ९० वर्षाच्या वृद्ध आजी येवून बसल्या होत्या आणि त्यांची चर्चा सुरु झाली व्ह्य ग.
हिराबाई : आज लय वंगाळ झाल. नाना पडायला नाह्य पाहिजे व्हता कसतरीच व्हतय बघ.
राहिबाय : नाना गोर गरीबाचा वाली होता नाह्या का ग .
खवले आजी : हो ग. बाई हुंकार देत हिराबयीनी डोळावरील चेष्मा काढला आणि एखाद्या ड्रायव्हरने गाडीची काच सोछ साफ करावी तशी स्वताच्या पदराने चेश्म्याची काच साफ केली. आणि कोल्ह टेकनी हिराबाई बसली. चर्चा रंगत गेली काही काळानंतर वाड्यात एक एक माणूस जमू लागला पाहता पाहता नदीला पूर यावा आणि पूर्ण तीर व आजू बाजूचा परिसर पुराच्या पाण्यात बुडून जावा तसाच वाडा व वाड्याचा परिसर लोकांनी भरून गेला.आणि प्रत्येकाच्या तोंडून आल. नानाला आताच्या आता भेटायचं वाड्यातील सर्व लहान थोर मंडळी जमा झाली आणि नानाच्या वाड्याच्या दिशेने निघाले मी आपला शांत शांत आणि शांतच नदीच्या पाण्यासारखा वरून शांत आणि आतून प्रवाहित असलेला. एखाद्याने लांबची व्यक्ती दुर्बिणीतून निरखून पहावी तसे आजीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली येतोय का रे बाबा ! मी आपला नंदी बेलासारखी मान हलवली आणि निघालो नानाच्या वाड्याच्या दिशेने वाड्याच्या बाहेर काही वेळ थांबल्यानंतर घोषणांचे आवाज येवू लागले जशी दुरून घंटेचा कानावर आवाज यावा अगदी तसेच पाहता - पाहता माझ्या समोरच्या दिशेने जसा एकादा बांध फुटून पाण्याचा लोंढा यावा तसा माणसाचं लोंढा माझ्या दिशेने येत होता. पाहता - पाहता सर्व जण नानाच्या वाड्यात आले आणि आवाज देवू लागले आम्हाला नानाला भेटायचं हाय.
हा सर्व गोंधळ ऐकून नाना बाहेर आले जसा कुस्तीच्या फडात पेलवान पडावा व तो चालत यावा तसा नाना चालत आला. वाघासारखा बलदंड असणारा नाना च्या चेहऱ्यावर अमावस्याच काळोख पडल होत पण समोरचा जनसागर बघून, लोकांच प्रेम, लोकांची आस्था पाहुन नानाचा चेहरा पौर्णिमेचा चंद्रासारखा लख उजळला. घोषणा सुरु झाल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नानांनी सर्व शांत रहा अस अभिवादन केल. जसा राजा त्याच्या सिंहासनावर बसावा तसा नाना खुर्चीवर बसला आणि बोलू लागले. क्र्फुम लागावा तसा संपूर्ण वाडा शांत. मध्येच एक आजी बोलली नाना तू घाबरू नको आम्ही तुमच्या पाठीशी हाय.
नाना : मी आता नगरसेवक नसलो तरी मी तुमची काम करणार तुम्हाला मदत अडचणीला तुमच्या पाठीशी उभा राहणार अस समजू नका मी पडलो म्हणून मी तुमचा रागराग करीन. समुद्यातून टाळ्या जलोश.
नाना : काही हि अडचण आली तर रात्री बारा वाजता मला कळवा नाना तुमच्या मदतीला धावून येईल. पुन्हा जलोश. नानांनी केलेली कामे गरिबांच्या मदतीला धावून गेलेले नाना. पण काहींच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या नानाच्या या संवादावरून. लोकांना घरी जाण्याचे आव्हान नानांनी केले लोक आलेल्या पावलांनी घरी जाऊ लागले मी आपला तेथेच स्तब्द त्या वटवृशासारखा तो सर्व क्षण डोळ्यात साठवताना.
राहीबाई आजी ताडाच्या झाडासारखी उंच नाना जवळ गेली आणि नानाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली नाना घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी हाय. धारीनला कंप यावा आणि धरणी हलावी तसा आजींचा हात नानाच्या डोक्यावर तर कधी केसांत कधी कपाळावर हलत होता. दुसऱ्या आजीने त्यांचे सांत्वन करत होत्या. मी आपला शांत शांत शांत आणि शांतच आजवर नेते मंडळींना पुढाऱ्यांना लोक वाईट बोलताना पाहिले. पण आज मात्र नेत्यासाठी अश्रू ढाळताना मी पहिल्यांदाच पाहिलं हे सर्व पाहुन मी माझ मन माझ शरीर सुंन सुनं झाल आणि माझ्या डोळ्यांच्या मेघांतून वळवाच्या सरीसारखे अश्रू येऊ लागले पहिला अश्रू गालावरून सरळ खाली गेऊन गेळ्याला येऊन भेटला. क्षण भर देवावाकडे मागणे केले देवा तू माझ्या डोळ्यांना क्यामेरा बनवले असते तर हे सर्व क्षण माझ्या डोळ्यात टिपून ठेवले असते . मला राहवलं नाही मी तडकन आल्या पाउलांनी माघारी निघून आलो. रस्तांनी अश्रूंची पेरणी करत.
जाता जाता माझ्या तोंडून शब्द पडले
झाले बहु , आहेत हि बहु, होतील हि बहु परी तू तुझासं सारखा .
प्रतिक्रिया
21 Feb 2012 - 2:18 pm | पारा
विषय छान ! मांडणी थोडी खटकली !
21 Feb 2012 - 2:24 pm | गवि
छान आहे छोटीशी गोष्ट..
उगाच आपली एक सुचवणी.. प्रत्येक वाक्याला न चुकता एक उपमा वापरलीच पाहिजे असं नव्हे.. त्याने इफेक्ट जातो.
लिखाण आवडले आहे म्हणून केवळ म्हटलं..