" ....आभास.... "

जेनी...'s picture
जेनी... in जनातलं, मनातलं
16 Feb 2012 - 8:29 pm

हळुवार ...

हळुवार येशील आयुष्यात ...अस कधी वाटलच नव्हत ..

मनाच्याही मनातल सांगशील असही कधी वाटल नव्हत ..

स्पर्शाची भाषा ..सहवासाच जग ..मला कधी अनुभवायला मिळेल असही कधी वाटल नव्हत ...

पण तू आलास आयुष्यात असाच अगदी हळुवार ..पावलांचा आवाजही न करता .....

बर्याच दा मागे वळून पाहिलं ..पण तू कधी दिसायचास ..तर कधी ओझरता तुझा भास व्हायचा ..

मला कळायचच नाही ..मला नक्की कशाचा भास होतोय ..तुझा कि तुझ्या श्वासांचा ..

सतत चाहूल लागायची कि चालताना बोलताना .तू माझ्या जवळ आहेस ..

तुझ्या पावलांवर माझ पावूल पडतंय ..तुझ्या चेहेर्यावर माझी सावली पडतेय ..तुझ्या पापण्यात माझी आठवण साठ्तेय ....

पण खरच तुझा मला इतका भास होतो का?.....

होतो ...मला तुझा भास होतो .........

बरोब्बर एक वर्ष झाल तू मला भेटला होतास ..अगदी पहिल्या भेटीत नाही ,पण दुसर्या ..

तिसर्या भेटीतच तुझ्याबद्दल खूप उत्सुकता वाटू लागली ..

काय होत तुझ्यात अस माहित नाही ..कधी कळलच नाही ..नकळत ..अगदी चुकुनच ..

चुकीची वाट पकडूनच तुझा ,माझ्या आयुष्यात प्रवेश झाला ....

मी स्वताहाला मोहापासून बरच दूर ठेवल होत ..पण तुझ्या मोहिनिपूढे ..माझ बळ कमी पडल ....

कदाचित तुझ्या डोळ्यात ती जादू होती ...नसेल ..बहुतेक तुझ्या बोलण्यात ..

किवा मग ती तुझ्यातच ...मी मात्र वाहात गेली तुझ्या शब्दांच्या प्रवाहात ........

सुरुवातीला तुही बरेच आढेवेढे घेतलेस ..कधी अबोला धरलास तर कधी बोलायला भाग पाडलस ..

मग माझ्या बोलण्याकडेही दुर्लक्ष केलस ..

पण मी ..मी मात्र अश्या ठिकाणी जावून पोहोचले ..जिथून मागे फिरताही येत नव्हत ..अन पुढे जायला भीती वाटत होती .

भीती ह्याची कि ..मला शेवटच माहित नव्हता ..

किवा त्या ' शेवट 'ह्या शब्दाचीच भीती वाटत होती ........खर सांगू का ..पण तुझ्यात अडकून रहायचं होत ,गुंतून रहायचं

होत .......

हा गुंताही असा काहीसा घट्ट करायचा होता कि तुलाहि कधी सुटू नये ......

त्या गुंत्यात मग आठवणीतले क्षण ....अनुभवलेला सहवास ....कधीतरी मग शब्दांनीही अंगावर उठणारे अबोल शहारे ....

पापण्यांची हलकीशी होणारी उघडझाप ..त्यात्नच चोरून तुला बघणारी माझी नजर ..

माझे तुझ्यासाठी तुझ्याच मनावर उमटणारे शब्द ....ह्यांच जाळ मला विणायचं होत ..आणि झालही तसच .हे सगळ

नकळत होत गेल .....

समजण्या आधीच मी पार नकशीकांत बुडून गेले ..

तुला त्याचा गंधही नव्हता ..कि कुणीतरी इतका जीव लावतंय ..इतक वेड होतंय आपल्यासाठी ...

तुझा स्वभावच होता .....कधीही कुठल्याच गोष्टीला प्रतिक्रिया न देण्याचा ..शांत राहून ..माझी तळमळ बघण्याचा ......

माझ्या मनातले शब्द .. कागदावर उमटवन्याला तूच तर कारणीभूत झालास ..

तुझ्या ह्याच स्वभावाने मला तुझ्याकडे खेचल ..मी तुझ्याकडे आले ..अशी आले कि परत जाण्यासाठी मागे एकही मार्ग

शिल्लकच राहिला नाही ..

पण ..पण मग मी आभासी जगात जावून पोहोचले ... तू नसतानाही असल्याचा भास ...तूझ्या आभासी जगात माझा वावर ..

तू जवळ नसतानाही तुझ्या श्वासातली उब देखील मला जाणवू लागली ....

तू सोबत नसतानाही ..तू अगदी बरोबर चालतोयस ..क्षणा क्षणाला माझ नाव घेवून माझ्याशी बोलतोयस ..असले भास ........

ह्या भासातच जग जगू लागले मी ....

आभासी जग ..अतिशय नितळ आहे ..ज्याला शेवट ह्या शब्दाचा अर्थ माहित नाही अन निर्मळ हा शब्द त्याच्या यादीतही

नाहीय ....

शेवट ह्यासाठी माहित नसेल ..कि बहुतेक ह्या जगातून बाहेर पडण्यासाठी आपली स्वतःची मानसिक तयारी होत नसेल ..

आणि निर्मळ ह्यासाठी यादीत येत नसेल ..कि बहुतेक ..लोक ह्या जगाला ..

ह्या भास होण्याला वेडाच नाव देतात .....म्हणून असेल ..

पण खरच हे एक वेडच आहे ..वेड्या राधेलाही म्हणे कृष्णाचे भास व्हायचे ....... सागरालाही लाटांच्या जिवंत होण्याचा भास

होतो म्हणतात ...

क्षितिजावर धरणीला आभाळाच्या स्पर्शाचा भास होतो ..असही ऐकलय ......हम्म कवितेतच ऐकलय..पण अर्थ लावताना

किती सुंदर वाटल ..हे शब्दात नाही सांगता यायचं .....

त्या शुभ्र चान्दनिलाही खूपदा चंद्राच्या कुशीत शिरावस वाटत ..पण तिला नाही जमत ..

रात्रीलाही पहाटेच्या सोबत कितीदा फिरावस वाटत ..

पण तिलाही नाही जमत .....किनार्यालाही धावत येणाऱ्या लाटेला मिठीत घेवून तिला सोडावंसच वाटत नाही .

.."थोड ..अजून थोड.. थांब "

म्हणत म्हणतच हात सोडावा लागतो ..मग का त्या लाटेला त्याच्याजवळ थांबता येत नाही ??

क्षणिक सुखाच आमिष दाखवत दहादा मिठीत येन अन त्याला दूर लोटन ..किती योग्य आहे ?........

पण नक्की कुणाला कुणाचा कितीसा सहवास .....

कितीसा स्पर्श आनंद देवून जाईल सांगता नाही येत ....

ह्याच आभासात मीही अडकलीय रे ..बाहेर निघताही येत नाहीय ...कधी कधी मग वाटून जात का यायचं बाहेर ....

स्वताहून तर आलोय ..कुणी जबरदस्ती केली होती का?..

तुझ हसन ..तुझ बोलन ..तुझ चिडण ....तुझ वैतागण ..अगदी तुझ्या चेहेर्यावरचा निरागस खोडकर पणाही ..

तू नसतानाही माझ्या भोवती असतो ..

मग तू आहेस ..जवळ आहेस ह्या कल्पनेतच मी रमून जाते ...

तुला कधीच ह्याची जाणीव झाली नसेल ..पण मला मात्र क्षणाक्षणाला होते .....परवाचीच गोष्ट .... रस्त्यावरून चालताना

सहजच अंगावर रोमांच आले ..आधी वाटल ,हवेतल्या गारव्याच्या खोड्या ह्या ..

पण नाही ..मग एक ओळखीचा स्पर्श ..एक मखमली मोहोर अंगावर आला ... हळूच मागून येवून तुझ्या मिठीतले

ते क्षण पुन्हा , माझ्या श्वासातल्या वेगाशी खेळू लागले .....

काही कळायच्या आत माझ्या पापण्यांच्या तळाशी तुझ्या ओठातले शब्द सजून गेले ..

कानावर तुझ्या ओठांची हलकीशी कुजुबुज झाली...

अगदि त्या कुजबुजन्याचाहि स्पर्श ..असंख्य पावसाच्या थेम्बापरी ..शहार्यांचा पावूस पाडून गेला ...

मी इतकी कावरी वाबरी झाले कि कळलच नाही ..काय झाल ते ..मग क्षणात सगळ सुटून गेल ......

'बेधुंद नजर '..काहीवेळा पूर्ती स्वतःच भान हरवून बसली होती ......

तिलाही अगदी पूर्ववत होताना काहीश्या वेदना जाणवल्या असतील ... .......

मला सवय जडलीय का रे ह्या आभासाची ? तू नसतानाही तुझ्यात रमण्याची ? तू आहेस ..तुझा सहवास आहे ..

ह्या कल्पनेला जिवंत करण्याची ? मग ह्या कल्पना जिवंतही होतानाचा भास का होतो मला?..

मी का ह्या मृगजळाला हातात पकडण्याची , त्यावर जीव गुदमरून जाईल इतक घट्ट पकड ठेवण्याची चूक करते ?....

म्हणजे माझे भास ..माझ्या कल्पना ..माझ जग ..हे मृगजळा सारख आहे ,

ह्याचीही जाणीव मला आहे ...पण मग ..मग का ...?

कसे असतात ना हे प्रश्न ..अर्ध आयुष्य तर पोखरून खातात . उत्तर शोधायची ,

त्यांचा अर्थ लावायची सवय लावून जातात ....

त्यापेक्षा माझे भास बरे ..निदान काही क्षण तरी मनाच समाधान करून जातात ....

काल संध्याकाळी नदीच्या किनार्यालगत असणारी..झाडांच्या सावलीन झाकलेली पावूल वाट उगाच तुडवत होती ..

तेव्हाही असच ......

माझ्यासोबत तुझी पावल चालत होती , अगदी हातात हात घालून ...

क्षणभर माझ्याकडे बघत तुझी नजर माझ्याशी बोलत होती .....ओठांवर तुझ्या ,माझ्याच शब्दांची सांगड होती ..

मलाही तेव्हा तुझी सोबत हवीहवीशी वाटली होती ......

खर सांगू .....मी तुझा सतत विचार करते ...अगदी सूर्याच पहिलं किरण.... येताना माझ्यासाठी तुझ्या रोज नव्या विचारांच

गिफ्ट माझ्यासाठी घेवून येतो ..आणि जाताना ...दिवसभर साठवलेली उर्जा तो रात्रीला देवून जातो ...एका निरोपासकट .

रात्र ती नव्या विचारांची उर्जा ...माझ्या स्वाधीन करून जाते .....मग पुन्हा नव्या नव्याने माझ आभासी जग तुझ्या विचारांनी

मोत्यांच्या माळा सजाव्यात तस सजत ...

वेडी आहे , मी खरच वेडी ...पण हे खरय ..तुझे आभास होतात ..तुझी जाणीव होते ..तुझा सहवास मिळतो ..

तुझा स्पर्श कळतो ........

तुझी नजर समजते ..तुझे शब्द उमगतात .....

काळजाच्या अंतरातही तुझ्या भावना ..माझ्या सवेदनांशी नात जोडतात .....आवाजाशिवाय मिळणारी तुझी हाक ...

स्वप्नांशिवाय दिसणारा तुझा चेहेरा ..प्रश्नांशिवाय मिळालेलं तुझ उत्तर सारच माझ्या आभासाच्या जगात मुक्तपणे

विहार करताना दिसतात .....

कधी वाटत तुलाही सांगाव ..थोड माझ्यासारखं जगून बघ ........मला डोळ्यातल एक छोटस स्वप्न बनवून बघ ...मला

हृदयातल्या स्पंदनाच रूप देवून बघ ... पण ..पण मग नको वाटत ..

वाटत ह्या भासानी तुला आनंद न देता ..छळल तर ....आणि त्या भासांपासून सुटका करून घेण्यासाठी ,

तू माझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतलास तर ...? नको , त्यापेक्षा माझ जग माझ्यासाठीच .....

तू तिथे येवून जावून रहा ..पण ह्या जगाशी कायमचा संबंध नको ......

मनातल्या आठवणींच्या घड्या घालताना , त्याना सावरून ठेवताना , मनाचा स्वतःचाच पसारा नकळत वाढतो ...

अन मग आवरण्याचा प्रयत्नही फसतो ......

मुक्तपणे जगताना , काही गोष्टींच भान ठेवायला हव होत , पण काही धुंद क्षणात आपलाही तोल जातो ......

आणि मग जगण्याचा दृष्टीकोन आपोआप बदलतो ..

मला आता सवय झाली ह्या जगात भटकण्याची ....लोकान कडन " वेडी आहे " अस म्हणून घेण्याची .......

" भास होतात हिला , हिच्याच जगात असते " अश्या काही बोलण्याची ..

पण खरच ...खरच भास होतात ..मला तुझे ..तुझ्या असण्याचे भास होतात ......

**************************************************************
पूजा ...

मनातल शब्दात मांडण्याचा एक प्रयत्न ....

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

मनातल शब्दात मांडण्याचा एक प्रयत्न ....

आवडला! Smiley

मस्त कलंदर's picture

16 Feb 2012 - 8:44 pm | मस्त कलंदर

ठीक प्रयत्न आहे. फक्त विरामचिह्नांची रांगोळी कमी करा आणि शुद्धलेखनाचं पण जरा मनावर घ्या. हवंतर मी सुरवात करून देते.
नकशीकांत नव्हे, नखशिखांत!! (आधी मी क्षणभर आता हा कुणाचा कांत? म्हणून कोड्यात पडले होते)

कपिलमुनी's picture

21 Feb 2012 - 7:34 am | कपिलमुनी

ती विरामचिन्हे म्हणजे स्वप्न चालू असतानाचा मधला घोरण्याच्या आवाजाचे प्रतीक आहे

जेनी...'s picture

21 Feb 2012 - 9:35 am | जेनी...

:D

मनाच्याही मनातल सांगशील
हे वेगळं म्हणून आवडलं.
बाकीचं जरा स्वप्नाळू वाटलं.

ह्म्म पन इथे लिहिताना खूप प्रोब्लेम येतोय..
शुद्ध लेख्नाच अशुद्ध लेखन होतय ,
ते थ ,द च त्बोल्त्त्याबोल होतोय |( \( :angry:
र्तरि बरिच विराम चिन्न्ह आवरति घेतलियेत8) 8-) :cool:

मी नक्कि प्रयत्न करेन :).

प्रभो's picture

16 Feb 2012 - 8:58 pm | प्रभो

http://www.misalpav.com/node/1312

ह्या धाग्याचा वापर करा.

चेतनकुलकर्णी_85's picture

16 Feb 2012 - 10:49 pm | चेतनकुलकर्णी_85

http://www.google.com/transliterate/Marathi
इथे टंकन करून मग चिकटवा कि इथे... :)

हे जरा सैल , ढिसाळ , ऊगाचच कापसासारखे भुर्भुरित वाटले.

प्राजु's picture

17 Feb 2012 - 12:50 am | प्राजु

फारच स्वप्नाळू..!
दोन ओळींमध्ये जागा सोडली नसती तर जरा लांबी आटोपशीर वाटली असती.
असो लिहित रहा.

पक पक पक's picture

17 Feb 2012 - 8:36 am | पक पक पक

फारच स्वप्नाळू..!

पुजा बाई (ताई)स्वप्न रोज रोज पाहु नका स्वप्नात देखील अंतर ठेवा.. ;)

पण मी ..मी मात्र अश्या ठिकाणी जावून पोहोचले ..जिथून मागे फिरताही येत नव्हत ..अन पुढे जायला भीती वाटत होती .
भीती ह्याची कि ..मला शेवटच माहित नव्हता ..
किवा त्या ' शेवट 'ह्या शब्दाचीच भीती वाटत होती ........खर सांगू का ..पण तुझ्यात अडकून रहायचं होत ,गुंतून रहायचं
होत .......
हा गुंताही असा काहीसा घट्ट करायचा होता कि तुलाहि कधी सुटू नये ......

व्वा व्वा काय लिहीले आहेस ग पुजा तै ,मस्त आवड्ले :)

मृगनयनी's picture

17 Feb 2012 - 12:35 pm | मृगनयनी

पूजा'जी... मनातल्या सुन्दर भावना निष्पाप शब्दांत मान्डल्या गेल्या आहेत...... :) आवडल्या..

यामध्ये तुमच्या "सुब्या"चा चेहरा तुमच्या नजरेसमोर होता का? ;) ;)

गणेशा's picture

17 Feb 2012 - 12:26 pm | गणेशा

लिखान आवडले..
स्वताच्या मनाशीच लेखातील नायिकेचा चाललेला आभास आवडला..

अवांतर :
तरीही एक प्रश्न आहे ( जनरल) , जो मला नेहमी पडतो ..

एक संदर्भ इथलाच घेतो:

तुला त्याचा गंधही नव्हता ..कि कुणीतरी इतका जीव लावतंय ..इतक वेड होतंय आपल्यासाठी ...

तुझा स्वभावच होता .....कधीही कुठल्याच गोष्टीला प्रतिक्रिया न देण्याचा ..शांत राहून ..माझी तळमळ बघण्याचा ......

ह्या अश्या मुलांच्या मागे मुली का वेड्या होतात बरे... ?
प्रत्यक्षात ही पाहिले आहे, निगेटीव्ह गोष्टीं असणार्या मुलांकडे मुली लवकर आकर्षित होतात.. आणि मग वेड लागल्या प्रमाणे करत राहतात..

ह्या अश्या मुलांच्या मागे मुली का वेड्या होतात बरे... ?

मी याचं उत्तर देतो..

सहज न मिळणार्‍या, दुष्प्राप्य अशा व्यक्तिमत्वाच्या मागे काही मुली लागतात कारण त्या दुर्मिळपणाचंच आकर्षण असतं. अचिव्ह द अनअचिव्हेबल असा प्रयत्न आणि त्याला थंड प्रतिसाद मिळाल्यावर मग "त्याचा तसा स्वभावच आहे मला तडफडत ठेवण्याचा" अशा समजुती करुन घेऊन त्याला काहीही करुन मिळवायचे अशा जिद्दीने मुली आणखी आकर्षित होत राहतात.

पण..

अशा कॅरेक्टर्सची लग्नं यशस्वी किंवा आनंददायक होत नाहीत. जे मिळत नव्हतं ते मिळालं की त्यातली सगळी उत्सुकता आणि जिद्द निघून जाते..आणि रोजच्या जगण्यात तो पोराचा तुसडा स्वभाव त्रासदायक व्हायला लागतो.

त्यापेक्षा पोरीला तडफडायला न लावणारा, प्रेम करुन ते तोंडावर दर्शवणारा सरळ मुलगा कदाचित कॉलेजात कॅसानोव्हा बनत नसेल पण "लंबी रेस" मधे नवरा म्हणून व्हायेबल होतो..

पक पक पक's picture

17 Feb 2012 - 4:22 pm | पक पक पक

गवी ,
सहमत आहे .कस एक्दम माझ्या मनातल बोललात हो. हे असच होत असत.
'त्ये षोड्श वर्षए सुंदरी गर्दभा भवेत ' अशाच काहिश्या मुलिंच्या देखील भावना असतात... ;)

पैसा's picture

17 Feb 2012 - 4:42 pm | पैसा

जे सहज मिळू शकतं ते सोडून अशक्यप्राय गोष्टी मिळवायच्या मागे लागण्याचाच बहुतेकांचा स्वभाव असतो!

अन्नू's picture

17 Feb 2012 - 1:01 pm | अन्नू

च्यायला आंमच्याकडे जरा बघ म्हटल तरी कोणी ढुंकूनही बघायला तयार नसतात आणि नको त्याच्या पाठीमागे सारख्या लागतात!

आमचे लव्ह स्टेटस= गर्ल फ्रेंड
= गल च फेंड
= खरच की येडं!

गोमटेश पाटिल's picture

17 Feb 2012 - 4:04 pm | गोमटेश पाटिल

हे बाकि पटल बुवा...

जयवी's picture

17 Feb 2012 - 1:32 pm | जयवी

खूप गोड आणि स्वप्नाळू......... आवडेश :)

sneharani's picture

17 Feb 2012 - 1:39 pm | sneharani

मस्त मस्त!!

मोहनराव's picture

17 Feb 2012 - 2:23 pm | मोहनराव

तै, कसं बरं जमतं हे हो सगळं? छान छान!
तेवढं ते जरा रांगोळीच जरा मनावर घ्या बुवा!

आदिजोशी's picture

17 Feb 2012 - 2:43 pm | आदिजोशी

सुरुवातीच्या काही ओळींचा फॉर्मॅट बरा वाटला. पण तेच तेच, तसंच तसंच, तुटक तुटक, स्वप्नाळू स्वप्नाळू खूप खूप खूप खूप वेळ सुरूच होतं. शेवटपर्यंत वाचलं नाही.

मेघवेडा's picture

17 Feb 2012 - 4:57 pm | मेघवेडा

तंतोतंत.

तेरी आंखोसे आज मै खुदको देखना चाहता हुं
तह ए दर्या से किनारा आजमाना चाहता हुं

दादा कोंडके's picture

17 Feb 2012 - 6:47 pm | दादा कोंडके

रोडीज ऑडीशनचे काही नविन विडीओज यु-ट्युबवर बघावे म्हणतोय.
लिंका देतो नंतर.

बाकी फोटो छानच.

जेनी...'s picture

17 Feb 2012 - 10:06 pm | जेनी...

चर्चासत्र बनवुन ठेवलत कि राव ,

आवडनार्याना धन्यवाद ....:)

न आवडनार्यना.... काय बि नाय :~ :-~ :puzzled:

पन गवि नच्या मतावर थोड बोलेन ...

सगळ्यान्चा स्वभाव सारखा नसतो ..वेगळेपन जपनारे बरेचजन असतात ...
काहिना मुलिन्च्या मागे मागे करायचि सवय असते ..त्यन्च्याबाबत स्त्रीला नेहेमि शन्का कुशन्का रहाते ..तर जो पूरुष
कुनालाही अवाजवि महत्व न देता .. आपला स्वाभिमान जपून ज्यला त्यच्या व्यक्तिमत्वानुसार किम्मत देतो ...म्हनजे
त्याच्या त्याच्या गुनाना महत्व देवुन तेच जपन्याचा प्रयत्न करतो ,बहुतान्शि मुलि त्यच्याकडे आकार्षित होतात ..

रोजच आयुश्य मिळमिळित जगन्याचि ज्याना सवय असते ,त्याना रोजच्या दिवसात नाविन्याचि ओढहि नसते ,
' लम्बि रेस ' के घोड्यान्च मग तेच तेच " तु सुन्दर आहेस" ( नसलि तरि ) .." तु मला आवडतेस "( बरचस खटकत असल
तरि ) नन्तर नन्तर कन्टाळवान सुद्धा होवु शकत , त्यापेक्शा ,

तडफडाय्ला लावानारा किवा तिच्या तळमळितच प्रेमाचि ओढ निसन्कोच पणे जपनारा , ती ओढ तशीच टिकवुन
ठेवन्याचा प्रयत्न करत रहातो ,अर्थात एखादि मुलगि ..जर एखाद्या मुलावर प्रेम करत असेल ,तर ,तिला त्यच्या स्वभावाच्या
सगळ्या बाजु मान्य असतात.

माझ मत मी मोकळेपनाने मान्डलय ....( चुक भूल द्यावि घ्यावि )0:) 0) 0:-) :innocent:

मनापासुन प्रेम करणारा, कधीचं वेडा नसतो.. कारण..????? ते वेड समजुन घेण्यासाठी, कधीतरी मनापासुन प्रेम करावं लागतं :)

जेनी...'s picture

17 Feb 2012 - 10:12 pm | जेनी...

आणि हो त्या ' स्वप्नाळु ' प्रतिक्रियेबद्दल मनापासुन धन्यवाद,
आभास म्हनजे एखाद्याचे स्वप्नवत जवळ असन्याचे भास ...8)

अन्नू's picture

18 Feb 2012 - 4:48 am | अन्नू

ते वेड समजुन घेण्यासाठी, कधीतरी मनापासुन प्रेम करावं लागतं

खरे प्रेम?? हं! :|

भास हे फक्त मनाचे खेळ असतात,
स्वप्नं तरी कुठे आपली असतात?
आपल्या सावलीवर जीव लावणारेसुद्धा
अंधारामध्ये एकटेच पडतात.

पैसा, डॅशींग, अट्रॅक्शन, लुक,
सगळे यावरच तर भाळत असतात!
प्रेमाचे गोंडस नाव देऊन त्याला,
सजवायचे फक्त बहाने असतात.

प्रेमाचा हा बाजार सारा,
भावना येथे शून्य असतात.
आपल्या जोडीने चालणारेही अचानक,
हात झिडकारुन मग पुढे जातात.

आधार द्यायला कुठुनसे पुन्हा
तेच हात पुढे येतात.
झोपेतुन जाग येताच मात्र,
दोंन्ही हात रिकामेच असतात... :(

कितीही हास्य आणले तरी,
डोळ्यांच्या कडा ओलावतच असतात.
बाहेरुन आवर घातलेल्या मनात,
विरहाच्या इंगळ्या कुठेतरी, डसतच असतात......... Smiley

चौकटराजा's picture

18 Feb 2012 - 8:59 am | चौकटराजा

@ गणेशा
ह्या अश्या मुलांच्या मागे मुली का वेड्या होतात बरे... ?
प्रत्यक्षात ही पाहिले आहे, निगेटीव्ह गोष्टीं असणार्या मुलांकडे मुली लवकर आकर्षित होतात.. आणि मग वेड लागल्या प्रमाणे करत राहतात..

क्या बात हे यार तू हे लिहून गेलास ! अरे भावा हे तर माझ्या प्रेमजीवनाचे सार आहे. माझी प्रोफाईल पहा मित्रानो हा आत्मा प्रेमाविना तडफडत
रहाण्याचे काही कारण आहे का .................... ?

माझ्या दहाव्याला कावळ्याला बोलावूच नका . नाही शिवणार तो !

५० फक्त's picture

18 Feb 2012 - 11:51 am | ५० फक्त

प्रचंड स्वप्नाळु आणि अतिरंजित, प्रेम हे आंधळं असतं मान्य पण आंधळ्याला सुद्धा चटके बसतातच. आणि त्या प्रेमभावनेच्या अविष्कारात सुद्धा ते चटके आपला ठसा सोडुन जातात, आणि जात नसतील तर ते प्रेम ही खोटं अन ती भावना सुद्धा खोटी अन तो अविष्कार सुद्धा खोटा.

हे नायिकेचं कथन म्हणजे मध्यंतरी डॉ. दिवटेंनी ' ब्रेकअप' चा जो लेख लिहिला होता ना त्या नायिकेचं त्या अफेअरच्या सुरुवातीच्या काळातलं चित्र वाटतंय,

मी तुमच्या मागच्या एका धाग्यावर लाटुन ठेवलेल्या मउ पण न खाता येणा-या पोळीची उपमा दिली होती, हे तर अगदी कणिक चाळताना परातीबाहेर सांड्लेली रांगोळी वाटतंय.

जेनी...'s picture

18 Feb 2012 - 12:03 pm | जेनी...

हे तर अगदी कणिक चाळताना परातीबाहेर सांड्लेली रांगोळी वाटतंय.

__________________________

:-O

ठिबक्या ठिबक्यांचि रांगोळि सुधरवते हो ...

सवय लागलिय मोडायला थोडा वेळ हवाय .
आणि थोडं विष्लेशन ( वरिल मि कोपि केलेल्या वाक्याच )अपेक्शित आहे ...समजायला अवघड जातय ....
:(

चौकटराजा's picture

18 Feb 2012 - 6:20 pm | चौकटराजा

तुला येच्या परिस सुध ल्येखन सुधारायच आसल तर वि आ बुवा यांची जूनी गोस्ट आटवते.
त्ये मदी ढोंदू नण्दण बो़डके नावाचा लेकख ष्टोरी ल्हेतो. त्येचा शेवट असा हाय

"एक दीलके हजार टूकडे हूवे कोइ ईधर गीरा कोई ऊधर गीरा " मि गुन गूनू लागलो.