नमस्कार मंडळी.. मी काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतो आहे..
१. आसाममधल्या नगाँव शहरात एका कलाकाराकडून घेतलेलं हे लघु-शिल्प.. मला व्यक्तिशः ह्यातील रंगसंगती खुप आवडली..
२. नगाँवजवळच एका जागी फिरायला गेलो असता (बायकोने) काढलेला हा फोटो..
३. ज्योतिबाच्या मंदिरात आढळलेली धर्मनिरपेक्षता..
४. आसामातल्या नगाँववरुन आता महाराष्ट्रातल्या नागावला.. अलिबागजवळच्या नागावमध्ये बघितलेली ही वेगळीच इमारत..
५. कोचिन (केरळ) इथल्या "चायनीज फिशींग नेट्स"
६. ही आहे "स्लो शटर" फोटोग्राफीमुळे झालेली प्रकाशाची रंग-उधळण..
७. आणि आता शेवटी ह्याच "स्लो श. फो." मुळे माझ्या पुतणीला असे अग्नीपंख लाभले...
पुन्हा भेटूया..
प्रतिक्रिया
13 Feb 2012 - 5:23 pm | jaypal
फोटो क्र. १,५ व ६ आवडले क्र.७ अग्नीपंख खासच.

अवांतर - "ज्योतिबाच्या मंदिरात आढळलेली धर्मनिरपेक्षता.." पोटाची रीकामी खळगी धर्मनिरपेक्षता शिकवते आणि टीकवते, पण एकदा का ती भरली की मग मात्र.........काही खर नाही त्या धर्मनिरपेक्षतेच.
आसाम + नागभुमीतील अजुन छायाचित्र येऊद्यात.
15 Feb 2012 - 4:42 pm | चिगो
च्यायला, हा फोटो कुठून आणला हो? एकदम सॉलिड आहे..
मला तरी अजून असलं काही पहायला मिळालेलं नाही..
13 Feb 2012 - 5:58 pm | गवि
वा... मस्त..
13 Feb 2012 - 6:09 pm | मी-सौरभ
पु.छा.प्र.
13 Feb 2012 - 6:10 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त हो चिगो.
कलादालनात काहितरी हटके बघायल मिळाले आज.
धन्यवाद.
15 Feb 2012 - 4:32 pm | चिगो
धन्यवाद मालक... काय म्हणताय?
13 Feb 2012 - 7:06 pm | गणपा
आवडेश.
13 Feb 2012 - 8:18 pm | मराठे
सगळे फोटो मस्त आहेत.
पहिल्या फोटोत तर लांडगा वेअरवुल्फ होताना दिसतोय.
आणि दुसर्या फोटोत क्षितिजावर चंद्रासारखा दिसणारा पांढरा गोल कसला आहे?
13 Feb 2012 - 8:53 pm | वपाडाव
काहीतरी चमकले असेल...
13 Feb 2012 - 8:19 pm | प्रचेतस
मस्त फोटो.
अजूनही येऊ द्यात.
13 Feb 2012 - 8:28 pm | जयवी
सुरेख !!
13 Feb 2012 - 8:41 pm | अन्नू
कुठे आहेत फोटो?
आयज चेक चेक चेक...
कंप्युटर चेक चेक चेक...
फोटो दिसत नसल्याने प्रतिसाद नंतर देतो!
13 Feb 2012 - 10:24 pm | पैसा
सगळेच फोटो आवडले!
13 Feb 2012 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा
आवडली हो चित्र...मस्तच आहेत येकदम...विशेषतः स्लो शटरवाली... :-)
14 Feb 2012 - 1:34 am | अन्नू
दिसले दिसले फोटु दिसले! छान आहेत.
४, ५, आणि ६ फोटु जास्त आवडले :)
14 Feb 2012 - 1:50 am | आळश्यांचा राजा
छान. दुसरा फोटो विशेष आवडला.
14 Feb 2012 - 3:34 am | पिंगू
सर्वच फोटो आवडले.
बाकी एक प्रश्न पडलाच की आसाम, नागाव(अलिबाग, महाराष्ट्र) आणि कोचिन इथे काय एकाच वेळी हजर होतास की काय...
- पिंगू
14 Feb 2012 - 8:03 am | ५० फक्त
शेवटचे दोन फोटो अगदी जबरदस्त आलेत, धन्यवाद.
14 Feb 2012 - 8:29 am | सूड
आवडलं !!
14 Feb 2012 - 9:24 am | Nile
फिशिंग नेट्सचा फोटो आवडला. कातरून आणि किंचित रंग बदलून झकास फोटो होईल असे वाटते.
14 Feb 2012 - 10:01 am | सोत्रि
मस्त फोटोज!
पहिला आणी शेवटचा खासच...
- (फोटोग्राफर व्हायची ईच्छा बाळगणारा) सोकाजी
14 Feb 2012 - 10:44 am | पियुशा
झक्कासच !!!!!!
14 Feb 2012 - 10:47 am | स्पा
फोटो आणि फोटोतील विविधता आवडली
14 Feb 2012 - 5:31 pm | सुहास..
विविधता आवडली,
छान छायाचित्रे !!!
चित्रपाल ने टाकलेले चित्र ही आवडले ...
(माहिती दयाल का जरा !!)
15 Feb 2012 - 4:40 pm | चिगो
सगळ्यांचेच धन्यवाद..
@मराठे, वपा बरोबर बोललाय.. काहीतरी चमकले असेल. पण चमकायला जागा चांगली निवडलीय फोटोत.. ;-)
@पिंगु, नाही रं बाबा.. एकाच वेळी सगळीकडे रहायला मी काय भगवान कृष्ण थोडीच आहे. वेगवेगळ्या वेळी काढलीयत ही छायाचित्रे..
@सोत्रि, इच्छा काय बाळगायची नुस्ती. कॅमेरा उचला आणि सुरु करा.. आपोआप जमतंय..
@गवि, स्पा, पियुशा, नाईल, सुड, पन्नासराव.. धन्यवाद..
@सुहास, तुला "जयपाल" म्हणायचंय का ? मला पण तो फोटो आवडला..
15 Feb 2012 - 4:42 pm | मोहनराव
वा छान!