ह्या वर्षी आमचा गण महीला राखीव झाला. भल्याभल्यांची तारांबळ उडाली. मागच्या पंचवार्षीकला आम्हाला जनतेने विजयी कौल दिला नव्हता. यावेळेस सौ.ला उमेदवारी मिळाली. प्रचारासाठी अधिकृत दिवस फक्त पाच. १ते५ फेब्रु. अनेक युक्त्या क्लृप्त्यानि प्रचार केला. अनेक ठक बेटले. एकेक अनुभव शेअर करण्यासारखा आहे. त्यातला एक. वडगावची प्रचार सभा आटोपून पुढच्या प्रचारसभेला निघालोच होतो तर गववाला गपक्कन गाडीत घुसला. हे प्रकार होतच असतात. त्यामुळे विषेष काही वाटले नाही.
माह्याकडं १० मतं हायेत..... ते आपुन सांगु तेच करणार......... तुम्ही काळजी करु नका..... आमच मत घड्याळालाच...........
पण......
त्याने थोडा पॉज घेतला...
त्याच्या हाताव १००० रु टेकवले.....पुढे फाटयावर तो उतरला.
देवगावला सभा होती. सगळे कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यातले काही येरवाळीच तराट होते. ठाकराचा घमा जवळ आला....... दादा आप्ले वाघजाळीतले ५०-६० मतदाने..... पन ते कंपनीला जायले......... त्यानला आनावा लागन्.....जाचायाची खर्ची द्याला लागंल............
एक अना अनेक ........
क्रमशः
प्रतिक्रिया
11 Feb 2012 - 4:30 pm | पैसा
पण अगदीच लहान झाला लेख! एकसंध लिहिलत तर वाचायला मजा येईल.
11 Feb 2012 - 11:34 pm | चेतनकुलकर्णी_85
हा काल्पनिक लेख आहे कि अनुभव??
आणि मत साठी तुम्ही १००० रुपडे दिलेत...??? तेही सांगता थोबाड वर करून?
तर हे आहे रहस्य घड्याळाच्या विजयाच्या मागे...
11 Feb 2012 - 11:34 pm | मृगनयनी
:) :)
पिपल्या'जी... या लेखातल्या ४-५ ओळीन्वरून असे दिसते, की तुम्ही राष्ट्रवादी'चे णिष्टावाण कार्यकत्रे आहात. आणि पश्कासाठी तुम्ही काही करायला तयार असता..
बाकी क्रमशः'च्या पुढील लेख लवकरात लवकर टाका.. भारी उस्सुकता तानल्या गेली आहे... पन क्रुय्प्या १४ फेब्रुवारीच्या आतच टाका.. कारण त्यानन्तर आमच्या येरियात आचारस्न्हिता पालळ्या जानार आहे! मग तुच्मा हा उतक्नथावार्ध्यक्य लेख वाचता नाही यायचा अम्हाला!!! ;) ;)
11 Feb 2012 - 11:38 pm | चेतनकुलकर्णी_85
ते नाही टाकणार आता पुढचे लेख..साहेबाना गुप्तचर विभाग कडून मिपा वरील ह्या लेखाची माहिती कळली आहे..ते आपली रहस्ये अशी कोणाला फोडून देत नाहीत... :P
11 Feb 2012 - 11:50 pm | मृगनयनी
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
लईच्च फास्ट दिस्तेय.. गुप्तचर यन्त्रणा.... त्या दाऊद इब्राहिम'कडून भाड्यानी आणली वाट्टं सायेबान्नी! !!! ;) ;) ;)
काssssssश उस थप्पड मारनेवाले के बारें में भी पेहेलैच्च पता चलता.. तो शायद आज "अन्ना" भी इलेक्षन मे खडा हो पाता!! ;)
11 Feb 2012 - 11:59 pm | चेतनकुलकर्णी_85
अब्ब्ब्बां...
तुम्हाला माहित नाही का काकू? अहो तो ही एक जुळवून आणलेला योग होता ..अण्णांना कात्रीत पकडण्यासाठी...क्रिकेट सोडा हे राजकारण पण manage करणारे लोक आहेत.. :D
12 Feb 2012 - 12:14 am | भीमाईचा पिपळ्या.
हा काल्पनिक लेख आहे कि अनुभव??
<<<<<<< हा लेख काल्पनिक आहे.
12 Feb 2012 - 12:17 am | चेतनकुलकर्णी_85
अहो सांगत जा ना आधी असे...माफ करा जरा जास्तच बोललो असेन तर..
पण मग ह्या काल्पनिक लेखात तुम्हाला घड्यालाचाच का उल्लेख करावासा वाटला?
12 Feb 2012 - 12:25 am | भीमाईचा पिपळ्या.
अरे चेतन घड्याळ्/कमळ्/पंजा/तिरकामठा हे सगळ्या एकाच माळेचे मणी. एकाला झकावे आणि दुसर्याला दाखवावे. त्युमुळे काहीही फरक पडत नाही.
12 Feb 2012 - 12:34 am | इनोबा म्हणे
ग्रामीण टच, आणि राजकारणाचा विषय असल्यामूळे पुढच्या भागाची उत्सूकता आहेच. पुलेशु.