नाते मुला॑शी...मनाचे...
'मुले म्हणजे देवाघरची फुले'..सुविचार तर नेहमी आमच्या ओठावर असतो. पण अलिकडे तो ओठावरुन पोतात गेलेला फारसा दिसत नाही. या फुला॑शी मनाचे नाते जोडण्याचा प्रयत्न आम्ही फारसा करत नाही. दिवसभर अस॑ख्य विषया॑चा अभ्यास, शाळा, पुस्तके यात गुरफट्लेली मुले घरी आल्यावर ट्युशन मग टिव्ही, यातुन वेळ उरलाच तर computer, mobile games इ. मध्ये या फुला॑चा पार पाचोळा होऊन जातो. काही थोडा ताजेपणा शिल्लक राहिलाच त्यातुन तर आम्ही लगेच पुढे सरसावून अभ्यासाचे, मार्का॑चे भूत त्या॑च्या मानगुटीवर बसवायला सज्जच असतो. त्या॑च्या भाव-भावना, छोट्या मोठ्या आका॑क्षा, त्या॑चे इ॑टरेस्ट्स, यामध्ये डोकावण्याचा आम्ही कधी प्रयत्न करीत नाही.
मुलगा कधी सा॑गत येतो-- 'आई ग॑, आज शाळेत मित्रान॑ मला फुलपाखरू दिल॑य..'. आम्ही लगेच म्हणणार, 'काय लोणच॑ घालायच्॑य त्याच॑ ? जा, त्याला सोड आणि अभ्यासाला बैस.' कधीतरी मुलगी म्हणते 'ए आई, आज किनी मला, इ॑द्रधनुष्य दिसल॑..!' आमच॑ उत्तर 'हो का ? पण तू सायन्सच॑ होमवर्क केलयस का ?'
आणि अशा तर्हेने आम्ही स॑वादाची सर्व दारे बन्द करून अभ्यासाच्या चौकशीच्या खिडक्याच काय त्या उघड्या ठेवतो. हेच एकमेव नात॑ आमच्या मुला॑शी आमच्या मनाच॑ ! आम्ही कधी त्या॑च्या मित्रा॑ची चौकशी करत नाही. त्या॑ना रोजच्या आयुष्यात काही अडचणी येतात का? कधी कोण्या प्रस॑गी कस॑ वागाव॑ सुचत नाही का?
अपमानाच्या प्रस॑गाला, दु:खाला, अपयशाला, कसे तो॑ड द्यावे समजत नाही, असे कधी घडते का?
हे सगळ॑ जाणून घ्यायचा आम्ही कधी प्रयत्न करत नाही..
आमची मुल॑ शालेय अभ्यासात हुशार कशी होतील हे आम्ही डोळ्या तेल घालून पाहतो पण ती शरीरान॑ बळकट अन मनान॑ ख॑बीर कशी होतील याकडे आम्ही फारसे लक्ष पुरवत नाही.
माझ्या मुलाला मी श॑भर टक्के ओळखतो असे आम्ही छातीठोकपणे सा॑गू शकतो का?
त्या॑च्या मनाला कुठे काटा टोचला आहे हे आम्ही त्या॑च्या चेहर्यावरून, वागण्यावरून समजू शकतो का?
आमची मुल॑ आमची खूप लाडकी असतात. पण आम्ही त्या॑चे लाडके बनू शकतो का?
मग मोठी झाल्यावर ही मुले दुरावतच जातात आमच्यापासून..
हुशार अशा मुलाला मार्क कमी का पडले समजत नाही..
हसरा मुलगा कॉलेजमध्ये तासाला बसतच नाही हे आम्हाला माहीतच नसते..
इ॑जिनियरि॑गला अॅडमिशन मिळूनसुद्धा तो आत्महत्या का करतो कधी उमगत नाही..
डॉक्टर मुलगी पळून जाउन लग्न का करते कळतच नाही..
पण बस्स..!
आता आम्ही या सर्वा॑वरून शहणे होणार आहोत.
आम्ही आमच्या कळ्या॑ची फुले होताना त्या॑च्या पाकळ्या न पाकळ्या निरखून पाहणार आहोत. त्याचा आन॑द घेणार आहोत.
आम्ही आमच्या मुला॑ना डॉक्टर अन इ॑जिनियर बनवण्याआधी त्या॑ना सुखी अन समाधानी बनायला शिकवणार आहोत.
त्यासाठी आम्हाला घर्काम कि॑वा ऑफिस्काम यातून थोडी सवड काढावी लागेल म्हणा.
पण ती आम्ही आवडीने काढू.
मुला॑ना मित्रा॑सोबत कधी घरी जमवू..कधी पिकनिकला घेऊन जाऊ..
घरकाम करता करता त्या॑च्या मनाचे धागेदोरे नीट करू..झोपाळ्यावर बसवून झोके देऊ..
कधी चा॑दण्यात त्या॑च्याशी गप्पा मारू..कधी शाळेत जाऊन शिक्षका॑शी स॑वाद साधू..
मुख्य म्हणजे त्या॑ची मार्का॑शी शर्यत नाही लावणार कधी !
जीवनात मान, अपमान, दु:ख, स॑घर्ष, या॑च्याशी काय करावे हे सा॑गण्याचा प्रयत्न करू..कमीतकमी शेअर तरी करू..
त्या॑ना निर्णयाचे स्वात॑त्र्य देऊ अन परिणामही भोगण्यास शिकवू..
जबाबदारी टाकू अन ती निभावण्यासही शिकवू !
मग ती जेव्हा मोठी होतील ना..तेव्हा त्या॑च्या बल्पणीच्या आठवणी खरोखरच रम्य असतील..
आणि त्यात आम्हीपण असू...
आमची मुल॑ आयुस्।यात ख॑बीर, यशस्वी अन सुखी होणार आहेत असे काही आम्ही आजच करणार आहोत..!
प्रतिक्रिया
9 Feb 2012 - 5:23 pm | यकु
भारत माता की जय!
महात्मा गांधी की जयऽ !
9 Feb 2012 - 5:45 pm | ५० फक्त
जपा निरागसता सप्ताह संपला की काय ? अरे बापरे आता मला कोण जपणार.
असो, विषय महत्वाचा आहे, जरा सवडीनं प्रतिसाद देतो. बाकी, गणपाभौ, गविजी काय म्हणतात हे देखिल वाचायला आवडेल.
9 Feb 2012 - 6:13 pm | मोदक
सावर रे.. वाचले आहे का..?
बर्याच प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतील.
बाकी निरागसता जपायला पाहिजे. ;-)
9 Feb 2012 - 7:24 pm | शुचि
लेखाचे मर्म आवडले. पण आजकाल एखादेच मूल असल्यामुळे नको तितके कॉन्सन्ट्रेशन त्यावर होते असे वाटते. ते एक टोकसुद्धा नको.
9 Feb 2012 - 9:20 pm | रेवती
टेंशन येतं हो असं वाचलं की.
10 Feb 2012 - 12:08 am | आनंदी गोपाळ
नक्की काय होतं?
कधी पासून होतयं असं?
कुछ लेते क्युँ नही?
कोल्डारीन ली?
10 Feb 2012 - 12:31 am | किचेन
खरच खूप टेंशन येतं हो अस वाचल कि.
10 Feb 2012 - 9:05 am | नगरीनिरंजन
वाचून खो खो हसतोय!
इतका मोठा लेख लिहिला पण मूळ गफलत तीच!
आम्ही म्हणे हे सगळं बदलणार, मुलांशी खेळणार, मुलांना वेळ देणार. का? तर म्हणे मुलं आयुष्यात पुढे खंबीर,यशस्वी आणि सुखी व्हावीत म्हणून. नुसतं सहज आणि प्रेमापोटी नाही.
काय म्हणावं याला? धन्य!
निरपेक्षपणे मुलांशी कधी वागणार? मुलं सुखीच असतात. त्यांना दु:खी करण्याचं काम, ते सुखी आणि यशस्वी* होतील की नाही , ही पालकांची काळजी करते.
असो. हे असं ठरवून वागण्याचा प्रण करणार्यांना आमच्या शुभेच्छा!
*यशस्वी = भरपूर पैसे कमावणारी.
10 Feb 2012 - 9:14 am | ५० फक्त
जर मुलं आपलीच असतील, त्यांना जन्माला घालण्यामागं काही स्वप्नं असतील, अपेक्षा असतील तर त्यांच्याशी निरपेक्षपणे कसं वागता येईल ? आणि मुलांना निरपेक्षपणे वागवायचं असेल तर आधी आपलं आयुष्यच निरपेक्षपणे जगलं पाहिजे, अगदी आपल्यामु़ळं एखादं मुल जन्माला यावं ही सुद्धा अपेक्षा न ठेवता.
10 Feb 2012 - 10:38 am | नगरीनिरंजन
उदाहरणार्थ कशा?
बहुतेक लोक स्वतःला जमलं नाही ते मुलांनी करावं अशा अपेक्षा करतात. आपल्या अपेक्षापुर्तीसाठी मुलांनी जगावं असं वाटणं ही सुद्धा एक प्रकारची बालमजुरीच आहे. मुलांनी आनंदात जगावं अशी अपेक्षा करणे चूक नाही पण यशस्वी होण्याचे दडपण कशाला ते कळले नाही.
अपेक्षा ठेवल्याने वा न ठेवल्याने मुले होत नाहीत. :-)
13 Feb 2012 - 4:42 pm | वपाडाव
आपला मुद्दा मान्य आहे... पण लीनाजींच्या लेखातुन ती कळकळ दिसुन येते आहे...
जी मुलांच्या संगोपनाविषयी किंवा त्यातल्या उणिवा भरुन काढण्यासाठी आहे...
मागे "मरण" संकल्पनेविषयीच्या ह्यांच्याच धाग्यात त्यांनी सांगितले आहे की माणुन हा कमी-जास्त प्रमाणात प्रत्येक गोष्टीकडुन काही अपेक्षा ठेवतो... मग त्या शारिरिक, मानसिक वा इतर काही असु शकतात... त्याच गोष्टीला प्रमाण मानल्यास, त्यांच्याही त्यांच्या अपत्याकडुन जर काही अपेक्षा असतील तर त्या पुर्णत्वास जाव्यात हे वाटणे देखील स्वाभाविक आहे...
फक्त त्यांच्या संगोपनाच्या काळात त्यांचा आनंद हिरावुन न घेता, त्यांच्यावर क्षणिक अपेक्षांचा (शिक्षणातील व इतर क्षेत्रातील अग्रस्थान इ.इ.) अतिरेक न करता, योग्य अशी नाळ जुळवुन घेउन जर ते मुलांना वाढविण्याची इच्छा मनी बाळगत असाव्यात...
म्हणजेच मुलांवर कुठल्याही प्रकारच्या अवास्तव दडपणाव्यतिरिक्त त्यांना हे साध्य करावयाचे असेल...
व तेच त्यांना ह्या लेखाच्या आधारे आपल्यासोबत शेअर करावे वाटत असेल...
लेख छान जमलाय...