"एन्हॅन्स्ड सेन्सिबिलिटीज म्हणजे काय रे"?
कुठे ऐकलास हा शब्द?
(पल्याडचे लेख वाचायला लागली की काय?)
"आंघोळीला गेला होतास. फोन सारखा वाजत होता म्हणुन उचलला. मी हॅलो म्हणायच्या आधीच त्या बै ३ मिनीटे बोलत होत्या".
हा शब्द वापरणार्या ना बै नाही म्हणायच. मॅम म्हणायच.
"मॅडम मधला ड चे काय"?
ते मॉडर्न आहे तुला नाय समजायच.
"नाही तर नाही. मला अर्थ सांग".
जाणीवांच्या विस्तारलेल्या कक्षा.
"अगो बाई. विस्तारलेल्या कक्षा मधे अक्षरे खातात की काय? तो फोन कर. त्या मॅम काय म्हणत होत्या त्यातले मला फारसे काही कळले नाही"
हा फोन "टीचींग बीयाँड क्लासरुम वॉल्स" हे ब्रिदवाक्य असलेल्या शाळेतल्या मॅम चा होता.
___________________________________________________
बोला मॅम, प्रभु बोलतोय.
"हेलो सर, गुड मॉर्निंग सर. प्रिंसीपल मॅम नी तुम्हाला कॉम्प्लीमेंट द्यायला सांगितल्या आहेत".
कशासाठी?
"अहो सर तुमचे पोस्ट वाचले मिपावर. खुप आवडले ते त्यांना. सर्व टीचर्स ना वाचायला कंपलसरी केले".
ओ.के.(इथे मी शिस्टीम प्रमाणे थँक यू म्हणायला पाहीजे होते. पण ..)
"यू आर अ मिनिमॅलिस्ट"
आता हे काय असते बॉ?
"काय सर चेष्टा करताय. अहो काहीही न म्हणता बरेच काही सांगता तुम्ही"
अहो मॅडम मी काहीही प्लान करत नाही हो. आणि तसे काहीही होत असेल तो निव्वळ योगायोग किंवा अपघात समजा.
"तुमच्या आर्टीकल नंतर प्रिंसिपल मॅडम नी हा विषय प्रेंरेंट मिट मधे इन्क्लुड करायला सांगितले आहे. जरा आमच्या काउंसेलरला लँग्वेज द्याल का? काल जवळ जवळ असाच मिशप झाला. तो पण सांगायचाय"
सांगा
___________________________________________________
सिनियर के.जी. ची पालक सभा.
जिथे आई वडील येउ शकत नाही तिथे आजोबा आजी.
१००० फुटाचा ए.सी. हॉल. बसण्याची फाइव स्टार व्यवस्था. स्क्रीन, म्युझीक सिस्टीम वगैरे वगैरे.
आई बाबा च्या समोर मुले स्वःत ला एक्स्प्रेस करतात.
अशीच एक एक्स्प्रेस मुलगी.
हातात माईक आल्यावर बोलायला लागली.
"माझ्याकडे ना जादूची रुम आहे. तुम्हाला सांगु का ह्या रुम ची जादू. ही जादू फक्त शनीवारी रात्री होते. मी की नै बेडवर झोपलेली असते. आई एका बाजूला, बाबा एका बाजूला. मी मधे. ही जादू कधी होते ते मला माहीत नाही. बाबा मॅच बघायला अगदी सकाळी टीवी लावतात. आणि मी जागी होते. बघतो तर काय मी मधे नसते. कधी ह्या बाजुला, तर कधी त्या बाजूला असते"
___________________________________________________
"सर, कालचा तुमचा लेख वाचला होता. आणि म्युझिक सिस्टीम चा रिमोट माझ्याच हातात होता म्हणुन वाचले. आता सांगा
आजकालच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या एन्हॅन्स्ङ सेन्सिबिल्टी़ज बरोबर कसे डील करायचे हे कोण शिकवणार"?
प्रतिक्रिया
20 Jan 2012 - 11:24 am | चिरोटा
आवडले. मास्तरांची शै़क्षणिक क्षेत्रात बर्यापैकी वट दिस्तेय.
20 Jan 2012 - 11:30 am | नगरीनिरंजन
शैक्षणिक क्षेत्राची वाट लागल्याचे ऐकलेच होते. आता प्रिंसिपलबाई मास्तरांचे लेख वाचतात आणि ते ही मिपावर हे वाचून खात्री झाली. ;-)
बाकी लेखातल्या विषयावर काय बोलणार?
20 Jan 2012 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार
आम्हाला या लेखावरुन काही काळापूर्वी आंतरजालावरती घडलेली 'रेषेवरची आणि रेषेखालची अक्षरे' ही वादग्रस्त चर्चा आठवली. ;)
20 Jan 2012 - 12:05 pm | नरेश_
आतापर्यंत ३दा वाचन झालं. नेहमीप्रमाणेच (म ला) झेपले नाही.
|
|
|
|
आणि हा आमचा उपधागा. ;)
सल्ला/ मदत /पुस्तक - (अनुक्रमे) हवा /वी /वे आहे.
आंजावर कुठे मराठी -२- सुलभ (आणि अर्थात मोफत!) मराठी शब्दकोश /भाषांतर सेवा उपलब्ध आहे का? |
|
|
20 Jan 2012 - 12:10 pm | मन१
काम आटोपल्यावर सर्व काही जागच्याजागेवर पुन्हा जायला हवे अशी शिस्त सदर मुलीचे आई-बाबा केजीमध्ये असताना त्यांना कुणी लावली नसावी.
शिस्तीचे मह्त्व अधोरेखित करणारा गर्भित संदेश आवडला.
20 Jan 2012 - 3:14 pm | इष्टुर फाकडा
या आधीची गोची जास्त आवडली आत्ताच्या लेखापेक्षा.
20 Jan 2012 - 9:26 pm | चतुरंग
प्रिंसिपल मॅम मास्तुरेचे लेख वाचतात? बोंबला, झालंच त्यांचं समुपदेशन मग!! ;)
बाकी एक्सप्रेस मुलीचे विचार ऐकून आई-बाबा त्याहीपेक्षा एक्सप्रेस वेगाने हॉलच्या बाहेर गेले असतील! ;)
-रंगा
20 Jan 2012 - 10:15 pm | jaypal
20 Jan 2012 - 11:11 pm | गणपा
अगा बाबौ..
जादुची रुम.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
21 Jan 2012 - 12:34 am | विश्वनाथ मेहेंदळे
सदर मुलीच्या बापाबद्दल आत्यंतिक दया / कणव मनात दाटून आली आहे...
21 Jan 2012 - 2:48 am | पाषाणभेद
छान गोष्ट आहे गुरूजी.
21 Jan 2012 - 4:10 am | पिवळा डांबिस
बघते तर काय मी मधे नसते. कधी ह्या बाजुला, तर कधी त्या बाजूला असते"
त्यात काय, मुलीला सांगायचं की यात जादूबिदू काही नाहीये, तू (आणि तुझी आई!) झोपेमध्ये खूप लोळता!!
:)
हज्जारो प्रश्न पचवलेला,
पिवळा डांबिस
;)
21 Jan 2012 - 8:40 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
21 Jan 2012 - 6:48 am | सन्जोप राव
एक्सलंट थेरडं, आपलं, थ्रेड. रीड करताना फ्रिक्वेन्टली लाफायला होत होतं. ऑब्झर्वेशन्स अॅक्यूट आहेत. रायटिंग मिनिमॅलिस्ट आहे हे सेन्टेन्स ट्रू आहे. त्या एक्स्प्रेस गर्लची स्टोरी खूपच सटल आणि सजेस्टिव्ह आहे. एकूण हा थ्रेड रीडताना खूप फन आली.