माझा निबंध.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
19 Jan 2012 - 1:52 pm

माझा निबंध.....

एकदा वर्गात ऑफ पिरिअड होता.
मस्त पुस्तक वाचत होतो....मार्क ट्वेन चे....टोम सायर....बाईनी निबंध दिला....

"मला पंख असते तर"

कोण मुंबईला गेला.....कोण हिमालयात गेला...(एक तर पार अमेरिकेत गेला....त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते..)...तर कोण पक्ष्यान बरोबर गप्पा मारत बसला....

आता पुस्तक वाचावे की, निबंध लिहावा....मग काय पटकन निबंध लिहिला आणि पुस्तक वाचायला लागलो.....

बाईनी बघितले कि हे काय...हा मुलगा लिहित का नाही? त्यानी निबंध वाचला आणि सर्व वर्गाला "शंकराचे तांडव नृत्य, महिषासूर मर्दिनीचा त्वेष आणि त्रातीकेचे वाक्तांडव" एकाच वेळी दाखवले..तरी पण राग शांत होईना...मग मला झाशीच्या राणी प्रमाणे (पाठीला न बांधता) खेचत मुख्य शिक्षकान कडे नेले....त्यांनी पण "आग्या वेताळ, गब्बर सिंग, रावण,दुर्योधन, दुशासन" करून दाखवले.....शेवटी शकुनी मामा झाले आणि औरंगझेबा प्रमाणे फर्मान सोडले.....जा आणि बाबाना घेवून ये.....

मग काय बाबा आले....त्यांनी पण येण्या पूर्वी "जमदग्नीचा रोल केला" केला....आई तर तिचे माझ्या मनातील "वात्सल्य सिंधू" ह्या प्रतिमेला जोरदार धक्का दिला....भावाने मराठी भाऊ पण दाखवले...(म्हणजे आगीत तेल ओतले) आणि "विश्वास आणि भाऊ" पानिपतात मेले हे सिद्ध केले.....

मग बाबा आणि शिक्षक ह्यात तह झाला,,,,कलमे खाली देत आहे...
१. माझी पुस्तक वाचन बंदी.
२. रोज ४ पाने लिहिणे......

त्याचा सूड मी अजून उगवत आहे......आणि निबंध पण खरा करून दाखवला......

१. रोज मनसोक्त वाचन आणि
२. कमीत कमी लिहिणे......

ज्या गोष्टी मुळे हे सर्व झाले , तो निबंध वाचायचा आहे?

" मला पंख असते तर मी सगळे जग फुकट बघीन."

आणि खर सांगायचे तर आज मी सर्व जग माझ्या कंपनी मुळे फुकट बघत आहे.....

तर मंडळी आता मी निरोप घेतो......माझा पत्ता खाली देत आहे......माझ्या ह्या घरात आपले स्वागत आहे......

http://full2dhamaal.wordpress.com

सदैव मी.पा. कर (जयंत फाटक उर्फ मुक्त विहारी)

राहणीप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारी

तुम्ही गगन विहारी उर्फ छगन बिहारी यांचे चुलते का हो ?

डिजेबॉय's picture

20 Jan 2012 - 9:49 pm | डिजेबॉय

अन्या दातार's picture

19 Jan 2012 - 2:06 pm | अन्या दातार

एवढे होऊनसुद्धा तुम्ही इतके लिहिता, ब्लॉग काढता म्हणजे आश्चर्यच म्हणायचे की.

(अट्टल मिपाकर) अन्या

मराठी_माणूस's picture

19 Jan 2012 - 2:20 pm | मराठी_माणूस

त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते

सद्य स्थिति काय आहे ?

उदय के'सागर's picture

19 Jan 2012 - 2:27 pm | उदय के'सागर

+ १०००००००००० ... अगदी हेच विचारतो.

चिरोटा's picture

19 Jan 2012 - 3:07 pm | चिरोटा

अवो ते sarcastic लिहिलय. पूर्वी म्हणजे जयंत्राव शाळकरी असताना लोक इंग्लंडात जात. अमेरिकेत कमी लोक जात. नंतर उठ्सूठ अमेरिका झाले आणी इंग्लंड 'मागे पडले'!
(लहानपणी यार्डली पावडर वापरणारा) चिरोटा

कपिलमुनी's picture

19 Jan 2012 - 4:35 pm | कपिलमुनी

मोठेपणी सुद्धा वापरत चला ;)

५० फक्त's picture

19 Jan 2012 - 2:33 pm | ५० फक्त

लेख लिहायला सुरुवात करण्यापुर्वी एका बशीत विशेषणं गोळा करुन ठेवली होती काय ओ ?

कसं आहे पुलावात काजु आणि लवंगा असाव्यात पण भातापेक्षा कमी.

+१ टु अन्या, 'एवढे होऊनसुद्धा तुम्ही इतके लिहिता, ब्लॉग काढता म्हणजे आश्चर्यच म्हणायचे की.'' आणि ते सुद्धा एका दिवसात चार चार पोस्ट ब्लॉगवर. खरंच कमाल आहे. एवढी वर्षे ती दररोज लिहायची राहिलेली चार पानं व्याजासहित लिहिणार की काय एकदम. ?

असो, अजुन बहुतेक जपा निरागसता सप्ताह संपलेला नाही इथला, म्हणुन एवढंच.

मी जपा निरासागता साप्ताह संपला असे जाहीर करते आणि सर्व मिपाकरांना त्याच्या खास शैलीतले प्रतिसाद द्यावेत असे आवाहान करते.

पैसा's picture

19 Jan 2012 - 2:37 pm | पैसा

यावरून "गवत खाणार्‍या गायीच्या चित्राची" आठवण झाली.

किस्सा आवडला.

ऑ? नक्कि का?
:D

पैसा's picture

19 Jan 2012 - 2:45 pm | पैसा

म्हणूनच गायीच्या चित्राची आठवण झाली म्हटलं ना! :D

उदय के'सागर's picture

19 Jan 2012 - 2:43 pm | उदय के'सागर

वाचला तुमचा "ब्लॉग".... (मामाला "dedicate" केलेला...ह.घे.)

काय बोलु? शब्दच नाहियेत ... शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर "no comments" :P

स्वानन्द's picture

19 Jan 2012 - 3:47 pm | स्वानन्द

छान लिहीलय. :)

sagarpdy's picture

19 Jan 2012 - 3:59 pm | sagarpdy

आमच्या एका वर्गबंधूने 'मित्रास भेट पोहचली असे कळवणारे पत्र' या विषयावर अशीच काहीशी ऐतिहासिक कामगिरी केली होती.
शक्यतो आम्ही सर्वांनी टोपी, पेन, शर्ट, चेंडू अशा सामान्य वस्तू भेट म्हणून समजून पत्र लिहिली. पण या महाशयांनी खरच काही औरच भेटवस्तू निवडली - 'कवळी'! एका म्हाताऱ्याने आपल्या एक म्हाताऱ्या मित्राला दिलेली भेट!
वर अगदी सुरुवात अशी
भेटवस्तू आवडली. छान दिसते आहे. घातल्यानंतर आरशात बघितले कि चेहऱ्यावरील नवीन चमक दिसते. नातेवाईकानीही खूप स्तुती केली. ई. ई.

बाईनी जी तासली होती या महाशयांची, कि विचारू नका.
[आमचा तार्कीकदृष्ट्या या माणसाला पाठींबा होता, पण बाईंसमोर बोलती बंद !]

भेटवस्तू आवडली. छान दिसते आहे. घातल्यानंतर आरशात बघितले कि चेहऱ्यावरील नवीन चमक दिसते. नातेवाईकानीही खूप स्तुती केली. ई. ई.

भरपुर विनोदी .. आवडले

किचेन's picture

22 Jan 2012 - 7:49 pm | किचेन

ह ह पु वा.