नाती गोची

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
17 Jan 2012 - 4:34 pm

"उद्या कुठे आहेस"?
विरार, का ग?
"अरे अनिकेत भाउजींचा साठावा वाढदिवस आहे ना. आमंत्रण आहे".
किती वाजता?
"आठ वाजता. स्पेशल पाणी पुरी चा कार्यक्रम आहे"
येउन पोचतो. पण तु आधी जा.
"गिफ्ट काय घेउ"?
मला माहीत नाही.
"अरे सुचव ना"
घरात एक ग्लेन फिडीच आहे ना. ती देउ.
"शी. साठाव्या वाढदिवसाला दारु"
मग तुला काय आवडते ते दे.
"येताना एक बुके घेउन ये. कार्यक्रमात मिळलेच ना. विकतचा आणु नकोस. तेवढेच वाचले. स्पेशल पाणीपुरी म्हणजे काय रे"?
पाणी पुरीच्या पाण्यात थोडीशी व्होडका आणि लिम्का टाकले की झाली स्पेशल पाणी पुरी. मराठी संस्थळावर एक महान सोकावलेल्या साहित्यीकाच्या लेखावर ही रेसी'पी' मिळाली होती.
"दारु शिवाय काही सुचतच नाही का"?
मला बोलायचे काय काम नाही हा. घरातल्या सर्व बाटल्या तशाच पडून आहेत. आणि वाढदिवस म्हटला की थोडी दंगा मस्स्ती हवीच की. आता चाळीस % सुट. एक% जास्त व्याज आणि इतर सवलती सेलिब्रेट नाही करायच्या का?
"बर बर. वेळेवर ये म्हणजे झाले".
___________________________________________________
अगदी वेळेवर पोचलो.
सर्व अ‍ॅडल्ट कारभार होता.
त्या मुळे सर्व जण सोकावले.
मस्त धमाल आली.
पाणी पुरी वर जरा जास्तच उड्या पडल्या.
रात्री अकरा वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.
अन्याची मुलगी पण निघाली.
नात जागीच होती.
अख्ख्या कार्यक्रमात पोरीने धमाल केली होती.
ती काही घरी जायला तयार होइ ना.
झालेला संवाद खालील प्रमाणे.
"तुला उद्या शाळेला जायचे आहे ना"
नाय. उद्या सुट्टी आहे.
"आज घरी जा. उद्या परत ये"
मी आज तुझ्या बरोबर रहाणार.
तु नसलीस की बाबा रडतील ना.
"बाबा वैइट्ट आहे"
का ग? बाबा रोज रात्री स्टोरी सांगतो. गाणे म्हणुन गाइ गाइ करतो. तो रडेल ना तु नसलीस तर.
बाबा वैइट्ट आहे.
का ग?
आजोबा काल ना बाबा ने मला झोपताना स्टोरी सांगीतली. आणि झोपताना एक पप्पी दिली.
मग आज तु गेली नाहीस त्याला वाईट वाटेल.
बाबा वैइट्ट आहे.
का ग?
काल मला एकच पप्पी दिली. आणी मी झोपल्यावर मम्माला टेन पप्पी देत होता. आणि नंतर ना......
मी लगेच म्युझीक चा वॉल्युम वाढवला आणि पुढचे संभाषण फक्त आजोबा पर्यंत मर्यादित राहीले.
आजोबा वय वर्षे साठ, नात वय वर्षे अडीच.
___________________________________________________

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Jan 2012 - 4:41 pm | बिपिन कार्यकर्ते

आयला! इथे तर प्रतिसाद द्यायचीच गोची! ;)

स्वाती२'s picture

17 Jan 2012 - 8:07 pm | स्वाती२

+१

अर्र... अगागागा.. केला की बल्ल्या कार्टीने..

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2012 - 5:37 pm | अत्रुप्त आत्मा

@-आजोबा वय वर्षे साठ, नात वय वर्षे अडीच... >>>बालपण आणी म्हातरपण सारखं असतं असं म्हणतात ते उगीच नाही... ;-)

अवांतर-बाकी या धाग्याचं १नक्की - अनेक प्रतिसादकांना हवं तिथे मार लागल्याचा आनंद होण्णार

ह्या आजोबांची नात आणि गविंच्या ठकरालची पोरगी, लक्षणं सगळीच्या सगळी सारखीच आहेत की! जमेल तिथे बापाला पोत्यात घालायची कामं त्येजायला! :-)

--असुर

प्यारे१'s picture

17 Jan 2012 - 4:52 pm | प्यारे१

मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' भोवती घुटमळण्याचं कारण? डॉक्टर दिवटे 'अतिथेट' लिहीतात तर मास्तर 'सटल'...

मास्तर समुपदेशन करतात असे ऐकले आहे. मास्तरांचे कोण करते.... समुपदेशन? ;)

मी-सौरभ's picture

17 Jan 2012 - 5:00 pm | मी-सौरभ

'मास्तर' आणि 'डॉक्टर' यात फरक असणारच ना ;)

मराठी_माणूस's picture

17 Jan 2012 - 5:04 pm | मराठी_माणूस

मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' भोवती घुटमळण्याचं कारण?

सिगमंड फ्रॉईड चा प्रभाव असेल

तिमा's picture

17 Jan 2012 - 8:03 pm | तिमा

नर्मदा हा शब्द नर आणि मादा या दोन शब्दांपासून बनलेला आहे काहो गुर्जी ?

सविता's picture

18 Jan 2012 - 1:12 pm | सविता

बाब्या.. कार्टे .... असले शब्द ऐकले नाहीत का हो तुम्ही?

मास्तर बहुदा बाब्या क्याटेगरी मध्ये मोडत असावेत!

सुहास झेले's picture

17 Jan 2012 - 4:53 pm | सुहास झेले

हा हा हा ... बिकांशी बाडीस

घरात एक ग्लेन फिडीच आहे ना. ती देउ.

=))

बाकी अजुन वाचायचय...

चिरोटा's picture

17 Jan 2012 - 5:04 pm | चिरोटा

विनोदी शैली असूनही अंतर्मुख होवून विचार करायला लावणारा लेख.

विनायक प्रभू's picture

17 Jan 2012 - 5:09 pm | विनायक प्रभू

धन्यवाद

मास्तरांची स्फुटे वाचून ती लावणी आठवते..
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा ;-)
कृहघेणे

गणपा's picture

17 Jan 2012 - 5:12 pm | गणपा

स्वारी पण या स्फुटात मास्तरांच्या 'हिरव्या' देठाचा काय संबंध?

यकु's picture

17 Jan 2012 - 5:16 pm | यकु

गणपाशेठ तो प्रतिसाद
>>>>मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' भोवती घुटमळण्याचं कारण? डॉक्टर दिवटे 'अतिथेट' लिहीतात तर मास्तर 'सटल'...
>>>>मास्तर समुपदेशन करतात असे ऐकले आहे. मास्तरांचे कोण करते.... समुपदेशन?
हे पाहून लिहीला होता हो.. :)

ह्म्म्म मग तुमची 'लाईन' चुकली म्हणायची. ;)

विनायक प्रभू's picture

17 Jan 2012 - 5:19 pm | विनायक प्रभू

प्रतिसाद कर्ते माझे सर्व लेखन वाचतील आणि माझे समुपदेशन करतील.

मन१'s picture

17 Jan 2012 - 5:53 pm | मन१

नात आणि आजोबा ह्यांच्या वयाची सरासरी तीसच्या आसपास येते. सरासरी तीस वय असणार्‍या ग्रुपने काही गप्पा मारल्या तर हरकत नसावी.
--सौजन्य ननिंचा धागा

खास विप्र ष्टाइल लेख.

इरसाल's picture

17 Jan 2012 - 6:14 pm | इरसाल

विवाहीत मिपाकर योग्य ती कल्जि घेतील अशी आशा.(कारण प्रत्येक ठिकाणी ऐकणारे ६० वर्षाचे आजोबाच आणि आवाज कमीजास्त करता येणारा म्युजिक सिस्टीम असेलच असे हि नाही.)

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jan 2012 - 5:58 pm | परिकथेतील राजकुमार

मास्तुरे एक कुठे कुठे जात असतात ना.

असो..

आपली पाणीपुरी पार्टी कधी ?

अप्पा जोगळेकर's picture

17 Jan 2012 - 7:52 pm | अप्पा जोगळेकर

ठ्ठो. संसार म्हणजे तारेवरची कसरत असं का म्हणतात यामागचे कारण कळले.

दादा कोंडके's picture

17 Jan 2012 - 8:52 pm | दादा कोंडके

याच विषयावरचे शाळेत असताना ऐकलेले (आणि सांगितलेले) हि आणि हि विनोद आठवले.
इच्छुकांनी व्यनी करू नये. अपमान करण्यात येइल! :)

चतुरंग's picture

17 Jan 2012 - 9:15 pm | चतुरंग

ही चिमुरडी ना कुठे गोत्यात आणतील सांगता येत नै...अनिकेत आजोबांना अगदी कानकोंडं झालं असेल नै!! ;)
आपलीच नात आणि आपलीच गोची! =)) =))

- रंगा

रघु सावंत's picture

17 Jan 2012 - 11:02 pm | रघु सावंत

'' घरातल्या सर्व बाटल्या तशाच पडून आहेत.''

तर एक दोन जरा ईकडे सरकवा म्हणजे नाती ने आणखी काही सांगितले तरि आम्हाला काहीच
ऐकु जानार नाही.

मस्त............

नितिन थत्ते's picture

18 Jan 2012 - 1:39 pm | नितिन थत्ते

अशी पाणीपुरी परवाच* अमर प्रेममध्ये ओमप्रकाशला खाताना पाहिले.

*रविवारी-सब टीव्हीवर