म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर , सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट

शरुबाबा's picture
शरुबाबा in जनातलं, मनातलं
9 Jun 2008 - 3:02 pm

म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर

सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट
http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3103033.cms

आपली प्रतीक्रीया ?

संस्कृतीप्रतिसाद

प्रतिक्रिया

राजे's picture

9 Jun 2008 - 3:10 pm | राजे (not verified)

हे भगवनं !!!
मला वाटले नव्हते की मराठी वर्तमान पत्रे ईतक्क्क्क्की पुढे जातील....
ह्या महाजालाने तर पहिल्यांदाच वाट लावली आहे.. त्यात आता वर्तमानपत्राची भर !!!

पहील्या पानावरुनच लक्षात आले ही शिक्षण हा मुलमंत्र आहे .... त्यासाठी सकाळ पासून कार्यलयापर्यंत व हात मिळवण्यापासून किस पर्यंत !
वा काय मुद्दे आहेत....

हे देवा,
सगळे भविष्यवेत्ता म्हणत आहेत की २०१२- २०२५ मध्ये जे जग नष्ट होणार आहे.. ते लव्कर होऊ दे रे ;)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चतुरंग's picture

9 Jun 2008 - 7:13 pm | चतुरंग

मिपा करांच्या वेळेचा अपव्यय होईल अशा लिंक्स कृपया नकोत.

(असले तथाकथित 'शैक्षणिक' साहित्य आजकाल ढिगाने उपलब्ध आहे, ज्यांना जरुर आहे ते शोधून वाचतात! त्यासाठी मिपाचे माध्यम नको असे वाटते. ;) )
चतुरंग

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2008 - 7:23 pm | मुक्तसुनीत

एकेकाळी आदरास पात्र असणारे (आणि आजही मुंबईत कोटीच्या आसपास खप असणारे) मुंबईतले एक आघाडीचे मराठी वृत्तपत्र अशा प्रकारचा एक विभाग सुरू करते. या घटनेमधे नक्कीच वर्तमान काळाची पावले दिसत आहेत. बदलत्या सामाजिक वास्तवाच्या या खुणा आहेत. याबद्दलची चर्चा नक्की शक्य आहे. अशा चर्चांमधे वेळेचा अपव्यय होतो असे मला वाटत नाही. याबद्दलची तुमची मते तीव्र असू शकतात. चर्चा थांबविणे अयोग्य आहे.

म्हणून ते सर्व योग्यच आहे असे मला वाटत नाही. बदलत्या सामाजिक जाणिवांचे, प्रश्नांचे प्रतिबिंब वृत्तपत्रात पडणार हे नक्की. ते नेमके कसे पडावे हेही आपल्या हातात नसते.
फक्त त्या बदलत्या गोष्टींची चर्चा आपण करायची की नाही हा प्रश्न. मला त्यात तथ्य नाही असे जाणवले म्हणून मी मत मांडले.
बाकी चालू दे.

चतुरंग

बगाराम's picture

9 Jun 2008 - 8:14 pm | बगाराम

'सेक्स' ह्या नुसत्या शब्दान ज्यांच्या कपाळावर आठ्या पडतात तीच मंडळी सर्वात जास्त पर्वर्ट असतात असे माझ्या मानसशास्त्र शिकणार्‍या मित्राने सांगीतले होते. काय हरकत आहे ह्या मानवाच्या अत्यंत नैसर्गीक अंगावर चर्चा झाली तर?

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2008 - 8:25 pm | मुक्तसुनीत

बगाराम यांच्या पोस्टमधे एका आदरणीय सभासदाची (अप्रत्यक्ष आणि तिरकस रीतीने का होईना) पण "पर्वर्ट" या श्रेणीमधे गणना करण्याचे सूचन आहे त्याला माझी तीव्र हरकत आहे. बगारामांचा अंतःस्थ हेतू आणि त्यांची वैयक्तिक मते कशीही असो ; पण त्यानी कुणाही व्यक्तीला / समूहाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे "पर्वर्ट" वगैरे म्हणणे अयोग्य आहे. एकमेकांचा अदर करतच आपण आपली तीव्र मते व्यक्त करायला हवीत.

बगाराम's picture

9 Jun 2008 - 8:29 pm | बगाराम

मला (इथल्या) कुणाचाही उल्लेख पर्वर्ट असा करायचा नाही. तसा गैर समज झाल्यासा माफी असावी. फक्त माझ्या एका मानसशास्त्र शिकलेल्या मित्राचे मत सांगीतले.

सर्वांच्या मतांचा आदर करावा.

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2008 - 8:30 pm | मुक्तसुनीत

तुमचा आभारी आहे.

नारदाचार्य's picture

10 Jun 2008 - 4:55 pm | नारदाचार्य

(आणि आजही मुंबईत कोटीच्या आसपास खप असणारे)
ही कोटी छान आहे. एखादे मराठी वृत्तपत्र कोटीचा आकडा जेव्हा पार करेल तेव्हा करो, तोवर त्यांच्यासाठी ही कोटी मात्र आल्हाददायक निश्चितच आहे.

विकास's picture

9 Jun 2008 - 7:24 pm | विकास

"१५-२० वर्षांपूर्वीच्या भारताची प्रतिमा मनात घेऊन जर भारतात आलास (वो भारत देश है मेरा, वगैरे गाणं म्हणत..) तर तुझी सदमा मधील कमल हसनच्या शेवटासारखी अवस्था होईल...!" असा एकदा आजच्या तरूणाईतील (<२५ वर्षे) व्यक्तीचा, कालच्या तरूणाईतील व्यक्तीशी झालेला संवाद सांगीतला गेला होता.

आता ज्या पद्धतीत असले सदर हे "मेन स्ट्रींम" वर्तमानपत्रात चालू झाले आहे ते पहाता, (जर कोणी गोड गैरसमजूतीत असेल तर) सदमा मिळण्यासाठी भारतात जाण्याची गरज नाही - फक्त ऑनलाईन जा...:-)

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jun 2008 - 9:08 pm | प्रकाश घाटपांडे

या लैंगिक शिक्षणात काही गैर आहे असे नाही. पण केवळ लोकशिक्षण हा सदहेतु या मागे नक्की नाही. अर्थकारण हे त्यामागचे खरे कारण आहे. "ब्रह्मचर्य हेच जीवन वीर्यनाश हाच मृत्यु " या पेक्षा हे केव्हाही बरे.
लपले त्यावरी टपले सारे ओळखीचे चोर गं !
प्रकाश घाटपांडे

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2008 - 9:46 pm | मुक्तसुनीत

वर घाटपांड्यानी म्हण्टल्याप्रमाणे अशा विभागांमधे अर्थकारण आहे हे नक्की. परंतु अशी बाजारपेठ निर्माण होण्यामागे अर्थातच सामाजिक घडामोडी असतातच.

शहरीकरणाच्या प्रक्रियेने पकडलेला वेग हे कारण दिसतेच आहे. मला नक्की आकडेवारी सांगता येत नाही ; पण आजच्या घडीला लोकसंख्येच्या पिरॅमिड्मधे तरुण लोकांचे प्राबल्य असणे याचाही संबंध येतोच. तरुण लोकांसाठीचे "मार्केट" भारतीय उपखंडात अतिशय मोठे असल्याचे चित्र आहे.

विभागातल्या लिखाणावर वरवरून नजर फिरवली तर त्यातील उथळपणा जाणवतोच. काहीकाही मथळे सरळसरळ "प्रव्हॉकेटीव" (मराठी शब्द ?) वाटतात. पण काहीकाही बातम्या/लेख नक्कीच माहितीपूर्ण , उद्बोधक आहेत. "मल्टिप्लेक्स, मॉल्स, पबमध्ये कंडोम मशिन " , "कन्डोमचं चुकलेलं समीकरण" , "भारतीय देहव्यापाराचा अमेरिका सर्वात मोठा ग्राहक" यासारखे लेख समस्याना स्पर्श करणारे आहेत. रंजनातून प्रबोधन , आणि खपाची वाढ अशा मिश्र उद्दिष्टांचे या सदरातून दर्शन होते आहे. सर्व पत्रकारिताच जिथे चुकीच्या अर्थाने आंग्लाळलेली , उथळ झालेली आहे तिथे हा विभागही झाला यात नवल नको. पण नीरक्षीरविवेक वापरल्यास अशा विषयांच्या चर्चेला , अभिसरणाला प्राधान्य मिळते आहे ही एकूण गोळाबेरीज योग्यच दिशेने होते आहे असे मला वाटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2008 - 10:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकशाहीचा आधार स्तंभ, लोकशिक्षणाचे पाईक, या उद्देशांशिवाय दैनिके केवळ केवळ आर्थिक कारणांसाठीही चालतात हे सुत्र नवीन नाही. वाचकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग भविष्यात दैनिके आखतील त्याचा पाया म्हणजे वरील दैनिकाचा दुवा. ऑनलाइन असणा-या वाचकांना ,माय मराठीच्या वाचकांना एक चांगले माहितीचे केंद्र सुरु झाले असे म्हणने जरा धाडसीपणाचे होईल असे वाटते, त्यांना हे नवीन नसावे, नाहीच. सकाळी या दुव्यावर जातांना माझ्या-आजूबाजूला कोणी नाही ना याची चाचपणी सदरील लेखन वाचतांना करावी लागली. अजूनही शहरा- शहरांमधे असलेली सांस्कृतिक दरी दूर झालेली नाही, (आम्ही या बाबतीत मागासलेलेही असू शकतो. ) असेही या निमित्ताने वाटले. असे का वाटले तर अशी संस्कृती अजूनही सामान्य माणसापासून ब-याच दूर आहे असेही वाटून गेले. लैगिक शिक्षणाबद्दल जिथे मोकळेपणाने बोलता येत नाही, चर्चा करता येत नाही, माहिती घेता येत नाही. असे असतांना ते काम जर दैनिके करत असतील तर ती नक्कीच चांगली गोष्ट आम्ही मानतो. जिथे शाळेत अशा प्रकारच्या शिक्षणाला विरोध होतो, जिथे अशा शिक्षणाची गरज आहे, असे असतांना असे माहितीपूर्ण ( दुव्यावरील लेखन माहितीपूर्ण आहे का ? हा भागही वेगळा ) लेख केवळ जालावर न राहता, छापील दैनिकांमधेही लैंगिक शिक्षणाबद्दल माहिती असलीच पाहिजे असे वाटते. एकीकडे माध्यमांद्वारे भडक असे चित्रण खेड्यापाड्यात पोहचलेच आहे, अर्थाकारणांबरोबर योग्य पद्धतीने शिक्षणाचाही हेतू असला पाहिजे असे वाटते. कमीत-कमी गर्भनिरोधकगोळ्या, कंडोम, मागायला संकोच करणा-या कुटुंबातील लोकांना निदान शिक्षणाने तरी मोकळेपणा येईल असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2008 - 10:52 pm | मुक्तसुनीत

बिरुटे यांच्याशी बहुतांशी सहमत !

एकीकडे माध्यमांद्वारे भडक असे चित्रण खेड्यापाड्यात पोहचलेच आहे, अर्थाकारणांबरोबर योग्य पद्धतीने शिक्षणाचाही हेतू असला पाहिजे असे वाटते. कमीत-कमी गर्भनिरोधकगोळ्या, कंडोम, मागायला संकोच करणा-या कुटुंबातील लोकांना निदान शिक्षणाने तरी मोकळेपणा येईल असे वाटते.

वर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. "कांटा लगा" सारखी गाणी संध्याकाळी कुटुंबातील सर्व लोक टीव्ही बघताना प्रसारित होतात. मल्लिका शेरावत-राखी सावंत यांच्या आणि इतर यक्ष-यक्षिणींच्या चित्रा-दृष्या-गाण्यांची पोस्टर्स गावोगावी लागतात. परंतु लैंगिक शिक्षणाच्या, त्याबाबतीतील समस्यांच्या चर्चेच्या, एकूण प्रबोधनाच्या नावाने मोठा गदारोळ होतो ; असे हे विसंगत चित्र आहे.

मटाच्या उपक्रमात "पेज -थ्री" पत्रकारितेचा धंदेवाईकपणा आहेच; परंतु येथील लिखाणाचे स्वरूप आणि आजूबाजूची सामाजिक परिस्थिती पहाता काही प्रमाणात त्या विभागाच्या असण्याची आपल्याला कबुली द्यावी लागते.

धनंजय's picture

10 Jun 2008 - 1:59 am | धनंजय

छापील माध्यमांत लैंगिकता हा विषय हाताळला गेला पाहिजे.

विकास's picture

10 Jun 2008 - 3:12 am | विकास

लैंगिक शिक्षणाच्या विरोधात मी नाही. ते होणे महत्वाचे आहे असे मला वाटते. आधी कधी तरी सांगितले त्याप्रमाणे इंजिंनियरींग कॉलेजात असताना मी त्यावेळच्या सरांचा (बिरूटे सरांसारखे नव्हते ते :-( ) विरोध असताना देखील "कामसंवाद" असा मराठी वाड्मय मंडळात डॉ. आनंद नाडकर्णींचा कार्यक्रम आयोजीत केला होता. तो मराठी-अमराठी लोकांमधे प्रसिद्ध झाला होता पण "सेक्स" या विषयावरील कार्यक्रम असून देखील वक्त्याने, श्रोत्यांनी आणि म्हणूनच कार्यक्रमाने कमरेखालचे सोडले नाही..

पण म.टा. चे मथळे पहा:

पुरुषांनो, सेक्स करताना तुम्हीच चुकता
सकाळच्या पारी, सेक्सची बारी...
सुहागरात्री होते नववधूंच्या कौमार्याची परीक्षा
कांगारुंना हवा ‘वर्जिन’ जीवनसाथी

मला येथे क्लिंटन ऍड्मैनिस्ट्रीशेन मधे एक वादग्रस्त सर्जन जनरल जॅकलिन एल्डर्स जी लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत खूप पुरस्कर्ती होती तिचे एक चांगले वाक्य ऐकल्याचे आठवते (तिची वादग्रस्त विधाने जालावर मिळाली पण हे मिळाले नाही! पण ऐकल्याचे चांगले आठवते): sex is 90% above the neck (in your head) and 10% below the belt.

भाषा पण अशीच हवी सर्वसामान्यात आणि कुठल्याही वयोगटात ते वाचायला गेले तर आंबट शौकीन वाटणे आणि त्याला सेक्स एज्युकेशन म्हणणे मात्र पटत नाही.

मुक्तसुनीत's picture

10 Jun 2008 - 3:20 am | मुक्तसुनीत

विकासरावांचा मुद्दा बिनतोड आहे. याचा उल्लेख मी माझ्या वरच्या पोस्टमधे केलेला आहेच. लोकप्रियतेच्या नादात हे लोक वहावत गेले हे खरे. परंतु एकंदर या विषयाबद्द्दलचा अवेअरनेस वाढावा म्हणून असा विभाग असणे हिताचे. कदाचित आज-उद्या मटाने कूस बदलली तर हा विभाग योग्य त्या प्रकृतीचा बनेलसुद्धा.

कौंतेय's picture

10 Jun 2008 - 4:06 am | कौंतेय

तुम्ही केलेत ते सात्विक लैंगिक शिक्षण आणि मटा करते आहे तो सवंग स्टंट असा तुमच्या बोलण्याचा सूर दिसतो आहे.
तुम्ही केलेल्या कार्यक्रमातील काही भागही द्या ना इथे म्हणजे आम्हालाही पाहता येईल सात्विक लैंगिक शिक्षण कसे असते ते.
आणी तसेही शेवटी लैंगीक शिक्षण झाल्याशी मतलब आहे ना?
सात्विक की सवंग त्याने काय फरक पडतो?

मटातीअल लेख काही निव्वळ भावना उद्दीपीत करण्यासाठी लिहिलेले नाहीत.
तुम्ही जे मथळे दिले आहेत त्यात नक्की काय आक्षेपार्ह आहे ते समजले नाही.
तुम्ही नुसतेच मथळे वाचलेत की लेख देखिल वाचलेत?
निव्वळ भावना चाळवण्यासाठी केलेले लेखन आम्ही आमच्या कॉलेज जीवनात भरपूर वाचले आहे (खोटं कशाला बोला?) त्याच्या जोरावर सांगतो वरील लेख हे भावना चाळवण्यासाठी नाहीत.
तसेच ह्या सदराचे नाव देखिल सेक्स न्युज आहे म्हणजेच सेक्स विषयी बातम्या.
त्यामूळॅ 'कांगारुंना हवा ‘वर्जिन’ जीवनसाथी' ही एक (किती महत्वाची हा मुद्द गौण) बातमी नाही का?
मग ही इथे नाही तर काय पहिल्या पानावर छापायची का?

विकास's picture

10 Jun 2008 - 8:28 am | विकास

तुम्हाला पटले नाही तर न पटू देत.

तुम्ही केलेत ते सात्विक लैंगिक शिक्षण आणि मटा करते आहे तो सवंग स्टंट असा तुमच्या बोलण्याचा सूर दिसतो आहे.

असे कोण म्हणतयं? सात्विक वगैरेचा काही संबंध येथे येत नाही. जे शब्द मी वापरले पण नाहीत ते कुठे मधेच घुसडताहात? नाडकर्णींचा कार्यक्रम पहाताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांपासून, प्राध्यापक (स्त्री/पुरूष) , विद्यार्थी/विद्यार्थिनी एकत्र बसून सहभागी होत पाहू शकले. किंबहूना सभ्यतेच्या किमान मर्यादा मुले अथवा कार्यक्रम ओलांडणार नाही ना हे बघायला तेथे प्राध्यापक बसले होते पण कार्यक्रम खेळीमेळीत चालू झाला आणि अनेक प्रश्नोत्तरांनंतर संपला.

आणी तसेही शेवटी लैंगीक शिक्षण झाल्याशी मतलब आहे ना? सात्विक की सवंग त्याने काय फरक पडतो?

तुम्हाला पडत नसेल पण मला आणि इतर अनेकांना फरक पडत असेल. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला ते आवडले नाही म्हणले आहे आणि ते नाही आवडले.

तुम्ही जे मथळे दिले आहेत त्यात नक्की काय आक्षेपार्ह आहे ते समजले नाही. तुम्ही नुसतेच मथळे वाचलेत की लेख देखिल वाचलेत?

वाचल्याशिवाय फुकटची टिका करत नाही आहे. तुम्हाला जर त्या लेखांमधे काही गैर वाटत नसेल तर त्याचे मोठ्यांदा वाचन करा आणि बघा इतरांना काय वाटते ते... त्या संदर्भात मी म्हणले होते की आनंद नाडकर्णींचा कार्यक्रम जाहीर पणे होत असताना त्यात कुठे चिपनेस/आंबटशौकीनपणा नव्हता जो मला म.टा.च्या या लेखांमधे वाटला.

निव्वळ भावना चाळवण्यासाठी केलेले लेखन आम्ही आमच्या कॉलेज जीवनात भरपूर वाचले आहे (खोटं कशाला बोला?) त्याच्या जोरावर सांगतो वरील लेख हे भावना चाळवण्यासाठी नाहीत.

तुम्ही आणि तुमचा जोर कशावर आहे ते तुमचे तुमच्याकडे...पण सामाजीक सभ्यतेच्या म्हणून ज्या काही एका प्रतिष्ठीत वर्तमानपत्राकडून अपेक्षा असू शकतात त्या बाबतीत हे वर्तन "कमजोर" वाटले. एखादे वर्तमानपत्र जेंव्हा असले काहीतरी संकेतस्थळाच्या पहील्या पानावर (होमपेजवर) असे लिहीते तेंव्हा ते पायरी सोडून वागल्यासारखे वाटते आणि ते म.टा. कडून झाल्याबद्दल जास्तच खेद वाटला.

त्यामूळॅ 'कांगारुंना हवा ‘वर्जिन’ जीवनसाथी' ही एक (किती महत्वाची हा मुद्द गौण) बातमी नाही का?

मटा सारखे आणि कुठलेही मराठी वर्तमानपत्र हे देशातील आणि जगातील इतर चांगल्या आणि मान्यवर वर्तमानपत्राच्या तोडीचे बनावे अशी प्रामाणिक सदीच्छा असते. म्हणून असे वाटते की हा सगळा उठवळपणा आहे. पण आपले वरील प्रतिक्रीयेतील शब्द वाचल्यावर लक्षात आले की मटाचे मार्केटींग डिपार्टमेंट बरोबर आहे, आम्हीच चूक... :-( कारण खप वाढवायचा असेल तर तुमच्या सारख्यांना हे वर्तमानपत्र आवडणे हे अधिक महत्वाचे... ;)

रम्या's picture

10 Jun 2008 - 3:22 am | रम्या

सहमत.

विसोबा खेचर's picture

10 Jun 2008 - 8:28 am | विसोबा खेचर

बाय द वे, लैंगिक शिक्षणाचं हे फॅड मी अलिकडेच १५-२० वर्षांपासून ऐकतोय!

आम्हाला जळ्ळं कुणी दिलं हो लैंगिक शिक्षण मरायला? आमच्या बाप-दादा-आजोबा-पणजोबांना, आई-आज्जी-पणजीला कोण आलं होतं हो लैंगिक शिक्षण द्यायला? असं काय मोठं बिनसलं हो त्या मंडळींचं? आमचं?

उगाच काय काहितरी! छ्या....!

तात्या.

मुक्तसुनीत's picture

10 Jun 2008 - 8:38 am | मुक्तसुनीत

त्या विभागातले काही लेख चाळून पहा. कंडोमच्या वापराबद्दल, त्याच्या उपलब्धतेबद्दल जर का काहीसा मोकळेपणा आला तर एड्स् आणि इतर गंभीर रोगांच्या प्रादुर्भावाला आळा बसायला खूप मदत होईल.

आणखी एक उदाहरण देतो लैंगिक विषयाच्या प्रबोधनाबद्दल. र.धों. कर्वे पाऊण शतकापूर्वी जे सांगत होते त्याचा खरेपणा समजून यायला देशाची लोकसंख्या १०० कोटीवर पोचायला लागायच्या सुमारास सर्वोच्च पातळीवर जाणवू लागली. प्रगत राष्ट्रामधील कुटुंबनियोजनाचे लोण भारतात योग्य वेळी न पोचण्याचे कारण होते , अर्थातच शिक्षण-प्रबोधनाचा अभाव.

अशा स्वरूपाचे प्रश्न योग्य वेळी अड्रेस केले नाहीत की मग एड्स् , स्त्रीगर्भाच्या हत्या , लोकसंख्यावाढ असले प्रश्न उग्र स्वरूप धारण करतात.

अशा प्रश्नांचे स्वरूप व्यापक आहे. वैयक्तिक पातळीवर हिशेब करून कसे चालेल ?

विसोबा खेचर's picture

10 Jun 2008 - 8:55 am | विसोबा खेचर

अशा प्रश्नांचे स्वरूप व्यापक आहे. वैयक्तिक पातळीवर हिशेब करून कसे चालेल ?

ठीक!

लैगिक शिक्षणामुळे भारतात एड्स्, स्त्रीगर्भाच्या हत्या, लोकसंख्यावाढ या प्रश्नांवर काही उपाय होणार असेल तर आमचं काही म्हणणं नाही!

आशा अमर आहे!

चालू द्या..:)

तात्या.

मदनबाण's picture

10 Jun 2008 - 9:05 am | मदनबाण

मला तर हे वाचुन फारच त्रास झाला.....
भारतीय देहव्यापारातील २० टक्के ग्राहक अमेरिकन आहेत. भारतीय स्त्रियांना अमेरिकेत धाडण्याचा व्यापार इतका शिगेला पोहोचला आहे की, १९व्या शतकातील गुलामांच्या व्यापारालाही मागे टाकले आहे
ही स्थिती फारच वाईट आहे.... इथ जनसंख्येवर कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही आणि हा व्यापार मात्र वाढतच चालला आहे.....
म्हणजे आता काही दिवसातच भारतीय बाजारात या भारतीय स्त्रीयांचे अमेरिकन पुरुषांबरोबरच्या ब्लुमुव्हीज मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर नवल वाटायला नको!!!!!
आणि हे ही भयानकच आहे.....
गेल्या काही वर्षात मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये शरीरविक्रय करणाऱ्या ' गोऱ्या ' तरुणींचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे... या मुलींमध्ये युकेन , कझाकिस्तान या देशांतील तरुणींची संख्या अधिक आहे.
भारतीय लोक कसे भोगवादाच्या मागे लागले आहे हा त्याचा उत्तम पुरावा आहे.....

विसोबा खेचर's picture

10 Jun 2008 - 9:26 am | विसोबा खेचर

भारतीय लोक कसे भोगवादाच्या मागे लागले आहे हा त्याचा उत्तम पुरावा आहे.....

भारतीय लोकंच का? आज सगळ्या जगातच भोगवाद सुरू आहे. आणि त्यातून होणारे बरेवाईट परिणाम सर्व भोगवाद्यांना भोगावेच लागणार आहेत! तेव्हा काळजी कशाला करा? :)

तेव्हा चाललंय ते उतमच चाललंय असं मी म्हणेन...!

आणि काय चांगलं/काय वाईट हे आपण कुणाला सांगून आपलं कुणी ऐकणार आहे का? आणि मुळात दुसर्‍याला असं काही सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे का? आपण फक्त आपल्याच मुलाबाळांना काही गोष्टी समजावून सांगू शकतो. त्यांनी त्या ऐकल्या तर चांगलंच आहे नायतर होणारे बरेवाईट परिणाम त्यांनाच भोगावे लागतील! सिंपल...!

अगदी माझंच उदाहरण देतो. "तंबाखू वाईट असतो, त्यामुळे कॅन्सर होतो" असं अनेक डॉक्टर सांगतात. तरीही मी तंबाखू खातो, मला तो खावासा वाटतो. आणि मला तो सोडावा असं आज तरी मुळीच वाटत नाही. आजपर्यंत तंबाखूची तल्लफ भागवताना जी मौज वाटली ती उद्या कदाचित तोंडाचा कॅन्सर होऊन तेवढीच वेदनादायक ठरेल! त्याला माझी तयारी आहे, मला त्या यातना कंपलसरी भोगाव्याच लागतील याची मला कल्पना आहे! सिंपल...! :)

तात्या.

पक्या's picture

10 Jun 2008 - 11:13 pm | पक्या

तात्या आगाऊपण्याच्या सल्ल्याबद्द्ल माफी. पण तंबाखूचे व्यसन खरेच वाईट हो.
माझे मामा सततच्या तंबाखू खाण्याने शेवटी कॅन्सरने गेले. आणि त्यावेळी त्यांना ज्या यातना झाल्या त्या बघवल्या नाहीत.
तुमच्याबद्द्ल मनात एक आदराची , आपलेपणाची भावना आहे. म्हणून हे सांगणे.

विसोबा खेचर's picture

11 Jun 2008 - 6:17 am | विसोबा खेचर

हम्म! तंबाखू सोडायचा प्रयत्न करीन पक्याशेठ!

आपुलकीबद्दल कृतज्ञ आहे..

तात्या.

प्रमोद देव's picture

10 Jun 2008 - 9:23 am | प्रमोद देव

सद्या मटामध्ये जे काही येत आहे त्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही. डॉ.राजन भोसले ह्यांच्यासारख्या त्या विषयातल्या निष्णात डॉक्टरकडून ह्याबाबतची उत्तरे दिली जातात हे नजरेआड करून चालणार नाही.
मुंबईत गेली काही वर्षे डॉक्टर विठल प्रभू(निरामय कामजीवन...ह्या पुस्तकाचे लेखक),डॉक्टर आनंद नाडकर्णी,डॉक्टर राजन भोसले ,डॉक्टर कोठारी(इ-टीव्हीच्या संवाद कार्यक्रमात दोन भागात झालेली मुलाखत) असे कितीतरी ह्या विषयातले तज्ञ लोकांच्या मनातले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करताहेत. हे प्रयत्न सातत्याने केल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणार नाहीये.

लग्नाआधी पुरुष आणि स्त्री ह्या दोघांच्या मनात अनेक शंका-कुशंका असतात आणि त्यांचे निरसन करण्यासाठी त्यांच्यासमोर कोणताच मार्ग नसतो. आपण तर आपल्या घरात असल्या विषयांवर साधी कुजबुजही करायला तयार नसतो. मग ही होतकरू मंडळी काही पिवळ्या पुस्तकांच्या मदतीने आपले ज्ञान अद्ययावत करतात. मुळात ह्या पुस्तकातील माहिती अतिरंजित स्वरूपात असते आणि त्यामुळे त्या मंडळींना चुकीचे मार्गदर्शन होते.

अशा परिस्थितीत आज जर मटा अथवा इतर कुणी अशा विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत असेल तर त्यांना मी तरी धन्यवादच देईन.

माझ्या लग्नाआधी मलाही ह्या विषयातले निव्वळ ऐकीव ज्ञान होते आणि त्यामुळे मनात संभ्रम होता की आपण कसे काय त्यात यशस्वी होऊ?
पण त्याच काळात डॉ. र.धों.कर्वे ह्यांचे संततीनियमनाबद्दलचे एक पुस्तक माझ्या वाचनात आले आणि माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे त्यात मिळाली. त्याच सुमारास डॉ.विठ्ठल प्रभू ह्यांचे 'निरामय कामजीवन' हे पुस्तक वाचनात आले आणि उरल्या सुरल्या शंकांचेही निरसन झाले.
ही पुस्तके वाचल्यावर माझ्या लक्षात आले की आजवर जी माहिती मी इतरांकडून ऐकलेली होती ती किती चुकीची आणि अतिरंजित होती.

आज वर्तमानपत्र,दूरदर्शन ह्या माध्यमातून लैंगिक बाबींवर जी चर्चा होतेय ती होणे निश्चितच गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या तरूण मंडळींना त्याबाबतचे योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचे वैवाहिक कामजीवन निरामय होईल. स्त्री-पुरूषांमधला न्युनगंड,अज्ञान दूर झाल्यामुळे कैक मोडणारे संसार सावरतील ह्याबद्दल मला शंका नाही.

आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्याप्रमाणे ह्या बाबतही आहे हे मान्य. फायदा आणि तोटा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून नाणे वापरूच नये की काय?ह्या ज्ञानाचा फायदा कोण कुठल्या कारणांसाठी घेईल हे ज्याच्या त्याच्या मानसिक कुवतीवर अवलंबून आहे. तरीही हा उपक्रम स्तुत्य आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

शरुबाबा's picture

10 Jun 2008 - 11:24 am | शरुबाबा

< < ह्या महाजालाने तर पहिल्यांदाच वाट लावली आहे.. त्यात आता वर्तमानपत्राची भर

<< तद्दन फालतू लिंक!

<< सेक्स' ह्या नुसत्या शब्दान ज्यांच्या कपाळावर आठ्या पडतात तीच मंडळी सर्वात जास्त
पर्वर्ट असतात

<< एकेकाळी आदरास पात्र असणारे (आणि आजही मुंबईत कोटीच्या आसपास खप असणारे)
मुंबईतले एक आघाडीचे मराठी वृत्तपत्र अशा प्रकारचा एक विभाग सुरू करते. या घटनेमधे
नक्कीच वर्तमान काळाची पावले दिसत आहेत.

<< अशा परिस्थितीत आज जर मटा अथवा इतर कुणी अशा विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन
उपलब्ध करून देत असेल तर त्यांना मी तरी धन्यवादच देईन.

मला वाटते ,वरच्या प्रतीक्रिया पुरेश्या बोलक्या आहेत .

मनापासून दिलेल्या या अभिप्रायांबद्दल आभारी... धन्यवाद