तुटल्या तार्याची उल्का मी
मी एक शलाका जलणारी
राखेतिल सुप्त निखारा मी
पाण्यातिल ज्वाला झुरणारी
का व्हेट दिली का ओढ मला
आशा अभिलाषा भाव उरी
एकांत क्लांत विरही रात्री
स्वप्नात होतसे गाठ जरी
ह्या ध्यासाचे नच मोल तुला
टांगते सदा मन अधांतरी
मज आस प्रभाती रोज असे
आलिंगशील एकदा तरी
..........................अज्ञात
प्रतिक्रिया
12 Jan 2012 - 12:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
.............................!!!
12 Jan 2012 - 7:12 pm | गणेशा
जबरदस्त ...
पुढील २ हि कडवी मात्र या कडव्यापुढे कमी वाटत आहेत...
16 Jan 2012 - 11:39 pm | रघु सावंत
' ह्या ध्यासाचे नच मोल तुला
टांगते सदा मन अधांतरी '
ही ओळ या पोरिंना एकदम शोभते
पहिले कड्वे छान च आहे,
कविता आवड्ली
रघु सावंत