मित्र हो,
पुज्य चितळेबाबांच्या गिरनारची यात्रा आपण वाचलीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सादर करत आहे.
दरवर्षी चितळेबाबा आमच्याकडे गणेशोत्सवात आरास व मुर्तीच्या दर्शनाला येतात. २०११ मधील उत्सवात, त्यावेळी आमच्या सुनबाईंनी नुकत्याच सजवलेल्या हॉलची पहाणी करायला बाबा आवर्जून आले होते. त्यावेळी पुत्र चिन्मयच्या मित्रांना बाबा आजकालच्या अरेरावीच्या जमान्यात आपले स्वरक्षण कसे करावे याच्या अनेक युक्त्या दाखवल्या पैकी विशेषतः तीन समोरून आणि एक मागून कोणी हल्ला करायला आले तर कसे लढावे याचे एक व्हीडिओ प्रात्यक्षिक येथे दाखवले आहे. त्या दिवशी बाबांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू कळाला.
ते सांगत होते कि सुरवातीच्या काळात हवाईदलातील मल्लांच्या संघातून त्यांनी बक्षिस मिळवले होते. त्यांचा दरारा एक दमदार कुस्तीगीर म्हणून होता.
मिपाकरांना त्यांच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घ्यायचा असेल तर वरील लिंक वरून अवलोकन करावे. आणि स्वरक्षणाची प्रेरणा घ्यावी.
ही विनंती
प्रतिक्रिया
8 Jan 2012 - 10:44 am | गवि
"अय्या बाप्पांचे शक्तीचे प्रयोग सुरु झालेले दिसतायत."
- पुलंचे स्मरण करुन.
(संदर्भ: समजा तुमच्या कोणी मुस्काटात मारली तर.)
9 Jan 2012 - 11:08 pm | पिवळा डांबिस
ठ्यांऽऽऽ!!!!
फुटलो!!!
:)
8 Jan 2012 - 11:02 am | अमित
हर हर महादेव
8 Jan 2012 - 11:12 am | तिमा
पुढून तीन आणि मागून एक हल्ला करुन आला तर काय करावे त्याचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. अॅक्शन इतकी फास्ट होती की परत स्लो मोशनमधे बघावे लागले.
कुणी जाणकार मिपाकरांनी आता, मागून तीन आले आणि पुढून एकच आला तर कसा प्रतिकार करावा याचे मार्गदर्शन करावे.
8 Jan 2012 - 12:01 pm | प्रभाकर पेठकर
मागून तीन आले आणि पुढून एकच आला तर कसा प्रतिकार करावा याचे मार्गदर्शन करावे.
चटकन तोंड फिरवून उभे राहावे म्हणजे पुढे तीन आणि मागे एक अशी रचना होईल नंतर मुळ लेखात सांगितल्याप्रमाणे स्वरक्षण करावे.
8 Jan 2012 - 11:16 am | टवाळ कार्टा
काही शंका
जर ३ च्या ऐवजी एकच आला पण चाकू घेउन तर???
वरचीच शंका पण चाकु ऐवजी बंदूक असेल तर???
३ जण चाकू / बंदूक घेउन तर???
३ पेक्शा जास्त जण असतील तर???
मग सगळ्यांना प्रवचनाला बसवावे का?? :)
8 Jan 2012 - 11:17 am | टवाळ कार्टा
हल्ला "करणारी" असेल तर?? ;)
8 Jan 2012 - 12:11 pm | अमित
जर ३ च्या ऐवजी एकच आला पण चाकू घेउन तर???
वरचीच शंका पण चाकु ऐवजी बंदूक असेल तर???
३ जण चाकू / बंदूक घेउन तर???
३ पेक्शा जास्त जण असतील तर???
(स्वत:च्या) मागे २ लावून पळावे.....(पाय)
8 Jan 2012 - 1:49 pm | सुहास झेले
अमंळ प्रभावित... येऊच देत आता तीन हल्लेखोर, बघून घेतो ;) :) :)
9 Jan 2012 - 10:40 am | विसोबा खेचर
सुरवातीला चुकून चितळेबाबा म्हणजे मला कुणी रिपाईचे नेतेच वाटले..
बाय द वे, काय हो ओकबाबा, नाड्यांचा अभ्यास सोडून एकदम डिफेन्समध्ये कसे काय गेलात..?! :)
(पहिल्यापासूनच ओकशेठचा फ्यान) तात्या.
9 Jan 2012 - 12:19 pm | शशिकांत ओक
विसोबा खेचर,
आजकाल आठवले, काळे मंडळी रिपाई असतात, म्हणून नावे धोका देताना दिसतात. त्यावरून आपला ग्रह तसा झाला असे वाटते. आपले खेचर हे नाव तसे असल्याने संशय बळावतो.
पण जातीवर जाऊ नका असा संदेश देताना, जातीने ती लिंक पाहून मग ठरवलेत ते बरे केलेत.
10 Jan 2012 - 2:41 pm | प्यारे१
>>>खर आहे
अहो काका, खर नाही खेचर आहे.
कशाला उगाच जातीचा विषय काढताय दोघेही? जाऊ दे ना जात. ;)