प्रेम कस कराव हे खरच कळत नाहि मला
म्हणुन तर येता जाता प्रेमाचा देखावा करणार हे जग
ढ म्हणत मला.....
कारण....
मी कधिच करत नाहि तिला चंद्र सुर्य तारे आणुन देईन म्हणुन वादे,
अन नाहि सांगत माळिन केसात तुझ्या गजरा म्हणुन मोतियाचे दाणे...
मि कधिच नाहि दाखवत तिला खोटी आशा सोन्याने सजवायचि
देत नाहि सतत खोट वचन ति खुश बघावि म्हणुन जिव देण्याचि.....
मि देत असतो तिला सतत एक विश्वास
नेहमि देईन साथ सुख आणि दुखात.
सुख असेल तेव्हा आनंद देइनच
पण जेव्हा असेल खुप दुख तेव्हा
काळजि घेइन खरच तुझि जिवापाड....
तिच्यावर येणार प्रत्येक आघात झेलिन माझ्यावर
सतत करुन तिच्या आणि फक्त तिच्या सुखाचि आस.
देणार नाहि अंतर कधिहि जोवर असेल
माझ्या शरिरात अखेरचा श्वास.....
म्हणुन तर हे जग प्रेमा ढ म्हणत असेल मला
तर खरच खुशाल म्हणु दे मला
कारण प्रेम हे करायच असत मनलावुन
तिला सुखि करतानाच येत असते जगण्यात खरि मजा
प्रतिक्रिया
4 Jan 2012 - 11:54 am | प्रचेतस
तुमच्यात विवेक खोत संचारलेले दिसतात आता.
4 Jan 2012 - 11:56 am | गवि
म्हणजे, हे ते नाहीत????
4 Jan 2012 - 11:57 am | प्रचेतस
नाहीत हो. खोतांचे म्हणे आताच तर लग्न झालेय १९ डिसेंबरला, सध्या हिंदोळ्यांवर झुलत असावेत ते. ;)
4 Jan 2012 - 12:02 pm | ५० फक्त
अरे हिंदोळ्यावर पक्षी पाळ्ण्यात जन्मानंतर टाकतात, लग्नानंतर नाय, तो हिंदोळा काव्यात्म असावा लागतो भौतिक नाय, असो, बाकी आपला प्रतिसाद पाहिल्यावर धागा वाचायचे कष्ट घेतलेच नाहीत, तरी वाचावा काय याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित आहे.
4 Jan 2012 - 12:08 pm | प्रचेतस
हिंदोळा हा शब्द काव्यात्मकरित्याच वापरलाय हो ५० राव. येथे सुखाचे हिंदोळे हा शब्द अपेक्षित आहे. :)
धागा जरूर वाचाच, तुम्हाला त्यात प्रतिसाद देण्यासाठी भरपूर मटेरियल सापडेल व तुमच्या आगामी क..क..कपलचा या लेखमालिकेसाठीही त्याचा भरपूर उपयोग होईल. ;)
4 Jan 2012 - 12:15 pm | ५० फक्त
चालेल चाले, वाचतो आता. बाकी क क ... ला इथं जगु देतील याची खात्री नाही वाटत हल्ली...
5 Jan 2012 - 2:15 pm | निश
गवि साहेब
वल्लि साहेब
५० फक्त साहेब
कविता वाचलित म्हणुन आभार...