आयुष्य म्हंजे

निश's picture
निश in जे न देखे रवी...
2 Jan 2012 - 11:09 am

आयुष्य म्हंजे...

एका चांगल्या महागड्या हॉटेलातील जेवण,
बील दुसरा कोणी भरणारा असेल तर आनंद देणार
व आपल्याला भराव लागणार असेल तर घाम फोडणार...

आयुष्य म्हंजे...

पहिल्या पगारातुन मुलाने आईवडिलाना प्रेमाने आणलेलि भेटवस्तु
व ति भेटवस्तु घेताना मुलाच्या कौतुकाने आलेले आइवडिलांच्या
डोळ्यातले आनंदाचे अश्रु...

आयुष्य म्हंजे...

त्याच मुलाकडुन लग्न झाल्यानंतर बायकोला आइवडिल घरात नको
म्हणुन म्हातार्‍या आईवडिलाना वॄधाश्रमात पाठवणारा तोच मुलगा
व वॄधाश्रमात जाव लागत म्हणुन मनापासुन घाबरलेले तेच त्याचे आईवडिल
व त्यामुळि आलेले त्यांच्या डोळ्यातील दुखाने आलेले अश्रु...

आयुष्य म्हंजे...

ऑफीसातील कामाच्या ओझ्याने खंगत चाललेला नवरा
व वाढणार्‍या महागाईत घर सांभाळताना नवर्‍याला पगार कमी
म्हणुन सतत चिडचिड करणारि पण त्याचा संसार मन लावुन करणारि त्याचि बायको...

आयुष्य म्हंजे...

लोक उगाच नाव ठेवतिल म्हणुन नविन जन्माला आलेलि मुलगी,
अनाथ आश्रमात सोडुन जाणारे क्रुर आईवडिल
व तिच मुलगी , मुल होउ शकत नाहि म्हणुन
त्याच अनाथ आश्रमातुन दत्तक घेणारे व तिच्यावर जिवापाड प्रेम करणारे एक प्रेमळ जोडप...

आणि आयुष्य म्हंजे...

मित्रांबरोबर खिश्यात पैसे नसताना सगळ्यांनि मिळुन प्यायलेला
एक कटिंग चहा खरा तर थोडाच पण मनापासुन आनंद देणारा.....

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

लोक उगाच नाव ठेवतिल म्हणुन नविन जन्माला आलेलि मुलगी,
अनाथ आश्रमात सोडुन जाणारे क्रुर आईवडिल

ह्या ओळी काही कळ्ल्या नाहीत ?
लोक का नाव ठेवतिल?

निश's picture

2 Jan 2012 - 11:59 am | निश

पियुशाजि..

१)आपण रोज पेपरमध्ये वाचतो कि भारतात मुलिंच जन्माला येणार प्रमाण कमि होत आहे आणि तेहि भयानक रित्या.

२) अजुनहि आपल्या देशात, काहि समाजात मुलगि जन्माला आलि म्हणुन मुलगि मारुण टाकतात किंवा अनाथआश्रमात सोडुन देतात( आजहि राजस्थानात काहि समाजात हि वाईट प्रथा चालु आहे कदाचित मुलगि हि लग्नहोउन सासरि जाणार मग स्वताच्या घराला वंशाचा दिवा नको का हा हि समज असु शकतो.)

३) आणि भोवतालचि स्त्रियांबद्दल वाईट होत जाणारि परिस्थिति....

४) अजुन एक आजहि आपल्याकडे कित्येक समाजात हुंडा घेतला जातो तो हि मुलिचे आईवडिल गरिब कंगाल होतिल एव्हढा तेहि एक कारण आहेच.

५) आजही कित्येक समाजात मुलगि जन्माला आलि तर मुलिला व तिला जन्म देणार्‍या आईला सासरकडचि लोक त्रास देतात छळ हि करतात, म्हणुन ति ओळ प्रातनिधिक स्वरुपात वापरलि आहे.

निश's picture

3 Jan 2012 - 3:30 pm | निश

पियुशाजि धन्यवाद

कधि लेख किंवा कविता नाहि आवडलि तर जरुर आपल परखड मत कळवा

परत एकदा पियुशाजि धन्यवाद

पैसा's picture

2 Jan 2012 - 6:32 pm | पैसा

आयुष्याची गोळाबेरीज, एका नाण्याच्या २ बाजू चांगल्या लिहिल्या आहेत.

ज्योति़जि मि आपला आभारि आहे.

जेव्हा लेख किंवा कविता आवडणार नाही तेव्हाहि जरुर आपल परखड मत धा.

ज्योति़जि मि पुन्हा एकदा आपला आभारि आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2012 - 9:25 pm | अत्रुप्त आत्मा

मांडणी आणी आशय,दोन्ही उत्तम आहे..

अत्रुप्त आत्मा साहेब धन्यवाद

कधि लेख किंवा कविता नाहि आवडलि तर जरुर आपल परखड मत कळवा

परत एकदा अत्रुप्त आत्मा साहेब धन्यवाद

पाषाणभेद's picture

2 Jan 2012 - 11:47 pm | पाषाणभेद

छान आशय

पाषाणभेद साहेब धन्यवाद

कधि लेख किंवा कविता नाहि आवडलि तर जरुर आपल परखड मत कळवा

परत एकदा पाषाणभेद साहेब धन्यवाद