चंद्रिका आकाशलक्षी; कूस छाया पावली
त्या प्रभाती, नांदणार्या; जागल्या अन चाहुली
मंद वारा गंधमंडित छंदला गात्रांतुनी
धुंदल्या हृदयी; स्वरांच्या; आर्द्र ओल्या मैफिली
तेच गाणे ते उखाणे पापण्यांची सावली
सुप्तशा वर्मास छेडे, गोत, हलक्या पाउली
डोहजळकुंभात फुलल्या; तलम कोमल कमलिनी
आर्त रात्रीचे विखुरले, स्वप्न भरले लोचनी
.......................अज्ञात
प्रतिक्रिया
2 Jan 2012 - 10:03 am | लीलाधर
फारच अप्रतिम शब्दरचना. आणि
आर्त रात्रीचे विखुरले, स्वप्न भरले लोचनी.
ह्या स्वप्न भरल्या लोचनांनी नवीन वर्षात पदार्पण करूयात आणि ही सगळी स्वप्ने पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
2 Jan 2012 - 11:15 am | मिसळलेला काव्यप्रेमी
अफाट!!!
2 Jan 2012 - 12:34 pm | निश
V C M म्हंजे वा छान मस्त
म्हणुन V C M कविता आहे.
2 Jan 2012 - 4:52 pm | अज्ञातकुल
सर्वांचे आभार आणि नव्या वर्षाच्या हर्दिक शुभेच्छा :-)
www.adnyaatvaas.blogspot.com
2 Jan 2012 - 9:18 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा..व्वा...व्वा...अज्ञातकुल..वा! आज तुंम्ही मन तृप्त करुन टाकले आहे...
अत्रुप्त आत्मा तृप्त जाहला,काव्य वाचूनी तुझे।
काय बोलू अन्य आता,शब्दही झाले खुजे॥....
या झकास गहिर्या काव्यामुळे आज निवांत झोप मिळणार बघा...!
3 Jan 2012 - 9:59 am | अज्ञातकुल
आपल्या प्रतिसादानी कविता कृतकृत्य झालीय माझी. खूप खूप आभारी :)