मदत पाहिजे - जीवनशाळांच्या रेकॉर्ड्सचे संगणकीकरण

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
29 Dec 2011 - 9:50 pm

मित्रहो,

जीवनशाळांच्या गेल्या वीस वर्षातील रेकॉर्ड्सचे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. आज पर्यंत शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड व्यवस्थितपणे पण लेखी चोपड्यांमधून जतन केले गेले आहे. हे सगळे आता संगणकावर घेतले जात आहे.

यासाठी, आम्हाला, युनिकोड मराठी टंकन करणार्‍यांकडून काही मदत मिळाल्यास हवी आहे. प्रत्येकजण आपापल्या उपलब्धतेनुसार यात भाग घेऊ शकतो. मात्र सध्या फक्त पुणे अथवा मुंबईत राहणार्‍या लोकांनाच यात सहभागी करून घेता येईल.

कामाचे स्वरूप साधारण असे असेल ... एक्सेलशीट बनवून त्यात प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती, जिचे साधारण १४ रकाने आहेत, युनिकोड मराठीत टंकणे.

हे काम संपूर्णपणे 'स्वेच्छेने केलेली मदत' अशाच स्वरूपाचे असेल. कोणताही आर्थिक व्यवहार यात घडणार नाही.

या प्रकल्पात कोणाला मदत करण्याची इच्छा असल्यास कृपया बिपिन कार्यकर्ते आणि श्रावण मोडक यांच्याशी मेल / व्यनितून, लवकरात लवकर संपर्क साधावा.

धन्यवाद!

समाजमाहिती

प्रतिक्रिया

खुप ऊत्सुकतेने धागा उघडला, आणी <<मात्र सध्या फक्त पुणे अथवा मुंबईत राहणार्‍या लोकांनाच यात सहभागी करून घेता येईल.>>....
हे वाचल्यावर कळले कि सध्यातरी मला काही करता येणार नाही :-(. तरी काही असल्यास कळवावे.

--टुकुल.

लीलाधर's picture

30 Dec 2011 - 8:57 am | लीलाधर

स्वेच्छेने मदत करण्यासाठी आतुर असलेला चतुर :)

बिपीन कार्यकर्ते यांना व्यनी केलेला आहे तरी मला देखील या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळावी.

आपला,

चतुर चाणक्य

निखिल देशपांडे's picture

30 Dec 2011 - 10:36 am | निखिल देशपांडे

मदत करायला उत्सुक....

परिकथेतील राजकुमार's picture

30 Dec 2011 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार

बरहा मध्ये एक बरहापॅड हा एक प्रोग्रॅम असून त्यामध्ये आपण मराठी व इतर उपलब्ध असलेल्या सर्व भाषांत लेखन करू शकतो. एकदा लिहिलेले पुन्हा संपादित देखील करू शकतो. http://www.baraha.com/ ह्या संस्थळावरुन आपण हि संगणकप्रणाली आपल्या संगणकावर डाउनलोड करून घेऊ शकता. बरहामध्ये टाईप कसे करावे, कुठल्या अक्षरासाठी कुठले की-बोर्ड वरील बटण उपयोगाला येते ह्याची मराठीत अत्यंत सुंदर माहिती आपल्याला तुषार जोशी ह्यांच्या http://marathitlihaa.blogspot.com/ ह्या ब्लॉगवर वाचायला मिळेल. इथे बरहा आपल्या संगणकावर कसे इंस्टॉल करावे ह्याची चित्रांच्या व व्हिडिओच्या साहाय्याने अत्यंत सोप्या मराठी भाषेत दिलेली माहिती अमूल्य आहे.

'बरहा' मराठी बरोबरच देवनागरी, आसामी, कोकणी, सिंधी अशा आणि इतर बर्याच भाषांसाठी उपलब्ध आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, कुठल्याही इमेलचे अकाउंट, ऑर्कुट, फेसबुक ह्यावर आपण बरहाच्या साहाय्याने थेट मराठीत लिहू शकतो.

मी-सौरभ's picture

30 Dec 2011 - 11:43 am | मी-सौरभ

पराशेठ,
तुमचा सकारात्मक प्रतिसद बघून छान वाटल्या गेले आहे... :)

कर्ण's picture

30 Dec 2011 - 1:48 pm | कर्ण

हे इन्स्टाल केल्यानंतर तुम्ही मराठी टंकलेखन कोणत्याही एडिटर मध्ये करू शकता http://www.google.com/ime/transliteration/

स्मिता.'s picture

30 Dec 2011 - 5:13 pm | स्मिता.

रेकॉर्ड्सचे संगणकीकरण करण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्यास उत्सुक आहे. मी पुण्या-मुंबईत नसले तरी थोडे जास्त प्रयत्न करून मदत करायला आवडेल.

मोदक's picture

30 Dec 2011 - 5:10 pm | मोदक

व्यनी केला आहे.. विनासंकोच कळवावे...

मोदक .

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2012 - 10:41 pm | बिपिन कार्यकर्ते

मागच्या वेळी हाती घेतलेले काम पूर्ण झाले आहे. पुढील शाळांचे कागद हाती आले आहेत. यावेळी ते स्कॅन केले आहेत. त्यामुळे जगभरातील लोकांना यात भाग घेता येईल. ज्यांना शक्य आहे / इच्छा आहे त्यांनी कृपया त्वरित संपर्क साधावा.

पैसा's picture

12 Mar 2012 - 10:47 pm | पैसा

उपस्थित.