विमा प्रतिनीध म्हणून काम करण्याची एक वेगळी व नवीन संधी
विमा प्रतिनीधी म्हणून अनेक व्यक्ती चांगले उत्पन्न मिळवत असतात हे सत्य आहे मात्र यात बरेच कष्ट करावे लागतात हि वस्तुस्थिती आहे. बहुतेक वेळा विमा पॉलीसी गळ्यात मारली जाते. तसेच विमा हे काही गुंतवणूकीसाठी फार चांगले उत्पादन मानले जात नाही.
टर्म इंशुरन्स हे जीवन विम्याचे शुध्द उत्पादन आहे मात्र एवढे एकच उत्पादन विकणे हे विमा प्रतिनीधीला पुरेसे उत्पन्न मिळवून देण्यास असमर्थ ठरते कारण याचा हप्ता कमी असतो व दुसरे म्हणजे लोकांमध्ये याची जागरुकता फारच कमी आहे. शिवाय ज्या व्यक्तीना याची माहिती असते त्या हे उत्पादन ऑनलाईन खरेदि करणे जास्त पसंत करतात कारण तसे करणे फायदेशीर असते.
गृप टर्म लाईफ इंशुरन्स व गृप क्रेडिट इंशुरन्स हि उत्पादने प्रामुख्याने सहकारी बँका, पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, बिल्डर, दुध डेअरी इ. संस्थांसाठी आदर्श असतात मात्र हि उत्पादने आजपर्यंत विमा प्रतिनीधीमार्फत विकली जात नव्हती तर ती विमा कंपन्यांच्या विक्रि अधिका-यांपार्फतच विकली जात होती. अशा कामासाठी विमा कंपन्या स्वतंत्र अधिकारी नेमत असतात मात्र असे अधिकारी हे फक्त मोठ्या कॉर्पोरेटस् कडे लक्ष देत असल्यामुळे वरील छोट्या गटाकडे दुर्लक्षच होते व ते या सुवीधेपासून वंचीतच रहातात. हि उत्पादने वर उल्लेख केलेल्या संस्थांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत कारण त्यामुळे त्यांचेकडून ज्या व्यक्तीनी कर्ज घेतलेले असते, ते त्यांचा कर्जाचे कालावधीत मृत्यु झाल्यास या कर्जाची वसुली या विमा संरक्षणातूनच होते, तसेच मृताचे नातेवाईकाला अशा प्रसंगी थोडा दिलासाही मिळतो. ह्या विम्याचा हप्ता हा फारच कमी असतो व संस्था या त्यांचे कर्जदार वा सभासदांकडूनच हा हप्ता वसूल करत असल्याने हा घेण्यात त्यानाही फायदेशिरच असतो.
वर्ष २००९ मध्ये विमा व्यवसायात प्रवेश केलेल्या इंडिया फर्स्ट लाईफ या कंपनीने गृप इंशुरन्सची हि उत्पादने विकण्याची मुभा त्यांचे विमा प्रतीनीधीना दिलेली असल्यामुळे ज्या व्यक्ती वरील संस्थाना हि उत्पादने विकू शकतात त्यांचेसाठी चांगले उत्पन्न मिळवण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून या संधीचा फायदा करुन घेऊ शकतात. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे या संस्था जरी लहान असल्या तरी त्यांचे सभासदांची संख्या हि शेकड्यात किंवा हजारात असते या मुळे होणा-या वार्षीक हप्त्याची रक्कम हि काही लाखातच होत असते व मिळणारे कमिशनही मोठे होते त्यामुळे या संधीचा फायदा पदवीधर तरुणानी अवश्य करुन घ्यावा. हे काम पुर्णवेळ तसेच अर्धवेळही करता येऊ शकते. तसेच ब-याच व्यक्तीना भेटण्याऐवजी मोजक्या संस्थांपर्यत हि माहिती पोहोचवून त्यांची गरज भागवून तुम्हालाही चांगले व नियमीत उत्पन्न मिळवता येऊ शकते. आता पैसे मिळवावयाचे असतील तर श्रम हे करावेच लागतील कारण घरात बसून तर कोणी कोणाला पैसे देत नसतो.
हा लेख लिहून या कंपनीची जाहिरात करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही, मात्र हि संधी नवीनच उपलब्ध झालेली आहे व म्हणून ती मिपा च्या सदस्याना माहित असावी हा आहे, याचा कोणाला फायदा झाला तर आनंदच आहे. कोणाला या बाबत अधीक माहिती हवी असल्यास मला व्यक्तीश: व्यनी करावा, माझ्या सवडीनुसार व कुवतीनुसार मी याकामी माहिती देण्याचा प्रयत्न करिन.
प्रतिक्रिया
30 Dec 2011 - 6:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी.
विमाप्रतिनिधी आला की त्याच्याशी संवाद करायचाही कंटाळा येतो. काही नवीन योजना चांगल्याही असतील पण हे विमाप्रतिनिधी कमिशनापोटी इतकं गळेपडू बोलतात की विचारु नका. खूप वाईट वाटतं गळेपडू लोकांना कटवतांना. कोणाच्या ओळखीने आलेले असले तर विचारुच नका. वर तुम्ही म्हटलं आहेच की ' बहुतेक वेळा विमा पॉलीसी गळ्यात मारली जाते' याच्याशी सहमत आहे.
बाय द वे, एखादी चांगली पॉलिसी असेल आणि हप्ता कमी असेल तर कोणती पॉलिसी सुचवाल ?
-दिलीप बिरुटे