प्रकाश चित्रे

झकासराव's picture
झकासराव in जनातलं, मनातलं
7 Jun 2008 - 9:16 pm

मागचे दोन तीन दिवस झाले पाउस सुरु झाला आहे. अगदीच बदाबदा ओतत नाहिये पण दोन तीन दिवस थोडा थोडा पडला आहे.
त्याआधीचे ५-६ दिवसात एकदा माझं सहज लक्ष आकाशाकडे गेलं आणि मी आनंदीत झालो. कारण रोजच निळ दिसणार आकाश वेगळ्याच निळाईने नटल होत. त्यावर डिजाइन म्हणून की काय वेगवेगळे आकाराचे असे अतिशय शुभ्र पांढरे ढग होते.
चला आता फोटो काढुच अस म्हणत म्हणतच ५-६ दिवस गेलेच. आणि पाउस आलाच. आता ते गेलेले ढग तर परत येणार नव्हते. पण काल पाउस नव्हता म्हणून वर गच्चीवर जावुन पाहिले तर काय परत तोच देखणा निळा रंग घेवुन आणि त्यावर पांढर्‍या शुभ्र ढगांचे डिजाइन घेवुन ढग होते. फक्त आता त्यांन्चा आकार काहिसा पसरलेला होता. असु दे तरी देखील
काढुच परत पुर्ण आकाश काळ्या ढगानी भरउन गेल्यावर कुठुन काढणार म्हणून एक फोटो काढला तो खास मिपाकरांसाठी देतोय. :)

काश मी ४-५ आधीच काढला असता फोटो तर.....

खालील फोटो माझ्या पत्नीने काढला आहे. तो मला चांगला वाटला म्हणून येथे देत आहे.
ह्या झाडाच नाव आहे रेन ट्री (पर्जन्य वृक्ष). हा एप्रिल पासुनच बहरतो.

भूगोलअनुभव

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

7 Jun 2008 - 11:53 pm | भाग्यश्री

मस्त आलेत फोटो! अजुन पण तुझे फोटो दे की इथे..

http://bhagyashreee.blogspot.com/

शितल's picture

8 Jun 2008 - 12:18 am | शितल

झकासराव दोन्ही फोटो मस्त आलेत,
अजुन तुम्ही काढलेले ही फोटो मस्त आहेत ते ही इथे चढवा, भाग्यश्री म्हणते ते बरोबर आहे.