वोडार

ajay wankhede's picture
ajay wankhede in जे न देखे रवी...
25 Dec 2011 - 2:18 pm

मी ओडार,
नाही हो नागरिक या देसाचा
जागा दिसली खुली का ताण डेरा न..
मंग सकाळ पासून दे दनादन घाल घाव
काळ्या ठीक्कार दगडावर...
घामाच्या धारा,छेनि, हातोडी टक.. टक.. टाक
न मंग साकारते मूर्ती देवाची लय भारी ....
झाली संध्याकाळ, चुली पेटल्या,
डेर्यामंदी शेंबड्या, नगडया पोराय्चा किलबिलाट
बयकाय्चि काव काव..
थकलो दमलो कि रीचवतो मंग या देसाची देसी
तरी लेकाचा नाय हो नागरिक या देसाचा
लयी ताप ,,
या देसाची देसी लयी चढते भारी
न मंग लागतो परत कामाले,
रात भर घुसळतो बायकोले....
चेनी हातोडी परीस मोठा ले घाव ...दनादन दनादन
दिवस येतत न जातत दर वरीस वाणी
माही बायको जलमते एका पोराले,
मी बनवतो देवाले पण तो बी लय भारी
दर वरीस घडवते नव्या नव्या मूर्त्यां,
चालत्या बोलत्या......
मंग वाटाले लागते माह्या परीस भारी मोठठा
वोडार हाये तो..
लईच वाढवते भुईचा भार
मंग तो असन काय या हो या देसाचा नागरिक
कोणी सांगण काय हो मले?

मुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

25 Dec 2011 - 5:47 pm | पक पक पक

न मंग लागतो परत कामाले,
रात भर घुसळतो बायकोले....
चेनी हातोडी परीस मोठा ले घाव ...दनादन दनादन
दिवस येतत न जातत दर वरीस वाणी

शिव्..शिव...शिव , अरे हे काय काव्य म्हणायचे कि अश्लिलता प्रसार....

पक पक पक's picture

25 Dec 2011 - 6:04 pm | पक पक पक

या देसाची देसी लयी चढते भारी

पण म्हणुन लगेच 'कविता ?' कशाला केलीत ?,आपली मह्त्वाची कामच उरकायचीत....

काय राव पक पक पक हे तुमचं खरं नाव काय?

पक पक पक's picture

25 Dec 2011 - 10:08 pm | पक पक पक

व्ह्यय सद्ध्या तसच समजा...

ajay wankhede's picture

26 Dec 2011 - 5:53 am | ajay wankhede

ज्या मंडळींना स्वःनामानं जालावर यायची लाज वाट्ते
त्यान्नि शालिनते च्या गप्पा मारु नयेत.
पक पक पक साहेब अशी रेसिपी पच्वायला सशक्त
पाचन शक्ति ची गरज आहे तुम्हाला. असो
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

पक पक पक's picture

26 Dec 2011 - 8:16 am | पक पक पक

व्हय व्हय आज पाटणकर काढा घ्यावा म्हण्तो.. ते देसि वगैरे काय जमत नाय्,उगाच एखादी कविता सुचायची नाय का ?

अत्रुप्त आत्मा's picture

25 Dec 2011 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा

@मंग वाटाले लागते माह्या परीस भारी मोठठा
वोडार हाये तो..
लईच वाढवते भुईचा भार
मंग तो असन काय या हो या देसाचा नागरिक
कोणी सांगण काय हो मले?... एंडिंग लै अवडल बगा अपल्याला....छान कोडं घातलय

प्रिय मित्र अजय,

निशब्द झालो. खूप दिवसानी येणे झाले आणिक तुझे नाव दिसताच काव्य वाचले.
जब्बरदस्तच उंची आहे काव्यास. लिहित रहा.. हेच 'ओरिजिनल' काव्य. वेगळाच विषय. सुंदर लिहिले आहेस.

पुलेशु.
आ.
- निनाव.