काही गमतीदार किस्से .......
आपल्या आयुष्यात अशा काही गमतीदार ,मजेशीर घटना घडतात कि त्या बरयाच काळापर्यंत आठवणीच्या कोपरयात घर करून बसतात .कधी काळी आपण निवांत क्षणी त्या गोष्टी स्मरतो अन अलगद ,नकळत आपले आपल्यालाच हसू येत , भलेही लोकाना वाटेल ह्याच्या /हिच्या डोक्याला शॉट लागला आहे का ? एकटाच / एकटीच का हसत आहे ? तरीही ................
मी शाळेत असतानाचा किस्सा आहे , मी ७-८ वीत असेन !
तेव्हा आमचा डावा हात प्लास्टरात होता कोपर्यापर्यंत ,त्यामुळे आमची सायकल धूळ खात पडणार होती निदान २ महिने तरी !
त्यामुळे आम्हाला शाळेत सोडवण्याची/आणण्याची जबाबदारी बाबांची होती , आमच्या शाळेची वेळही अशी अड- नीड(८ ते २) होती कि त्यावेळेला चुकूनही बस सापडायची नाही ,बाबाना सेकंड शिफ्ट घेण्याशिवाय पर्याय नव्हता , आमचा दिनक्रम व्यवस्थित चालू झालेला , एका हाताला जडबदक प्लास्टर अन अन दुसर्या खांद्याला दप्तर ,पुरती वाट लागून जायची , नुसते हाल जीवाचे !
एकदा आमच्या शाळेत बाहेरचे एक सर आले होते , भरतकाम हा एक नवीन आयटम शिकवण्यासाठी एक तास एक्स्ट्रा घेणार होते ते !
बाबा मला घ्यायला आले , पण आमच्या एक्स्ट्रा तासामुळे त्यांना ड्युटीला उशीर झाला असता ,काय कराव दोघांना सुचत नव्हत. आमची ही चर्चा शेजारी उभे असलेले शेख अंकल ऐकत होते ,ते हि त्यांच्या मुलाला घ्यायला आले होते
तसे ते आमच्या परिचयाचेच होते ,अन घरही फारसे लांब नव्हते एकाच रुटवर होते .
तेच म्हणाले " आप जाओ पियू के पप्पा, मे छोडता इसको ,आप जाओ बिनधास्त ड्युटीको ! "
बस्स .........प्रश्न मिटला पप्पानी प्रस्थान केले .
सरांनी त्यांच्या भरतकामाचे विविध सुंदर नमुने आणलेले होते दाखवायला अन ते करण्यासाठी एक प्रकारची वेगळीच मोठी सुई होती . त्यांनी प्रात्यक्षिकही करून दाखवले त्या सुईने ते इतके भराभर अन सुंदर विणकाम करत होते की बस्स ....ती सुई अन धागे त्यांनी विक्रीकरिता ठेवलेले होते
सुईची किंमत फक्त २ रुपये ,आम्ही फार इम्प्रेस झालो होतो या नवीन प्रकारामुळे !
आम्ही लगेच चिल्लर जमा करून घेऊन टाकली एकदाची सुई ,
सुई पण एकदम अजब पिळे -पिळे असलेली उलट्या नाकाची ,असो ........
झाल... शाळा सुटली .सगळी मेंढर धावली , आम्ही शेख अंकलच्या स्कूटर जवळ येऊन थांबलो
बराच वेळ थांबलो तरी अंकलचा पत्ता नाही ,स्कूटर एकवार निरखून पाहिली नक्की अंकलचीच आहे का म्हणून !
सगळी शाळा सामसूम पडली , शेवटी एकदाचे शेख अंकल दिसले ,त्यांचे दिवटे सुपुत्र
(मोबीन )पळता पळता पडले होते ,गुडघे फोडून घेतले होते त्यावर पट्टी करायला शाळेच्या होस्टेलमध्ये गेले होते ते दोघ !
मोबीन : उम्म्म " पप्पा मे आज आगे बैठून्गा " पिछे दीदी को बैठने दो !
शेख अंकलने स्कूटरला चार पाच किक मारल्या ,मग स्कूटर आडवी केली ,चालू झाली एकदाची टर्र - टूररर्र
करत .
मोबीन पुढे बसला ,आम्ही आमच मणभर ओझ असलेले दफ्तर घेऊन मागे बसलो.
स्कूटर धावू लागली ,अचानक एक गोष्ट लक्षात आली भरतकामाची सुई आपल्या हातातच आहे अजून , बर स्कूटर चालू झाल्यामुळे आता बॅगेत ठेवता येणे हि शक्य नव्हते ,त्यात आमच्या शाळेचा माणिकमोत्यांनी भरलेला रस्ता !
हायवेला लागलो , तसे आमचे केस आमच्याच डोळ्यात जाऊ लागले फडफड फड फड सपके नुसते !
दफ्तर सांभाळू ,केस सांभाळू ,कि मोडलेला हात, कि हातातली सुई ?
या गहन विचारात असतानाच तो आला ............
स्पीड ब्रेकर हो .....
तसे शेख अंकलने बुम्बाट चाललेल्या स्कूटरचे ब्रेक मारले पण काही उपयोय झाला नाही आम्ही मागे अर्धाफुट उंच सहज उडालो असू .
तोंडातून आवाज आला माझ्या आईग ग्ग !
अजून एक आवाज आला माझी साथीला
औच..... ! हुस्स्स ....हुस्स ... हुस्स ..........................
शेख अंकलने स्कूटर स्लो केली , साईडला घेतली , मला उतरायला सांगितले
" तेरे हात मे क्या है विचारायची गरजच नव्हती ,अस्त्र आमच्या हातातच होते .
त्यांनी घाई घाई कावलेल्या जीवाने ते अस्त्र आमच्या हातातून घेऊन त्यांच्या
शर्टाच्या खिशात टाकले .
आमच्या डोक्यात प्रकाश पडला ,स्पीड ब्रेकरमुळे आदळलेल्या अंकलला फुकटचे इंजेक्शन घ्यावं लागल होत
माझ हसू दाबण्याचा मी घर येईपर्यंत पुरेपूर प्रयत्न केला
शेख अंकलने गेटसमोर स्कूटर उभी केली
मी : अंकल चलो न घरमे .पाणी -वाणी ,शरबत ?
त्यांचा तो त्रासिक ,कावलेला चेहरा आईई ग्ग !
अंकल : " नै रेहनो दो फीर कभी ,म्हणत स्कूटरला किक मारली
घरी आले दफ्तर फेकले ,नुसती असबंध हसत होते
आमचे दात काढण काही थांबत नाही हे पाहून आज्जी चक्रावली
" ए बावळे आता हसत राहशील की सांगशील काय झालाय ते.? इतक फिदफिदी का
चालुये मघापासून ?घडलेला प्रकार आईला अन आज्जीला सांगितला ,दोघीही खूप हसल्या ,अन रागावल्या पण
असा निष्काळजीपणा बरा नव्हे म्हणून ;)
***************************************
दुसरा किस्सा...
बाबाना बाहेरगावी जायचं होत
मला सुट्टी म्हणून कोमट तेलाने केसाना मालिश करून निवांत डुंबायाचा प्ल्यान होता माझा !
बाबांचा सकाळपासून आरडाओरडा चालू होता
हे कुठाय ? ते कुठाय ? वस्तू जागच्या जागी का नसतात ?कधीही ,वेळेला सापडतील तर शपथ !
हे त्यांचे नेहमीचे डायलॉग ;)
चार घास तरी बाबांच्या पोटात जावेत म्हणून आईची गडबड चाललेली
म्हणून भराभर पोळ्या लाटत होती
बाबांची घाई चाललेली , निदान चहा तरी द्या ,नाश्त्याचे राहू द्या
आई ऐकेल तर शपथ !
दोन तीन पोळ्या भराभर लाटून घेतल्या पण भाजी शिजायला अवकाश होता म्हणून लसणाची तिखट चटणी वाढली
एक घास खाल्यानंतर बाबा पुन्हा ओरडले “अरे यात तेल घालून मिळेल का मला ? “
नुसती चिडचिड , नुसता आरडा-ओरडा !
आईपण वैतागलेली ,
घाईघाईत आली तेलाची वाटी पालथी केली चटणीत !
( ह .....आता गीळा या अविर्भावात )
बाबांनी एक घास खाल्ला तोंड वेडेवाकडे केले .वाटीचा वास घेऊन बघितला
मी समोरच उभी होते मला काही कळेना काय झाल आता आणखीन ?
बाबांचा पुन्हा गडगडणारा आवाज
" ए हिकडे ये ग जरा ,काय झोपेत काम करतेस का ग ? कोणत तेल हे म्हणे ? "
आईने वाटीकडे बघितले वास घेतला ,अन जीभ चावली
आता कळाले . ........दोन फटके खाण्याचा योग चुकवत आम्ही पोबारा केला तेव्हढ्यात ;)
आईने घाईघाईत चटणीत गोड तेलाएवजी आमचे केसांचे
सुंगंधी तेल घातले होते ;)
( आपले ही काही असेच गमतीदार किस्से असतील तर शेअर करा हो ) :)
प्रतिक्रिया
22 Dec 2011 - 3:29 pm | मन१
मी ७-८ वीत असेन
म्हणजे???!!
साठ सत्तर वर्षापूर्वी ह्या देशात स्कूटर वगैरे वाहने होती ह्याचा हा पुरावा म्हणायचा का काय आज्जे? ;)
आणि तो दुसरा किस्स आई-बाबांच्या नावावर का खपवलाय म्हणे?
तुझ्या पाकृ चाखून पहायला म्हणून कुणीतरी तुला भेटलं होतं तेव्हा त्यानं असच तोंड वेडं वाकडं केल्याचं गुप्त सूत्रांकडून ऐकलय.
22 Dec 2011 - 3:27 pm | चिंतामणी
>>>तेव्हा आमचा डावा हात प्लास्टरात होता कोपर्यापर्यंत
आमचा???????????? म्हणजे कोणाकोणाचा??????
तुझ्याच्याकडे , . ? इत्यादी चिन्हे नाहीत का??
22 Dec 2011 - 3:46 pm | विजुभाऊ
मी ७-८ वीत असेन !
तेव्हा आमचा डावा हात प्लास्टरात होता
आम्ही फार इम्प्रेस झालो होतो
आम्ही आमच मणभर ओझ असलेले दफ्तर घेऊन मागे बसलो.
आम्ही शेख अंकलच्या स्कूटर जवळ येऊन थांबलो
वोक्के हर हायनेस हर एक्सलन्सी आणिक काय ते हर मॅजेस्टी पियुशाराजे
( एक शंका "हर महादेव" चालु शकेल का ? )
22 Dec 2011 - 5:38 pm | सोत्रि
नाही, तो 'हर हर महादेव' असतो ;)
- (हिज हायनेस) सोकाजी
22 Dec 2011 - 3:50 pm | इंटरनेटस्नेही
मस्त गं पियुषा. दोन्ही किस्से आवडले, विशेषतः दुसरा किस्सा म्हणजे हसुन हसुन पुरेवाट झाली! =))
22 Dec 2011 - 3:51 pm | परिकथेतील राजकुमार
.....
22 Dec 2011 - 3:52 pm | गवि
आम्ही स्वतःच या वयात कोण्याएका मित्राच्या घरी गादीत त्याच्या आईने घाईघाईत खुपसून ठेवलेल्या अन विसरलेल्या सुईवर धप्पकन बसलो होतो.. त्यावेळीही आमचे वजन फार कमी नव्हते..
आम्ही अंकलची वेदना समजू शकतो.. आता भविष्यात मिष्टरांच्या मागे क्रोशाच्या अथवा स्वेटरच्या सुया घेऊन बसू नये अशी विनंती..
22 Dec 2011 - 4:32 pm | सुहास..
ही आमची अपघाती त्रेधातिरपीट !
व्हिसित (कॉल सेंटर कंपनीचे नाव आहे.) असतानाची गोष्ट, मी व आमचे मित्र सिध्दार्थ (देवरुखकर नव्हे) साधारण पहाटे चार वाजता चाटिंग/डिसाईड करत होतो, सिड चा वाढदिवस व त्यानंतर सलग दोन दिवस सुट्टी होती, शिफ्ट सकाळी सहा ला संपणार होती. प्रश्न होता, पहाटे सहा-सात ला कुठे पिणार ? मग लक्षात आले की देशी चे दुकान सकाळी उघडते आणि हल्ली देशी च्या दुकानात बियर ही मिळते, मग त्याप्रमाणे अगदी ईस्टॅनडर्ड पोशाखात देशी च्या दुकानात भर पहाटे बर्डे सेलिब्रेशन ला सुरुवात झाली.
दोन बियर पोटात गेल्यावर गाडीला (बाईकला) किक मारली , एक ट्रक आरामात पुढे चाललेला होता, त्याला घाई नव्हती आणी मलाही, गाडी आणि मी दोघे ही तरंगत होतो . अचानक ट्रक वाल्याने कचकन ब्रेक मारला, मी मारेपर्यत माझे कपाळ ट्र्कच्या मागच्या भागावर आणी हॅन्डल खालच्या ढंपर वर आदळले, सिड चे पोपटाच्या चोचेशी साधर्म्य असणारे नाक माझ्या डोक्याच्या मागच्या भागावर आदळले, त्याला तिरमिरी आली. ईकडे मला धडके मुळे कपाळातुन रक्त आले, रक्त पाहुन त्याला चक्कर आली, मी त्याला धरु का गाडी धरु का कपाळ बघु असे करत गाडी उचलायला गेलो तर नुसतेच हॅन्डल हातात आले, मागं हे बेण चक्कर आल्याने माझ्या जवळपास पाठगुळीला बसलेला सरते शेवटी तो पडु नये म्हणुन त्याची एका हाताने गंचाडी धरलेली (ते बेण रेलत-रेलत येत होतं), एका हाताने रुमालाने ते फुटलेले नशीब (कपाळ) धरलेले असा माझा मोर्चा शेजारच्या गलांडे पाटील ईस्पितळात दाखला झाले. लागलय मला आणि पहिले याला अॅडमिट केला, मला दोन टाके पडले. असा तो वाढदिवस गलांडे पाटलांच्या कृपेने साजरा झाला.
ट्र्कने कचकन ब्रेक दाबण्याचे कारण : बसुन रस्ता झाडणारी बाई अचानक ट्र्कच्या पट्ट्यात आली होती, एकुण काय ? रामायण घडते ते ...., महाभारत घडले ते ....., आणि आमची त्रेधातिरपिट झाली ती.......काय ?
पळाच आता
22 Dec 2011 - 4:38 pm | मी-सौरभ
सिद्धार्थ देवरुखकर कोण???
22 Dec 2011 - 4:48 pm | स्पा
सुधांशू देवरुखकर चे ब्रदर असतील
22 Dec 2011 - 7:29 pm | मी-सौरभ
प्लीज कंफम...
22 Dec 2011 - 5:53 pm | इंटरनेटस्नेही
नशीब बचावलात.
अपघाताचे कारण: मद्यपी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ;) ब्रेक लायनर देखील निकामी झाले असण्याची शक्यता. ;)
-
बाकी देशी दारुच्या दुकानात बीयर मिळते ही अत्यंत मोलाची माहिती दिल्याबद्दल, सुहास.. यांचे मनापासुन आभार.
-
इंट्या मल्ल्या.
22 Dec 2011 - 5:59 pm | सुहास..
बाकी देशी दारुच्या दुकानात बीयर मिळते ही अत्यंत मोलाची माहिती दिल्याबद्दल, सुहास.. यांचे मनापासुन आभार. >>
यु वेलकम ! (जणु काही तुला माहीतच नव्हते ;) नाम अब्दुल है मेरा सबकी खबर ......;) )
@ मिका ..धन्यवाद
22 Dec 2011 - 6:16 pm | इंटरनेटस्नेही
लोल्स! =)) मी एकदाच देशी दारुच्या दुकानात पेप्सी आणण्यासाठी गेलो होतो. टु युझ इट अॅज अ मिक्सर. देशीचा आणि माझा एवढाच काय तो संबंध! ;) :P :D
-
(चार बज गये लेकिन पार्टी अभी बाकी है!) इंट्या.
22 Dec 2011 - 6:39 pm | सुहास..
मला मी एकदा देशी दारुच्या दुकानात पेप्सी आणण्यासाठी गेलो होतो. टु युझ इट अॅज अ मिक्सर. देशीचा आणि माझा एवढाच काय तो संबंध! >>
हा ही एक गमतीदार किस्सा आहे खरा ;)
22 Dec 2011 - 6:46 pm | इंटरनेटस्नेही
अरे जाम प्रॉब्लेम झाला होता. दोन 'यो' मित्र गावी आले होते, आणि सोबत माल घेऊनच आले होते. पण त्यांना गावी यायला रात्रीचे २ वाजले आणि माझे नेहमीचे तीर्थस्थळ ग्रीन बर्ड बंद झाले होते. शेवटी देशी बार मध्येच तुमची सोय होऊ शकेल असं गावच्या एका मद्यपानात पीएचडी केलेल्याने सांगितलं आणि लगेच तिथे रवाना झालो. तिथे सोडा, पेप्सी, फ्रुटो लेझ वेफर्स सगळं काही मिळालं! आणि आमची पण गाडी तरंगायची सोय झाली! ;)
22 Dec 2011 - 4:43 pm | सुहास..
सिद्धार्थ देवरुखकर कोण??? >>
आहेत/होते एक मिपाकर (सुधांशु नाही). सध्या अॅक्टिव नसतात .
22 Dec 2011 - 5:23 pm | स्वातीविशु
काय पियुबाई, किती हा धान्दरटपणा...बिचारे ते काका आणि तुमचे पप्पा...
22 Dec 2011 - 5:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मजाच आहे म्हणायची!!
स्वगतः माझ्या मुलीला भरतकाम कधीही शिकवणार नाही, हो तिला शाळेत सोडायला मीच जातो!! :(
@सुहास, धम्माल किस्सा आणि काय ते वर्णन!! लाजवाब!!
22 Dec 2011 - 5:45 pm | सोत्रि
ती वेगात चालणारी स्कूटर भुंगाट चालते पियुतै बुम्बाट नव्हे.
बुम्बाट वर फक्त आणि फक्त 'आमच्या विद्याचा' कॉपीराइट आहे सध्या. त्यामुळे बरचे वाक्य संपादित करण्याचे करावे.
क.लो.अ.ही.वि.
- (विद्याचा कॉपीरायटर) सोकाजी
22 Dec 2011 - 8:12 pm | सुहास झेले
सोकाजी, त्यांनी राईट टू कॉपी, असा अर्थ घेतला असावा ..... ;)
22 Dec 2011 - 7:02 pm | योगी९००
किस्से आवडले..
एक शंका..
एका हाताला जडबदक प्लास्टर अन अन दुसर्या खांद्याला दप्तर ,पुरती वाट लागून जायची , नुसते हाल जीवाचे !
एका हाताला प्लास्टर असेल तर तुम्हाला एवढे जडबदक दप्तर कोण घ्यायला लावायचे...कोणीच मदत केली नाही?
आमच्या कंपनीत घडलेला किस्सा..
जनरली कोणत्याही सहकार्याला आपल्या जागेवर जर बोलवायचे असेल तर आम्ही "can you come to my place for sec?"
असा संदेश पाठवायचो...for sec म्हणजे for seconds (म्हणजे अगदी थोड्यावेळासाठी)....असेच एकदा कंपनीत एकाने वरीलप्रमाणे संदेश एका मुलीला पाठवला..त्याच्या PC ला काही प्रॉब्लेम होता....ती मुलगी जरा घाबरत घाबरतच त्याच्याकडे आली...तिच्याकडून त्याने शंका निरसन करून घेतल्यावर त्याने सहज विचारले की इतकी अस्वस्थ का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर त्या मुलीने एवढेच सांगितले की तुम्ही पाठवलेला मेसेज जरा चेक करा....त्याने आपला पाठवलेला मेसेज चेक केला आणि तो हादरलाच..
computer च्या keyboard वर C आणि X ह्या keys बाजूबाजूलाच असतात...बर्याच वेळेला चुकून बाजूची key सुद्धा दाबली जाऊ शकते. त्यामुळे गडबडीत Type करताना त्याने शेवटच्या शब्दात ही मिश्टेक केली होती आणि त्या वाक्याचा भलताच अर्थ निघाला होता.....
आता तो आणि आम्ही सर्व कोणाला आपल्या डेस्कवर बोलवायचे असेल तर असा मेसेज पाठवतो.."can you come to my place for min?"
22 Dec 2011 - 7:10 pm | मन१
पु ल कृत "माझे पौष्टिक जीवन" आठवले.
babu's marriage fixed with Limaye's daughter ह्याच्या ऐवजी भलताच telegram पाठवला जातो:-
babu's garriage mixed with lemon water.
22 Dec 2011 - 7:10 pm | सुहास..
computer च्या keyboard वर C आणि X ह्या keys बाजूबाजूलाच असतात...बर्याच वेळेला चुकून बाजूची key सुद्धा दाबली जाऊ शकते. त्यामुळे गडबडीत Type करताना त्याने शेवटच्या शब्दात ही मिश्टेक केली होती आणि त्या वाक्याचा भलताच अर्थ निघाला होता..... >>.
=)) =)) =)) =))
लोळतो आहे !
22 Dec 2011 - 7:24 pm | चिंतामणी
=)) =)) =)) =))
22 Dec 2011 - 7:28 pm | इंटरनेटस्नेही
सदर मिस्टेक ही बहुदा सेक्टर 'Sector' हा शब्द टाईप करताना होते! मी एकदा 'चारकोप सेक्टर १' टाईप करताना ही मिस्टेक करुन तो मेल बाबांच्या मित्राला पाठवल्याची आठवण अजुनही अंगावर शहारे आणते!
22 Dec 2011 - 7:14 pm | प्रभाकर पेठकर
पियुशा, दोन्ही किस्से धमाल आहेत.
माझेही काही किस्से.
लहानपणी एकदा चोरून मध खायच्या प्रयत्नात मध समजून चमचाभर गोंद खाल्ला होता. (फडताळात दोन्ही बाटल्या शेजारी शेजारी होत्या). लगेच लोच्या लक्षात आल्यामुळे भरपूर पाणी प्यायलो (गोंद पाण्यात विरघळतो एवढे बालज्ञान होते). तरी दोन दिवस मनात बद्धकोष्ठाची भिती होती.
मोठेपणी एकदा, कोथींबीर-पुदिन्याची चटणी समजून डोक्याला लावायची मेहेंदी पावाला लावली. लगेच मेहेंदीचा घमघमाट सुटल्याने वाचलो. नाहीतर पोटात काय काय रंगले असते तो इश्वर जाणो. फ्रिज मध्ये पुदिन्याच्या चटणी शेजारी मेहेंदीची वाटी ठेवली होती आमच्या सौं.नी. त्यानंतर, ' ही मेहेंदीची वाटी फ्रिज मध्ये ठेवतात का?' ह्यावर 'पण तुम्हाला नीट पाहता येत नाही?' असा एक छोटासा अपयशी परिसंवाद झाला.
दोनशे रुपयाची विदेशी दारू फक्त ८० रुपयात मिळाली (रस्त्यात एकाने अगदी पैशाची गरज आहे म्हणून विकतो आहे असे सांगितले) म्हणून आमच्या मित्राने एक व्हिस्की आणली होती. सर्वांनी इतर जमवाजमव (सोडा, चखना इ.) केली आणि त्या मित्राचे कौतुक करीत 'बैठक' सुरू झाली. पहिल्याच घोटात ती व्हिस्की नसून निव्वळ 'रंगीत पाणी' आहे हे लक्षात आले. मित्राचा (आणि आमचाही) पोपट झाला. जाम हसलो. निदान चखना 'असली' होता. त्यावरच पार्टी(?) झाली.
बरेच किस्से आहेत. आठवतील तसे टाकीनच.
22 Dec 2011 - 7:33 pm | इंटरनेटस्नेही
आवरा! हसुन हसुन मेलो साला!
22 Dec 2011 - 7:59 pm | दादा कोंडके
धाग्यातली आणि प्रतिसादातलेही किस्से छानच.
साधारण पाच वर्षापुर्वीचा उत्पादन विभागातला किस्सा आहे. आमच्या कंपनीचं उत्पादन भारत, चीन वगैरे देशात चालतं. माझ्या एका सहकार्यानं इओएल (एंड ऑफ लाईन) टेस्ट जिग साठी एक स्क्रिप्ट लिहिली होती. ती प्रणाली भारत, चीन आणि बाझील मध्ये वापरली जाते.
एके दिवशी संध्याकाळी अचानक चीन मधून एका प्रॉडक्षन इंचार्जचा फोन आला आणि त्यानी अर्धवट ईंग्रजी मध्ये सांगितलं की एका अॅसेंब्ली लाईनवर पीडीआय (प्री-डिस्पॅच ईंन्पेक्शन) फेल जातय. तीच प्रणाली आमच्याकडे सुरळीत चालू होती. समस्या गंभीर होती कारण अॅसेंब्ली लाईन एक तास जरी थांबली तरी कंपनीचं कोट्यावधीचं लुस्कान होतं. त्या माणसाला थोडसं विचारायचा प्रयत्न केल्यावर कळलं की त्याला ईंग्रजीचा अजिबात गंध नव्हता आणि तिथे त्यावेळी असलेल्या लोकांमध्ये हाच सर्वात "हुशार" होता. डिफे़क्ट नक्की काय आहे हे बघण्यासाठी अम्हाला लॉग फाईल हवी होती आणि तो म्हणत होता, "आमाला पावर न्हाय".
पुढच्या आर्ध्या तासात आम्हाला इतर कोनालाही न कळूदेता एक गोष्ट करायची होती,
१. खरोखरच प्रॉडक्ट डिफेक्ट असेल तर ताबडतोब उत्पादन थांबवायला सांगायचं. किंवा
२. टेस्टमधला बग असेल तर "कंन्सेशन" द्यायचं.
आर्धा तासच. कारण त्यांना जास्तीत-जास्त अर्धा तास थांबण्याची मुभा असते. नंतर प्रत्येक मिनिटाला "ग्राहक कंपनीला पैसे द्यावे लागतात" आणि आमचं नुस्कान होणार ते वेगळच.
चेन्नईला एक आमच्यासारखंच डिविजन आहे तिथेही फोन करून झाले. थोड्यावेळ विचार केल्यावर आम्ही "गट-फिलींग"वर ठरवलं की कन्सेशन द्यायचं. तेव्ह्ड्यात त्याचा फोन आला परत. "फोन, युगांडा" असं काहीतरी म्हणाला तो आणि फोन ठेउन दिला. आम्ही इथं बुचकळ्यात. च्यायला हा इश्यु युगांडा पर्यंत कसा काय गेला म्हणून. ईंट्रानेटवर पटकन जाउन बघितलं की युगांडामध्ये कंपनीचं नक्की कोणता विभाग आहे ते. पण काहिच पत्ता लागेना.
नंतर पंधरा-वीस मिनिटानी समजलं की चेन्नईमधून आधिच एका सहकार्यानं फोन करून "कंन्सेशन" दिलं होतं आणि त्याचं नाव योगानंद होतं! :)
22 Dec 2011 - 8:52 pm | गणेशा
भारीच किस्से सर्वांचे .. हसुन हसुन वाट..
विशेषता : for a sec आणि युगांडा जबर्याच..
23 Dec 2011 - 1:21 pm | नरेश_
असेल दहा - बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या काकांना त्यांच्या स्नेह्यांना काही कारणास्तव भेटायचे होते.
मीही सोबतीला होतोच. पोहोचलो एकदाचे त्यांच्या घरी. घरात पाऊल टाकताक्षणी अप्रिय वासाने (सांगायला पाहिजेच का ;)
) जीव कासावीस झाला. (काका मला वाचवा, असे जोरात ओरडावेसे वाटले) काकांनाही तसेच वाटले असावे बहुधा.
'शी: काय घाण वास येतोय साला' असं आम्ही एकमेकांशी पुटपुटत असतानाच काकू अवतरल्या.
" येतोय ना वास अजून !? अहो येणारच. आज दुपारीच आमच्याकडे पावभाजी केली होती ! "
;) ;) ;) ;) ;) ;)
नंतर कळले की काकूंना ऐकू कमी येत होतं.
/
/
/
/
/
/
काकूंनी आमची 'ऊठबस' करण्याआधी आम्ही तिथून सटकलो ;)
23 Dec 2011 - 3:35 pm | चिगो
लहानपणीचे लै आहेत.. आजचाच एक आहे. इलेक्टोरल रोल मधून नाव काढून टाकण्यासाठी "फॉर्म ७" असतो. ह्यात एका बुथ लेव्हल ऑफिसरने " नाव रद्द करण्याचे कारण" ह्या रकान्यात " He was Death on the 2010 years" आणि तत्सम लिहीलंय..
मी अजूनही त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय.. ;-)
23 Dec 2011 - 5:54 pm | हरिकथा
पियुशा,
तुमच्या शेख अंकलच्या आणि बाबांच्या दु:खात सहभागी आहे.
बाकी, प्रतिसादादरम्यान इतरांनी सांगितलेले किस्सेही छान विनोदी आहेत.
मजा आली वाचताना....
23 Dec 2011 - 7:14 pm | पैसा
पियुषाचे आणी सगळ्यांचेच किस्से भारी आहेत. मुद्दाम हा धागा ठेवून दिला होता सावकाश वाचायला. मजा आली!
23 Dec 2011 - 7:53 pm | भाग्यश्री कुलकर्णी
एकदा मी बेसनपीठ आणी मक्याचे पिठ एकाच डब्यात ठेवले होते.नवरा घरी आल्यावर नेहमीप्रमाणे म्हणजे मला पिठले चांगले करता येत नाही असा त्याचा समज असल्याने पिठले करु लागला.आणी जेवताना मात्र सारखे "हे असं काय लागतंय!"म्हणत होता.अन मी मात्र आरामात खात होते. त्याने बरेचदा हे असे काय लागतंय? असे विचारल्यावर मग माझ्या लक्षात आले की(बघा इथेही ट्युबलाईट!) त्याने डाळीच्या पिठाऐवजी मक्याचे पिठ वापरले होते पिठले करायला.(मला मात्र जेवताना काहीही कळले नाही हा अजुन एक मोठा जोक!यावर त्याची कमेंट गा.गु.च.का. ही होती.)
24 Dec 2011 - 9:16 am | सुहास..
हा आमच्या मित्रामुळे (आमचा कलिजा खल्लास होण्याचा ) एक जुना किस्सा !! (चेपुवर टाकला होता आधी )
आमचा एक मित्र, साधारण एक महिन्यापासुन आम्हाला एक-दोन चिठ्ठ्या दाखवायचा , आणि सांगायचा की त्याची प्रेयसी खुप सुंदर आहे , खरच ! अक्षर प्रचंड सुंदर होते , हा सारखे-सारखे " मेरे खयालों की मलिका-जोश ' च्या गाण्यात दंग.,...अक्षरश वीट आणला , मग पोरांनी त्याला चढविला म्हणे साल्या एकदा दाखव तरी ..मी ही त्यात लाच एक ..हे साहेब म्हणे " बॉस कलेजा थामकर चलना , खल्लास हो जायेगा देखते ही !
दुसर्या दिवशी आमच्या इथल्या पाचव्या गल्लीत आमची दिंडी गेली , तिच्या घराबाहेर थांबलो तिची एक झलक बघायला ..ती आली .अंगात मळवटलेला गाउन ! हातात गळका डब्बा ! तोंडातुन अक्षरशः बाहेर पडेल अशी मिश्री लावलेली आणि त्यात तिने ह्याला पाहुन दिलेली टुथपेस्ट च्या जाहीराती सारखी स्माईल =))
खरच कलेजा खल्लास झाला !!
24 Dec 2011 - 11:45 am | सूर्यपुत्र
तुम्ही येथे आहात:स्वगृह » काही गमतीदार किस्से .......काही गमतीदार किस्से .......
प्रेषक पियुशा गुरुवार, 22/12/2011 - 15:09
लेखकाचे प्रोफाईल | सर्व लेखन | खरडवही | संदेश पाठवा.
.मौजमजाप्रतिक्रिया
;)
-सूर्यपुत्र.