सगळेच निर्णय आता दैवाच्या हवाली करणे चालले होते. मनाची घालमेल संपता संपत नव्हती. त्यात रोज एक वाईट बातमी कानावर पडत होती. रोज कुणीतरी देवघराच्या वाटेवरचा वाटसरू बनत होते. ना त्यांचे वय झाले होते, ना आजारपण त्यांच्या आसपासही पूर्वी फिरकले होते; तरीदेखील ह्या घटना घडत होत्या. त्यांच्या आप्तेष्टांचे काय हाल होत असतील, हा विचार करून मेंदूचा भूगा होत होता. शेवटी स्वतःच मनाला समजावून दैनंदिन कामे उरकली जात होती.
शिवाय माझ्या आयुष्यात अनपेक्षित घडामोडी घडणार होत्या. त्याची चाहूल खूप तीव्रतेने व्हायला लागली होती. माझा मात्र खूपच वेगळ्या पातळीवर विचार चालू होता. मी स्वतःच माझ्या आयुष्याची दिशा बदलणे, हा माझ्यासाठी एक फार मोठा आणि फार कठीण निर्णय होणार होता.
"कर्तुत्व कि कुटुंब" या फार सामान्य पण तेवढ्याच निर्णायक पेचात मी अडकले होते. एक मन सांगत होते कि कुटुंब नेहमीच तुझ्यासोबत असणार आहे. मग तुझ्या कर्तुत्वासाठी थोडे दिवस त्यांनी हाल अपेष्टात काढले तर कुठे बिघडते. पुन्हा पुन्हा तुला हि संधी मिळणार नाही. संधी म्हण किंवा दैव, नेहमी एकदाच दार ठोठावते. ते जर तुम्हाला नाही कळले तर आयुष्य आहे तिथेच राहते. शिवाय होणारा मनःस्ताप सतत तुमचा पिच्छा पुरवत राहतो. आणि दुसरे मन म्हणत होते, असेल नशिबात तर पुन्हा संधी मिळेल. पुन्हा तुला तुझे कर्तुत्व दाखवता येईल, पण जर कुटुंब दुरावले तर तुझ्या कौतुकासाठी तरी, तुझे असे तुझ्याजवळ कुणी असेल का ? तुझी गगनभरारी पाहून तुझी पाठ थोपटेल का ? का विषाची परीक्षा घ्यायचा विचार करत आहेस ? विषच शेवटी ते .. अंगात भिनल्याशिवाय, जीव घेतल्याशिवाय थोडीच राहणार आहे ?
प्रतिक्रिया
19 Dec 2011 - 4:15 pm | पियुशा
थोड अजुन लिहायला हव होत , फारच छोटेखानी वाट्त :)
सन्दर्भ लागला नाही अजिबात
19 Dec 2011 - 7:28 pm | पक पक पक
संदर्भ लावता लावता जिवाची लय तगमग झाली............
19 Dec 2011 - 4:34 pm | मराठी_माणूस
पहील्या परीच्छेदाचा शेवटच्या परीच्छेदाशी काय संबंध आहे ?
19 Dec 2011 - 4:34 pm | गणपा
बहुतेक 'टु बी ऑर नॉट टु बी' या दंद्वामध्ये लेखिकेच मन हेलकावे खातय.
पहिल्या परिच्छेदाच प्रयोजन समजलं नाही.
19 Dec 2011 - 4:34 pm | शाहिर
कविता लिहिताना ठीक आहे..पण लेख थोडा डीटेल मध्ये लिहित जावा..
काहिही संदर्भ लागला नाही ..
स्वत एक त्रयस्थ वाचक म्हणून कोर्या पाटीने वाचुन बघा..
19 Dec 2011 - 4:44 pm | मनीषा
काही गाळलेल्या जागा भरल्या तर सुसंगती लागेल असे वाटते .
कदाचित पहिल्या आणि शेवटच्या परिच्छेदाचा संबध पुढील भागात स्पष्ट होईल असे वाटते.
तुमच्या लेखनातून घालमेल चांगली व्यक्त झाली आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा !
19 Dec 2011 - 9:49 pm | देविदस्खोत
आपल्या " घालमेल " भाग २ ची वाट बघतोय...!!!!