आता ठरवलय
की वेडं व्हायचं नाही,
पण तरीही येतो एक झटका
जस जशी संध्याकाळ होत जाते,
निष्पर्ण वृक्षाखाली बसलेला
वेचत असतो वाळलेल
पान अन् पान,
सोबतीला असतात घुबडे, वटवाघळे,
करत असतात सोबत
अमावस्येच्या रात्री
पौणिमेच्या चंद्रासोबत
चांदण्याच्या साक्षीने,
आणि लिहीत असतो
त्या वाळलेल्या पानांवर
नक्षत्रांचे देणे,
सोबतीला असते सावली
उगवत्या सुर्याची वाट पाहात.....
बेहेरे मकरंद
११०२२१७१
प्रतिक्रिया
17 Dec 2011 - 10:12 am | प्रचेतस
आमचा एक प्रयत्न