२०१३च्या अंबेजोगाई येथे होनार्या अंजोजिदेदाविसं (अंबेजोगाई जिल्हा देशी दारु विक्रेता संघ) अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ -२०१४ या शैषणिक, स्वारी, शिक्शनिक, दिल्या मायघाल्या ह्ये ली रे येवडं... शैक्शणिक, हां.. वर्षात अंबेजोगाई जिल्ह्यातील कोणत्याही देशी दारुच्या दुकानात आपल्या आवडीच्या ब्रॅन्डची दररोज एक क्वाट्टर (याला काही लोक चुकीने 'क्वार्टर' असेही म्हणतात) विनामूल्य दिली जाईल. तसेच नंतरने सदर विजेत्या स्पर्धकाचे अंबेजोगाई जिल्ह्यातील प्रचंड खपाच्या लोकप्रिय तरुननेते (अंबेजोगाई जिल्ह्याचा गरजता छावा, 'डरकाळी' पुस्कराचा विजेता) दीपकाण्णा वंजाळे पाटील भोसले संपादित 'आसूड' या वर्तमानपत्रातील 'पुन्यस्मरण' या सदरात छायाचित्र प्रकाशित केले जाईल. ही स्पर्धा २१ वर्षांवरील सर्व मराठी/ अमराठी व्यभि.. ये येड्या, कायबी ल्हितो का? आं? काडू का तुजं आडिट? परमिटधारी व्यक्तींसाठी खुली आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक आणि इच्छुक असलेल्यांनी आपापला ह्यांगओव्हर उतरल्यावर आपले घोषवाक्य आणि/ अथवा प्रतीकचिन्ह, ३१ डिसेंबर २०११ पर्यंत मा. बुद्धभूषण वंजारी कडूपाटील , मा. सचिव, धम्मक्रांती युवा ग्रूप ( डिजिटल फ्लेक्स, डीजे व डॉल्बी स्पेशालिस्ट, संस्थापक 'ढिकच्यांग' संघटना, अंबेजोगाई) यांना rada@radamail.com या इमेलवर पाठवावे. रात्री धाच्या आत पाटवा. आपुन थर्टीफस्टला टुंग आस्तो. फेब्रुवारी २९, २०१२ ला विजेत्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले जाईल.
या दोन पुर्नपने वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. एका व्यक्तीला दोन्हीतही भाग घेता येईल.
या स्पर्धेचे नियम असे आहेत:
१. सुचविलेले घोषवाक्य/ प्रतीकचिन्ह 'खळ्ळ-खटाक उर्फ बघतोस काय, मुजरा कर!' या विषयाशी संबंधित असावे. नस्ल्यास स्प्र्दकाकडे बगून घेन्यात येईल.
२. विजेत्या घोषवाक्यास व प्रतीकचिन्हास प्रत्येकी एक 'नाद खुळा केसर उंड्रीकर उल्लाला फेम नाईट' च्या कार्यक्रमाचे तिकीट विनामूल्य दिले जाईल. दादांचं सामान हाये, नुस्तं बगायचं, सांगून ठ्येवतो. हां!
३. एकाच प्रकारच्या, एक सारख्या २ अथवा अधिक आलेल्या सुचनांचा "lottery" स्वरूपाने निर्णय होईल. या लॉटरीचे सर्व अधिकार मा. संग्रामसिंहदादा नेवरेपाटील ('डॉन'), 'भगवी ज्योत' क्रांतिकारी ग्रूप, नवी वसाहत, अंबेजोगाई यांच्या स्वाधीन राहातील.
४. अंतिम निर्णय कार्यकारी अंजोजिदेदाविसं घेईल. या निर्णयावर कोणतीही चर्चा होणार नाही. या निर्णयावर आबजेक्षण असणार्यांचा भगवीज्योत पद्धतीने समाचार घेन्यात येईल.
५. सादर केलेली प्रवेशिका ही पुर्नपने स्वतःची असावी व कुठल्याही व्यक्तिगत अथवा उद्योगाच्या प्रताधिकाराचे उल्लंघन केलेले नसावे. तसे केलेले असल्यास आनि त्यातून कोन्तेही कोर्ट म्याटर झाल्यास पार्टीला ज्याने त्याने नडावे. आसल्या शिंपल म्याटरसाठी दादांना हेडेक देऊ नये.
६. एका स्पर्धकाला, एका स्पर्धेसाठी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवता येतील. तीन म्हनजे एक आनि एक आनि एक. हे न कळल्यास संघाच्या कार्यालयाशी संद्याकाळी साहाच्या आत समप्र्क, समपरक...मायला ह्याज्या, संपर्क, आश्शी!.. साधावा.
७. एकदा प्रवेशिका पाठवल्यावर, निकाल जाहीर होईपर्यंत स्पर्धकाने आपली प्रवेशिका कुठल्याही माध्यमात प्रसिद्ध करू नये. तसे केल्यास त्याचा भगवीज्योत पद्धतीने समाचार घेन्यात येईल.
८. विजेत्या घोषवाक्याचे आणि प्रतीकचिन्हाचे सर्व मालकीहक्क अंजोजिदेदाविसं राहतील. ह्याबात कोनताही वाद घालू नये. वाद घातल्यास त्याचा भगवीज्योत पद्धतीने समाचार घेन्यात येईल.
काही कारणास्तव या तारखेत बदल झाल्यास आमचे आमी बगून घ्यु .
--------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी येथे पाहावे - जय महाराष्ट्र, जय भीम, जय अंबेजोगाई, जय अंजोजिदेदाविसं , दीपकाण्णा वंजाळे पाटील भोसले झिंदाबाद!
प्रतिक्रिया
17 Dec 2011 - 7:38 am | जोशी 'ले'
हा हा... हि घ्या माझी प्रवेशिका
जया अंगे अट्टटलपण तया विदेशी कठिन
17 Dec 2011 - 10:20 am | प्यारे१
खतरा!
ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली हाय नव्हं? का फकस्त आंबेजोगाई जिल्ला?
>>>> 'पुन्यस्मरण' या सदरात छायाचित्र प्रकाशित केले जाईल.
>>>>तसे केलेले असल्यास आनि त्यातून कोन्तेही कोर्ट म्याटर झाल्यास पार्टीला ज्याने त्याने नडावे. आसल्या शिंपल म्याटरसाठी दादांना हेडेक देऊ नये.
>>>>तीन म्हनजे एक आनि एक आनि एक. हे न कळल्यास संघाच्या कार्यालयाशी संद्याकाळी साहाच्या आत समप्र्क, समपरक...मायला ह्याज्या, संपर्क, आश्शी!.. साधावा.
खपलेलो आहे.
17 Dec 2011 - 10:35 am | आत्मशून्य
.
17 Dec 2011 - 10:46 am | अन्या दातार
विडंबनाची साथ जे न देखे.. मधून काथ्याकुटातही पसरली आहे तर. काल-परवापासून नुसती विडंबनेच विडंबने दिसतायत.
17 Dec 2011 - 10:47 am | मराठी_माणूस
जबरदस्त. हसुन हसुन पोटदुखले. तुमची प्रतिभा अफाट आहे.
17 Dec 2011 - 11:02 am | मितभाषी
हाहाहा =
=)) रावसाहेब एकदम ढांगचिक. :D
17 Dec 2011 - 11:12 am | ५० फक्त
जबरा, ऑममवेस.
नमस्कार स्विकारा.
17 Dec 2011 - 11:45 am | बिपिन कार्यकर्ते
खळ्ळ खट्याक एकदम! :)
17 Dec 2011 - 12:11 pm | मन१
:)
17 Dec 2011 - 12:41 pm | सुहास झेले
लईच :) :)
17 Dec 2011 - 12:58 pm | किसन शिंदे
एकदम कडक लिहलंय. =)) =))
17 Dec 2011 - 1:23 pm | दादा कोंडके
एकदम खरतनाक!
17 Dec 2011 - 1:27 pm | अभिजीत राजवाडे
जबरी,
17 Dec 2011 - 1:40 pm | अविनाशकुलकर्णी
तुमची प्रतिभा व निरिक्षण अफाट आहे....
मस्त भट्टी जमली आहे..
उल्लाला करीत लाईफ झिंगालाला झाले....
जय उर्ध्वगामी महाराष्ट्र..
17 Dec 2011 - 2:04 pm | विसुनाना
वेगळे विडंबन.
(पण या लेखकाने ते नसते केले तरी चालले असते असे वाटून गेले.
म्हणजे आता या विषयावर बोलण्यासारखे काही उरले आहे का? -असे वाटून गेले.
सद्य समाजात जे काही चालले आहे तेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असून आपल्याला त्याबद्दल जे वाटते ते आपल्या जुनाटपणाचे, कोतेपणाचे द्योतक आहे- असे हल्ली वाटून घ्यावेसे वाटू लागले आहे. )
17 Dec 2011 - 3:02 pm | श्रावण मोडक
विसुनानांशी तत्वतः सहमत, पण शेवटी धागा मौजमजेसाठीचा आहे.
सन्जोप रावही मौजमजा करतात हे काय कमी आहे का! ;)
17 Dec 2011 - 4:11 pm | गणपा
+१
२ श्रामो.
:)
17 Dec 2011 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार
आपल्याला तर जाम मजा आली बॉ ! साला ते वरण भात लिंबू वाचून वाचून डोल्याची पार आय माय झाल्ती. यकदम 'बुम्बाट' लिहिलेल हाय हे समदा. __/\__
लै लै दिसानी आमचे सन्जोप'दादा' फार्मात आलेले हायेत. तवा कुणीबी नडानडी करायची नाय !
परादास आठवले
संस्थापक अध्यक्ष
दुर्लक्षित पँथर
मिसळपाव शाखा
17 Dec 2011 - 3:12 pm | दिपक
=)) =))
खत्री लिवलयं..
17 Dec 2011 - 3:49 pm | पैसा
भट्टी मस्त जमलीय.
17 Dec 2011 - 4:02 pm | आशु जोग
या लेखनात वापरलेल्या भाषेला आमचा आक्षेप आहे. नाही आम्हाला झेपत.
'देऊळ' 'वळू' पाहाणार्यांची कॅटेगरी आमची. जरा विचार करा !
17 Dec 2011 - 4:06 pm | यकु
एक दुर्लक्षित गाव म्हणून अंबाजोगाईचं नाव घेतलं असेल तर तो प्रयत्न साफ फसला आहे.
बाकी पुण्यात रहाणार्यांच्या दृष्टीने अलम् जगातील सगळी गावे अस्तित्वातच नसतात हेवेसांनल..
मराठवाड्यातलं एकेकाळी शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं गाव अंबाजोगाई आहे.
विवेकसिंधू लिहिणारा मराठीतला आद्यकवी मुकुंदराज ह्याच गावचा हे सर्वांना ठावं असेलच.
17 Dec 2011 - 4:19 pm | प्रीत-मोहर
=)) =))
17 Dec 2011 - 4:27 pm | जाई.
हा हा हा
मस्त
17 Dec 2011 - 5:57 pm | तिमा
आवं, येका वेळी किती जनांच आडिट करताय ? आँ ?
आम्चं 'आज रोख, उद्या ढोस' हे स्पर्धेसाठीच घोष वाक्य ! काय?
आनि त्ये प्रतीक चिन्ह का काय त्ये बक्षिस मिलाल्यावर पाठवू म्हनावं, काय?
आता गुमान आमालाच विजयी झाईर करा न्हाईतर तुम्चा पन भगवी ज्योत पधती नं सत्कार करु, काय?
- तिरझिंगराव मायझवणे
17 Dec 2011 - 6:48 pm | देविदस्खोत
*** लई भारी साहेब !!!!! ****** आपणांस ""मुजरा "" करतो.!!!! स्विकार करावा !!!!!!!
17 Dec 2011 - 7:15 pm | सोत्रि
लैच भारी!
- ('क्वाट्टर'प्रेमी ) सोकाजी
17 Dec 2011 - 8:19 pm | पार्टनर
बघता काय, टुंग व्हा !
आम्च्या येंट्रीला पयला नंबर नाय भ्येटला तर आम्च्या वळखिच्या सरदाराला कळावन्यात येईल.
निघ्तो आता.
- (बुंग) पार्टनर
17 Dec 2011 - 11:22 pm | पक पक पक
या निर्णयावर आबजेक्षण असणार्यांचा भगवीज्योत पद्धतीने समाचार घेन्यात येईल.
खतरनाक.........न पिताच लोळ्लो ,हसुन हसुन लिव्हर सुजलि ............
18 Dec 2011 - 9:36 pm | llपुण्याचे पेशवेll
विडंबन बरे होते. भगव्याबद्द्लची मळमळ जाणवली. असो.
18 Dec 2011 - 11:29 pm | आशु जोग
ही तुमची संघी प्रतिक्रिया काय वो
19 Dec 2011 - 9:12 am | llपुण्याचे पेशवेll
मग काय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जांघी प्रतिक्रिया हवी होती काय? जे ठळकपणे दिसले ते लिहीले. असो.
19 Dec 2011 - 7:03 pm | पिलीयन रायडर
बाकी सगळे ठिक आहे..
पण "अंबेजोगाई" च का?????
हे बघा.. ते माझं गाव आहे.. आणि उगं कारण नसताना खोडी काढायची गरज नाही..
ह्या गावाच नाव वापरणं तुम्हाला "विनोदी" वाटतं का???
19 Dec 2011 - 7:34 pm | पक पक पक
..आणि उगं कारण नसताना खोडी काढायची गरज नाही..
दादा रागिवल वाट्त !!!!!
19 Dec 2011 - 8:06 pm | पिलीयन रायडर
तुमच्याशी कोणी बोलतय का???
उगं मध्ये मध्ये कडमडु नका...
20 Dec 2011 - 10:21 pm | पक पक पक
दादांनी लाव्लि वाट्त !!!
20 Dec 2011 - 9:35 am | मराठी_माणूस
मागासलेले ग्रामिण असे काही दाखवायचे असेल तर बर्याचदा मराठवाड्यातील गावांचा उल्लेख केला जातो , म्हणून असेल कदाचीत
20 Dec 2011 - 12:26 pm | विटेकर
... कोणाच्या अस्मितेला दुखाऊ नये !
जय भीम .. अंबेजोगाई .. भगव्या पद्धतीने समाचार.. बुद्धभूषण हे उल्लेख निश्चित टाळता आले असते, लेखकाची कल्पना शक्ती पर्यायी शब्द शोधण्याइतकी निश्चित प्रगल्भ आहे.
अशा विडंबनाला सवंग प्रसिद्धी मिळते पण आपल्या सभ्यतेची पातळी खालावते ... !
अस्तु ... अधिक गुणपूर्ण लेखनाची अपेक्षा ( कदाचित लोकप्रिय नसेल ही ... लोकांना काय हो वस्त्रहरण होत असताना देखिल दांत काढतील... ) !
संजोपराव .. व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी?
20 Dec 2011 - 1:35 pm | श्रावण मोडक
आंबाजोगाईवरून इतका खल? रिकामटेकडे धंदे. आंबाजोगाईच्या जागी मी कराड वाचलं तरी तोच आनंद, निफाड वाचलं तरी तोच, बारामती वाचलं तरी तोच, परळी वाचलं तरी तोच आनंद मिळतो...
अर्थात, हे माझं माझंच आकलन, समज वगैरे...
पुण्यासाठीचं वेगळं विडंबन करता येऊ शकतं.
21 Dec 2011 - 5:58 pm | किशोरअहिरे
यशवंत एकनाथ व पिलीयन रायडर यांच्याशी सहमत..
आजुन तरी अंबाजोगाई जिल्हा डिक्लेर व्हायच्या प्रतिक्षेत आहे..
मागच्या १५ वर्षांपासुन वाट बघत आहे..
अवांतर :
जिल्हा निर्मिती साठी झालेली दंगल आजुनही डोळ्या समोर आहे..
अंबाजोगाईच्या ईतिहासात पहिल्यांदाच कर्फ्यु लावला गेला होता..
२६ जाने. २०१२ ला करणार आहेत जिल्हा असे ऐकुन आहे :)
हे पण फक्त लातुर/ नांदेड ला आयुक्तालय व्हावे म्हणून यात विलासराव आणी अशोक चव्हान यांची पण राजकीय खेळी आहे असे ऐकुन आहे..