पुन्हा एकदा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
16 Dec 2011 - 10:46 am

दुलई धुक्याची अंगावर दंव
निळी ओढणी गूढ नभावर
कौलांवरती वलये धुराची
ऊब पांघरुन जो तो भूवर

झिरमिळ पालव रेशिम इरकल
चित्र नव्हाळे लज्जित कणभर
गोत जिव्हाळा हा सृजनाचा
मकर क्रांतिचा वारू मनभर

चाहुल वा ही हूल म्हाणावी
येते जाते तुडवित अंतर
पाचोळा उधळित स्वप्नांचा
पुन्हा एकदा झुलते अंबर

....................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Dec 2011 - 11:26 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आता तुमच्या कवितेवर प्रतिसाद द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत.

चाहुल वा ही हूल म्हाणावी
येते जाते तुडवित अंतर
पाचोळा उधळित स्वप्नांचा
पुन्हा एकदा झुलते अंबर

सुन्न!!!

क्रान्ति's picture

16 Dec 2011 - 12:42 pm | क्रान्ति

सुंदर रचना!

इन्दुसुता's picture

16 Dec 2011 - 8:01 pm | इन्दुसुता

पुन्हा एकदा उत्कृष्ट रचना....

मयुरपिंपळे's picture

16 Dec 2011 - 10:46 pm | मयुरपिंपळे

सही रे सही