ऐल-पैल

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
15 Dec 2011 - 7:45 pm

ऐल मळा पैल तळे
जायचे कुठे ना कळे
टाकता पाऊल वळे
पुन्हा माघारी

ऐल दिवा पैल वात
भेट नाही आयुष्यात
मिट्ट काळोख घरात
अवस दारी

ऐल गंध पैल जाई
मधे गूढ खोल खाई
आक्रोश घुमत जाई
कडेकपारी

ऐल चंद्र पैल निशा
घेरतात सुन्न दिशा
घुमतात वेड्यापिशा
स्वप्नांच्या घारी

ऐल प्राण पैल सखा
जीव भेटीला पारखा
खुपतो काट्यासारखा
सल जिव्हारी

ऐलपैलाच्याही पार
तुझ्या महालाचे दार
त्याच्या पायरीशी थार
दे रे मुरारी

शांतरसकविता

प्रतिक्रिया

सुमन कल्याणपूर गात आहेत असं वाटलं क्षणभर कानांना..! :)

किसन शिंदे's picture

15 Dec 2011 - 7:59 pm | किसन शिंदे

चेपुवर टाकलेल्या तुमच्या शायरी असोत वा इथे टाकलेल्या कविता पाहिल्यावर वाचण्याची खुप उत्सूकता असते.

मदनबाण's picture

15 Dec 2011 - 8:05 pm | मदनबाण

सुंदर... :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Dec 2011 - 8:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

लॉग ऑऊट केलेले परत लॉग इन केले शिस्तीत !!
निव्वळ अप्रतिम रचना!!
असे काही वाचले की संदिपदांची माझ्या स्वाक्षरीतली ती ओळ परत परत येऊन आदळते कानावर.
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी........

प्रास's picture

15 Dec 2011 - 8:08 pm | प्रास

मस्तच काव्य!
सुंदर कल्पना, चपखल शब्द आणि जबरदस्त सुसूत्रता.
कविता आवडली.
___/\___

अतिशय सुरेख - नादमधुर कविता ..

क्रांती काय सुरेख लिहिले आहेस गं..

ऐलपैलाच्याही पार
तुझ्या महालाचे दार
त्याच्या पायरीशी थार
दे रे मुरारी


हे विशेष आवडलं.

गणपा's picture

15 Dec 2011 - 9:12 pm | गणपा

साधं सहज सुंदर...

चतुरंग's picture

15 Dec 2011 - 9:14 pm | चतुरंग

क्या बात है!
मस्तच काव्य. ऐल-पैल शब्दांच्या विरोधातून अप्रतिम रचना साकारली आहे क्रांतीतै! __/\__
अर्थात काव्य आवडलं की आमचा नाईलाज होतो आणि दुसर्‍यांदा दाद द्यावीशी वाटतेच वाटते, ती इथे वाचायला मिळेल! ;)

-चतुरंग

जाई.'s picture

15 Dec 2011 - 10:10 pm | जाई.

छानच काव्य

प्राजु's picture

15 Dec 2011 - 10:24 pm | प्राजु

अप्रतिम!!!
शब्दच नाहीयेत माझ्याजवळ.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2011 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा

वाचुन मन पूर्ण सुखावलेलं आहे. बाकी काव्याची तारिफ मी करणार नाही,कारण ती मुळ काव्यापुढे सगळी अत्यंत खुजी होइल,त्यामुळे..... मनःपूर्वक धन्यवाद!.....अन्य काहीही नाही.

श्रावण मोडक's picture

16 Dec 2011 - 12:04 am | श्रावण मोडक

उत्तम रचना. काही कल्पना खूप आवडल्या. :)

इन्दुसुता's picture

16 Dec 2011 - 12:34 am | इन्दुसुता

अतिशय उत्कृष्ट रचना, फार फार आवडली...
तुमच्या कविता नेहमीच आवडतात.

धनंजय's picture

16 Dec 2011 - 2:19 am | धनंजय

कल्पना आवडल्या. रचनेची आकृतीही छानच.

अभिजीत राजवाडे's picture

16 Dec 2011 - 4:23 am | अभिजीत राजवाडे

नादमय कविता!!!

रेवती's picture

16 Dec 2011 - 7:32 am | रेवती

मस्त रचना.

नंदन's picture

16 Dec 2011 - 8:22 am | नंदन

रचना अतिशय आवडली. विशेषतः शेवटचे कडवे.

ऐल गंध पैल जाई

रामाणींची 'रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले' ही ओळ आठवून गेली.

प्यारे१'s picture

16 Dec 2011 - 10:05 am | प्यारे१

द्वंद्वांच्या पल्याड जाऊन नक्की कसं वागायचं तेच तर समजून उमजून सुद्धा 'करत नाही' आम्ही पढतमूर्ख... :(

>>>ऐलपैलाच्याही पार
तुझ्या महालाचे दार
त्याच्या पायरीशी थार
दे रे मुरारि<<<
बस्स एवढंच मागणं मागावं. संतशिरोमणी नामदेव महाराजांसारखं.

तकनीकी : मुरारी की मुरारि? पहिली वेलांटी असावी असं वाटतंय.

क्रान्ति's picture

16 Dec 2011 - 12:33 pm | क्रान्ति

खूप खूप धन्यवाद!

राघव's picture

16 Dec 2011 - 2:29 pm | राघव

क्ला स!!
अतिशय सुरेख. :)

_/\_

राघव

पैसा's picture

17 Dec 2011 - 3:39 pm | पैसा

फार सुरेख रचना!

आकाशी नीळा's picture

29 Feb 2012 - 9:46 am | आकाशी नीळा

सुंदर रचना......:-)