ही जिवाला आस आहे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
14 Dec 2011 - 3:08 pm

आमची प्रेरणा http://misalpav.com/node/20071 , http://misalpav.com/user/7236 आणि http://misalpav.com/user/707

जेवणाच्या पंगतीला , मोदकाचा घास आहे
आणखी तो मठ्ठ्या संगे , मसालेदार भात आहे

भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं
केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे

मीठ,चटणी ,लोणचे, कुरडया ,कोशिंबीरी
डाळ वांगे नी फोडणीची , ही तर्रीही खास आहे.

चवीचवीने जेव जरा , बेत आज खास आहे
पाहिले नसे कधी असा ;आतिथ्याचा स्वर्ग आहे

चंदनाचा मोगर्‍याचा , केवड्याचा वास आहे
पानासवे उदबत्तीचा, हा मराठी बाज आहे.

शेवटी घे विडा कपुरी , वेलदोडा मुखवास आहे
तृप्त व्हावा जीव तुझा; ही जिवाला आस आहे

संस्कृती

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

14 Dec 2011 - 3:13 pm | विनायक प्रभू

कविता.
प्रत्येक जिवाला असतेच.

'बैठकीची' पंगत फर्मास आहे. :)

बाकी ते कपुरी पाहून आम्हाला भलतचं आठवलं ;)

पियुशा's picture

14 Dec 2011 - 4:01 pm | पियुशा

झक्कास !
आवडेश :)

विनायक प्रभू's picture

14 Dec 2011 - 3:18 pm | विनायक प्रभू

अशा बैठकी कराच्या.
आणि म्हणाचे की अर्थ व्यवस्था ढासळते आहे.
आणि कुणीतरी काकाच्या अकाउंट वर डॉळे लावायचे.

अन्या दातार's picture

14 Dec 2011 - 3:22 pm | अन्या दातार

गणेशा विजुभाऊंवर प्रचंड खुश झाला असता. कारण या विडंबनात कुठेही दारुचा उल्लेख नाही. शिवाय नुकतेच त्याने अश्या जेवणाचा आस्वाद घेतला असल्याने त्याच्या स्मृती परत चाळवल्या जातील. ;)

__/\__

प्रभाकर पेठकर's picture

14 Dec 2011 - 3:26 pm | प्रभाकर पेठकर

शेवटी घे विडा कपुरी , वेलदोडा मुखवास आहे
तृप्त व्हावा जीव तुझा; ही जिवाला आस आहे

काय, छुपा अजेंडा काय आहे म्हणायचा??

यशोधरा's picture

15 Dec 2011 - 8:58 am | यशोधरा

पेठकारकाका :D

गवि's picture

14 Dec 2011 - 3:30 pm | गवि

धन्य...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Dec 2011 - 3:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आपणास साष्टांग __/\__

जाई.'s picture

14 Dec 2011 - 6:54 pm | जाई.

कविता आवडेश

सोनल कर्णिक वायकुळ's picture

14 Dec 2011 - 6:57 pm | सोनल कर्णिक वायकुळ

अहाहा...

मोहनराव's picture

14 Dec 2011 - 7:11 pm | मोहनराव

तुमची ही कविता एकदम झकास आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Dec 2011 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं
केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे

अहाहा...! काय चवदार शेर आहे. :)

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

14 Dec 2011 - 8:06 pm | रमताराम

मूळ कवित गजलसदृश असावी (गैरमुरद्दिफ गज़ल? कॉलिंग एक्स्पर्ट्स) त्यात 'भास आहे', 'वास आहे' श्वास आहे' इ. काफिया आहेत. तुम्ही तर पहिल्या कडव्यातच काफियाची ऐशीतैशी केली राव. असो.

अवांतरः एवढं जेवल्यानंतर अखेरचा शेर 'वास आहे' या काफियाने संपेल असे उगाचच वाटून गेले.

भजीची चव कांद्यामुळे आली की बेसनातील लसुण मसाल्यामुळे या कडे अस्सल खवय्या फारसे पहात नाही. चवीला महत्व असते. तद्वत ......

रमताराम's picture

14 Dec 2011 - 9:02 pm | रमताराम

पण चव आवडली नाही की नक्की काय कमी पडलं मीठ की मसाला हे पहावंच लागतं ना.

५० फक्त's picture

15 Dec 2011 - 8:23 am | ५० फक्त

नंतर मसाला दुध प्यायला चांदीचा ग्लास असावा याची सोय केलेली असेलच.

बाकी कविता भारीच झालीय विजुभाउ.

sneharani's picture

15 Dec 2011 - 9:40 am | sneharani

भारीच!!
:)

प्यारे१'s picture

15 Dec 2011 - 10:04 am | प्यारे१

झकास आहे.

पाषाणभेद's picture

15 Dec 2011 - 10:54 am | पाषाणभेद

तोंपासु

चिगो's picture

15 Dec 2011 - 2:30 pm | चिगो

लज्जतदार कविता...

५० फक्तच्या प्रतिसादावरुन सुचलेल्या ओळी..

" आता पुढच्या कामासाठी, केशरी दुधाचा
शक्तीवर्धक चांदीचा ग्लास आहे.."

केशरी दुधाचा
शक्तीवर्धक चांदीचा ग्लास आहे.."

पण..

शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी..
सर्वकाही व्यर्थ जेव्हा ---- ----

.
.
.
.
.
सुचेना राव... पूर्ण करा की...

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2011 - 5:59 pm | प्रभाकर पेठकर

'भविष्य आपुल्या करी'

गवि's picture

15 Dec 2011 - 7:07 pm | गवि

.

तुमचं यमक छान हो पेठकरकाका,पण "..Xस आहे" अशा पॅटर्नमधे शेवटचे शब्द हवे आहेत हो.

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2011 - 7:55 pm | प्रभाकर पेठकर

शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी..
सर्वकाही व्यर्थ जेव्हा तारुण्याचा भास आहे.

"तारुण्याचा भास आहे" हे काहीतरी मीटरबाहेर जातंय वाट्टं.

......
शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी..
सर्वकाही व्यर्थ जेव्हा बेडखाली डास आहे.

शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी..
सर्वकाही व्यर्थ जेव्हा फोनवरती बॉस आहे.

...

वो गवी तुमचं जरी मीटर मध्ये बसत असलं तरी.
काकांना जो 'संदेश' द्यायचा आहे तो त्यातुन कळत नाही हो. ;)

विजुभाऊ's picture

16 Dec 2011 - 3:37 pm | विजुभाऊ

शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी..
सर्वकाही व्यर्थ जेव्हा तारुण्याचा भास आहे.

शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी..
जोम गेला व्यर्थ म्हणूनी ; तारुण्य उदास आहे.

हे बरोबर बसतय का गवि?

गवि's picture

16 Dec 2011 - 3:42 pm | गवि

चोक्कस... :)

चिगो's picture

16 Dec 2011 - 3:56 pm | चिगो

>>शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी..
जोम गेला व्यर्थ म्हणूनी ; तारुण्य उदास आहे.

क्या बात है, विजुभाऊ... वरचे गविंचे "डास आणि बॉस"ही मस्त आहेत..

विजुभाऊ's picture

16 Dec 2011 - 1:35 pm | विजुभाऊ

शक्तीवर्धक चांदीचा ग्लास आहे.."

शक्तीवर्धक नक्की काय आहे ? ग्लास की दुध ?

चिगो's picture

16 Dec 2011 - 3:40 pm | चिगो

"चांदीच्या ग्लासातील दुध" शक्तीवर्धक.. मीटरात बसवायला जरा चुकीचे फएरफटका मारावा लागला.. समजून घ्या की राव..

मि-इंजिनिअर's picture

15 Dec 2011 - 6:12 pm | मि-इंजिनिअर

पाणी सुटले राव जिभेला अगदी

देविदस्खोत's picture

15 Dec 2011 - 7:40 pm | देविदस्खोत

फर्मास !!!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

15 Dec 2011 - 7:47 pm | परिकथेतील राजकुमार

बुधवार रात्रीची पंगत आवडली ;)

आवडती स्त्री देखील खुश झाली असावी.

रमताराम's picture

16 Dec 2011 - 9:39 am | रमताराम

बुधवारी रात्रीची पंगत अशी वरण-भाताची असते का रे, आं? तुझ्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकाकडून अशी चूक? हे राम.

(अभ्यासू) रम-ता-राम

मदनबाण's picture

15 Dec 2011 - 8:08 pm | मदनबाण

मस्त...