तंटामुक्त गावाची घोषना राज्यात आली
गल्लीपासून दिल्लीपर्यंत पळापळ सर्वांची झाली.
अहिंसेच्या पुजा-याचे नाव योजनेला दिले
महात्मागांघीच्या नावासाठी सारेजण हपापले.
सभा सा-या गावाची चावडीवर जमली,
योजनेची महिती सर्वाना दिली.
पोलीस स्टेशन, पोलीस पाटील खबर सा-यांना दिली,
तक्रार कुणाची नोंदवायची नाही तंबी सर्वांना दिली.
बांधाचा असो, चा-याचा असो,
भावबंदकीचा असो वा वाटणीचा असो,
नवराबायकोचा असो वा सासू-सुनांचा असो,
भावाभावांचा असो वा जावाजावांचा असो,
तंटा कुणी नोंदवायचा नाही, आपआपसात मिटवायचा,
घरचाच वाद पोलीसात कशाला न्यायचा.
न्यायनिवाडा करुया आपण,
आपणच निवडू पंच,
आपलीच निवडू समिती,
बनू सारे संत.
पंच समितीचे नाव निघताच
पुढारी सारे गोळा झाले,
समिती च्या अध्यक्षपदी स्वतः चेच नाव सुचवू लागले.
सत्ताधारी-विरोधी रस्सीखेच सुरु झाली,
बघता बघता अध्यक्षपदाची निवडणूक लागली.
प्रचार आणी प्रसाराची रणधूमाळी माजली,
एकमेकांची जुनी लफडी सर्वा नीच उकरुन का ढ्ली.
डोकी फूट्ली, पेटले ऊस,
तंटामुक्त गावाने बदलली कूस.
तंटामुक्त गावाचे मुक्तं तंट्यात रुपांतर झाले,
योजनेचे तिनतेरा जागीच वाजले,
योजनेचे तिनतेर जागीचे वाजले.
उमेश कुचेकर-८९७५९८४७५९
प्रतिक्रिया
12 Dec 2011 - 5:12 pm | मराठी_माणूस
?????????????
12 Dec 2011 - 5:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
गाव तत्टामुक्त झालेले दिसतेय... म्हणून इथली कविता काढून टाकली असावी. ;)
12 Dec 2011 - 7:37 pm | अत्रुप्त आत्मा
:-)