आज माझा मित्र सतिश सलागरे यांनी दिग्दर्शित केलेल्या " पारंबी" या चित्रपटाचा प्रिमिअर शो पाहाण्याचा योग आला.. अंधेरीच्या फन रिपब्लिक मध्ये या चित्रपटाचा प्रिमिअर शो होता..अतिशय साधे पण तितकेच विचारप्रवणीय कथानक..खेडेगावातील एक गरिब तरूण शिक्षण घेउन आल्यावर , गावाची परिस्थीती बघून आपलच गाव सुधारण्या प्रयत्न सुरू करतो.. हे करत असतांना त्याला काय अडचणी येतात, त्यातून तो नायक कसा मार्ग काढतो.. अशी साधी कथा.. भूषण प्रधान. साई लोकूर जयंत सावरकर..गणेश यादव , सुहास पळशिकर उषा नाइक या सर्वांचा सहज सुंदर अभिनाय हे या चित्रपटाचं वैभव..पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जो सामाजिक संदेश लोकां पर्यंतं पोहचविणाच्या उद्देशाने हा चित्रपट बनवला आहे..तो संदेश लोकांपर्यंत थेटपणे पोचतो हेच या चित्रपटाच्या यशाचं गमक....या साठी सतिश चं अभिनंदन.. हिरा फिल्म कंबाइन्सचं अभिनंदन , की त्यांनी हा आगळा वेगळा चित्रपट काढण्याचे यशस्वी धाडस केले .. आणि हो गाणी संगित सारच अप्रतिम.. बघा जाउन हा चित्रपट..!!!.. !!
प्रतिक्रिया
9 Dec 2011 - 4:54 am | प्राजु
एकदमच थोडक्यात आवरलंत!
दिग्दर्शन, गीतकार, संगितकार तसेच कथानकाची अजून थोडीशी ओळख, किंवा त्यात विशेष पाहण्यासारखे, तुम्हाला सर्वात जास्त काय आवडले हे लिहायला हवे होते.
9 Dec 2011 - 10:45 am | शिल्पा ब
ही फक्त जाहीरात आहे.
9 Dec 2011 - 10:56 am | प्रास
चांगल्या, सामाजिक संदेश देणार्या गोष्टीची जाहिरात करायला काय हरकत आहे?
9 Dec 2011 - 11:03 am | शिल्पा ब
मी फक्त जे आहे ते प्राजुला सांगितलं. तुम्ही का मधे मधे बोलताय?
9 Dec 2011 - 11:07 am | प्रास
जे आहे ते तुम्ही प्राजुला सांगितलं त्यात मला जे वाटलं ते तुम्हाला नंतर सांगितलं, ते मधे मधे कुठे येतंय?
उगाच कै च्या कै बोलताय....