फास्टफुड च्या लाईफ मधे काय हे जगण
बेचव काही तरी खाऊन मन मारुन ठेवण |
लोकांच्या ह्या गर्दी मधे ही मनाला पण नाही जागा
विसावासाठी पुरे फक्त १ झाड आणी १ प्रेमचा धागा |
प्रेमाच्या पंखाला आता तरी एखादी वाट हवे
ईमेल व एस.एम.एस ह्याची अनमोल १ साथ हवे |
-- मयुर
प्रतिक्रिया
7 Dec 2011 - 5:08 am | चित्रा
आपले मिपावर स्वागत. पहिली कविता मिपावर दिलीत याबद्दल अभिनंदन!
कवितेत काही ढोबळ चुका राहिल्या आहेत, त्या जरूर दुरुस्त कराव्यात.
उदा. १ झाड असे आपण लिहीले आहे असे आपण कवितेत सहसा पाहत नाही. १ प्रेम, १ साथ यांचेही तेच. जगणं, आणि जगण यात जगणं अधिक बरोबर. ठेवण याला वेगळा अर्थ आहे, ठेवणं मध्ये वेगळा अर्थ जाणवतो. ही काळजी घेतली तर कविता वाचणे सोपे जाईल.
नवीन लेखकांना मार्गदर्शन करता येईल का? - हा धागा तुम्हाला उपयुक्त ठरावा. http://www.misalpav.com/node/18992
7 Dec 2011 - 9:54 am | मयुरपिंपळे
तुमचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. माझा हा पहिलाच प्रयन्त आहे. :)
7 Dec 2011 - 6:30 pm | चित्रा
प्रयत्न चांगला आहे.
थोडेफार प्रतिसाद/लेखन मिपावर वाचत-लिहीत गेलात की आपोआप सवय होईल - अधिक सफाईने लिहीण्याची. तेव्हा स्वागत आहे!
7 Dec 2011 - 9:20 pm | मयुरपिंपळे
नक्कीच! तुमच्या सारखे वाचक असताना, अधिक सफाईने लिहीण्याचा प्रयन्त राहील. :)
7 Dec 2011 - 9:00 am | पाषाणभेद
अभिनंदन.
7 Dec 2011 - 10:13 am | मराठी_माणूस
फोटो जास्त आवडला
7 Dec 2011 - 4:23 pm | अत्रुप्त आत्मा
पहिल्या प्रयत्नातला पहिला फोटोच जास्त अवडला...फोटो आपण स्वतः हेरलात आणी काढलात काय?
अवांतर-चित्र लैच अवडल्यामुळे इथुन उचलुन डेस्कटॉपवर लावले आहे... :-)
7 Dec 2011 - 9:23 pm | मयुरपिंपळे
गुगल बाबा आहेत.
7 Dec 2011 - 10:53 pm | पैसा
तुमच्या कवितेत काही एक कल्पना आहे, सुरुवातीला खूप वाचा. हळूहळू सफाई येईलच. चित्र जर तुम्ही काढलेलं नसेल तर कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही अशा प्रकारे वापरावे. असं चित्र वापरायला सर्वाना फ्री असेल तरी मूळ स्रोताचा उल्लेख करावा. पुढील लेखनाला शुभेच्छा!
7 Dec 2011 - 11:08 pm | मयुरपिंपळे