देवानंद म्हटले की मला माझे बालपन आठवून जाते. अगदी लहानपणी होतो तेव्हा कालापाणी बघितला. होता.
खोया खोया चाँद गाने म्हणत सायकल शिकलो होतो .
देवानंद सारखे दिसायचे
देवानंद सारखे बोलायचे
त्याच्या स्टाईलने चालायचे
असा हा माझा ,तुमचा आवडता हीरो.
गाईड बघितला. फली मिस्त्रिची अप्रतिम फोटोग्राफी नि देवानंदचा अभिनय सिनेमाची स्टोरी काळजात कायमची घर करून गेली
देवानंद म्हटले की मला माझे बालपन ,तारुण्य आठवू लागते.
आणि माझ्या शरीरात तारुण्याचा झरा अवखळपणे वाहू लागतो.
देवानंद म्हणजे मला अगदी घरातला जिवाभावाचा मित्र वाटत होता.
हल्ली हल्ली मी देवानंद बघतच नव्हतो.
त्याचे म्हातारपण मला बघाविलेच नसते.
आपल्या समोर देवानंद्चे जे चित्र उभे आहे ते पुसले जाऊ नये हां माझा अट्टहास होता .
त्याचा कोंबड़ाछाप भांग बघून माझे खूप मित्र तसा कोबड़ाछाप भांग पाडीत .तो भांग मला कधी भावला नाही
जोनी मेरा नाम मधला देवानंद मला खूप भावून गेला होता.
तेरे-मेरे सपने हां त्याचा अप्रतिम सिनेमा मी बघितला होता .
मझ्या तुमच्या सर्वांच्या आयुष्यात देवानंद आभाळभर पसरला होता .
आणि क़ाल देवानंद गेला
काळजात कळ उमटली
नि कोणीतरी माझी हिरवाई उध्वस्त केली ही खूप भावना मनात दाटून आली.
आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले. ..!!
प्रतिक्रिया
5 Dec 2011 - 1:24 pm | मराठी_माणूस
नि कोणीतरी माझी हिरवाई उध्वस्त केली ही खूप भावना मनात दाटून आली.
आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले. ..!!
असंख्य लोकांची साधारण हीच अवस्था आहे.
5 Dec 2011 - 2:06 pm | वाहीदा
आणि क़ाल देवानंद गेला
काळजात कळ उमटली
नि कोणीतरी माझी हिरवाई उध्वस्त केली ही खूप भावना मनात दाटून आली.
हिच खरी श्रध्दांजली !
5 Dec 2011 - 4:03 pm | चिंतामणी
छान लिहीले आहेत.
5 Dec 2011 - 9:38 pm | यकु
गाईड लावला आहे..
या बघायला .. :)
6 Dec 2011 - 10:51 am | केशवराव
वो जिंदगी का साथ निभाता चला गया . . . . . . . .