चेतना

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
4 Dec 2011 - 9:09 am

विस्तीर्ण नभावर मेघदळे घनदाट
पवनास न बंधन धावतसे फुंफाट
क्षितिजास फडकल्या भोर ध्वजा कनकाच्या
नांदी दिवसाची उगवे रमल पहाट

तिमिरास किनारी कांचनमय अल्हाद
भरल्या अंबरभर पुन्हा नव्या अभिलाषा
तो अथक प्रवासी चाले आपली वाट
पल्लवीत कुसुमे जीवन; नवओघात

सृजनाचे दालन; उमले रोज प्रभात
चेतना सकल हृदयात; चेतवी वात
दुरितांस ऊब तरुछाया कधि अपघात
चिरअनंत चाले योगभारला संवाद

मी अंश तयाचा आक्रमतो एकांत
विसरतो कसा मग मावळणे अभिजात
जे ज्यास हवे ते द्यावे आपल्या हातांनी
उत्तुंग वागणे राहिल चिरस्मरणात

............................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Dec 2011 - 3:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मी अंश तयाचा आक्रमतो एकांत
विसरतो कसा मग मावळणे अभिजात
जे ज्यास हवे ते द्यावे आपल्या हातांनी
उत्तुंग वागणे राहिल चिरस्मरणात

__/\__

इन्दुसुता's picture

5 Dec 2011 - 11:44 pm | इन्दुसुता

सुंदर ! ( नवीनवखी यांची 'मन' वाचल्यानंतर , वाचण्याच्या क्रमामध्ये फार अ‍ॅप्रॉप्रिएट वाटली ).