जगातल्या नवनवीन गोष्टी

विभा's picture
विभा in जनातलं, मनातलं
3 Dec 2011 - 1:01 am

मिसळपावरची हि माझी पहिलीच पोष्ट आहे.. तेव्हा गोड मानून घ्यावी....

जगात रोज नवनवीन गोष्टी घडतात. स्वाभाविकच आपल्याला प्रत्येक प्रसंगाची माहिती असणे शक्य नाही, परंतु कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याच्याशी पण अज्ञात असतो. जगातल्या अशाच काही गोष्टी ज्या आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आहेत त्या नव्याने मांडत आहे..

  • आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच अनोळखी नाही. माहितीचा खजाना मिळविण्यासाठी गुगल सर्च करण अगदी सामान्य झालाय. पण काय तुम्हाला माहित आहे कि खरं तर गुगल हे १० लाखाहून पण जास्त शून्याचा आकडा साठी वापरण्या जाणारं सामान्य नाव आहे.
  • आज आपल्याला बाजारात वेगवेगळे माउथवौश भेटतात परंतु पुरातन काळात रोम, चीन आणि जर्मनची प्रजा माउथवौश साठी मुत्राचा उपयोग करत होती.
  • आपल्या स्वास्थ्या साठी शुद्ध मध अत्यंत गुणकारी मानल जात. आज डायबिटीजच्‍या रोग्यांसाठी बर्फी/मिठाई बनविण्यात साखरेच्या ऎवजी मधाचा उपयोग केला जातो. पण काय तुम्हाला माहित आहे कि मधमाशी 20 लाख फुलांचा रस एकत्र करते तेव्हां अर्धा किलो मध तैयार होतो.
  • कोण एका महाज्ञानी व्यक्तीला राष्ट्राचे प्रमुख बनविण्याची ऑफर देण्यात आली आणि त्याने ते नकारली.. ही गोष्ट असंभव वाटते. पण वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन ह्याने १९५२ मधे इजरायल चे प्रमुखपद स्वीकारायला नकार दिला होता.
  • आपण कानाच्या बाजुला शंख धरला तर आपल्याला त्यातुन समुद्राच्या लाटांच्‍या आवाज ऐकू येतो. परंतु काय तुम्हाला माहित आहे कि हा आवज वास्तव मधे आपल्या कानाच्या रक्तवाहिन्यान मधे वाहणार्‍या रक्ताचा असतो.
  • आज मोबाईलच्या दुनियेत "नोकिया" हे नाव कोणाला माहित नाही असं नाही. परंतु १८६५ मधे फ्रेडरिक आईडेस्टमनी नोकियाची सुरुवात लाकडाच्या मावा आणि पेपर मिलने केलेली, तर मोटोरोला हि आधी कार रेडिओची कंपनी होती.
  • जानेवारी महिन्यात मकर संक्रांती येते तेव्हा आपण पतंग उडविण्यासाठी गच्चीवर जातो, मात्र मनोरंजन आणि परंपरे साठी. परंतु काय तुम्हाला माहित आहे कि 'अमेरिकन सीविल वॉर' दरम्यान त्याचा उपयोग पत्र आणि संदेश पोचवायला होत होता.
  • >चौदाव्या आणि पंधराव्या शतकामधे आईब्रो(भुवया) न ठेवण्याची प्रथा होती. म्हणूनच मोनालिसाच्या चित्रा मधे तुम्हाला भूवया दिसत नाही.
  • आपण कीती तरी वेळा रोमन आकडे पाहिले असतील आणि त्याच्या नियमित उपयोग पण केला असेल. परंतु आपल्यामधल्या किती लोकांनी ही गोष्ट नोंद केली आहे की त्यात शून्य नसतो. हो, रोमन आकड्यांचा मधे झीरो नसतो. (आणि शून्याचा शोध कुठे लागला हे तुम्हा आम्हा सार्यांना ठाऊकच आहे )
  • अंतराळवीर ढेकर नाही देउ शकत. ह्याच कारण हे आहे कि त्यांच्या पोटामधे ग्यासला प्रवाहीशी वेगळ करणार विशिष्ट धनत्वच नसत.
इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

सचिन भालेकर's picture

3 Dec 2011 - 1:34 am | सचिन भालेकर

छान माहिती दिली............... :) :) :)

झ्झकास...............

विनोद१८'s picture

3 Dec 2011 - 1:56 am | विनोद१८

विभा अशीच महिती नेहमी दे, गोड मानून घेउ......सगळे..!!!

(नेहमी गोड खाणारा) विनोद१८

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2011 - 1:56 am | टवाळ कार्टा

"काय तुम्हाला माहित आहे" ची कितवी आव्रुत्ती वाचत आहात :D (ह.घे.)

अवांतर :- काय तुम्हाला माहित आहे ह.घे. म्हणजे हलके घेणे :)

प्रभाकर पेठकर's picture

3 Dec 2011 - 3:40 am | प्रभाकर पेठकर

'विचित्र विश्व'ची आठवण झाली. तपशील मजेशीर आहेत.

तर्री's picture

3 Dec 2011 - 9:57 am | तर्री

धन्यवाद ,
तेवढे मधा बद्द्ल थोडे सावध करावे म्हणतो.
तुम्हाला हे माहिती नसेल कदाचित , बाजारात मिळणारा ९० % मध हा "कृत्रिम" असतो .
सगळ्या प्रसिध्द कंपन्या ( बैद्यनाथ ते चरक ) तो रीपॅक करतात.
कोणतीही कंपनी माश्या पाळत नाहीत - मध बनवत नाहीत.
ते मधाची मशीनरी पाळतात व पैशाचे भरपूर ऊत्पादन घेतात.
एगमार्क प्रमाणित असून सुध्दा !!!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2011 - 10:27 am | अत्रुप्त आत्मा

आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच अनोळखी नाही. माहितीचा खजाना मिळविण्यासाठी गुगल सर्च करण अगदी सामान्य झालाय. पण काय तुम्हाला माहित आहे कि खरं तर गुगल हे १० लाखाहून पण जास्त शून्याचा आकडा साठी वापरण्या जाणारं सामान्य नाव आहे.... बाप रे शून्यात हरवलो...

आज आपल्याला बाजारात वेगवेगळे माउथवौश भेटतात परंतु पुरातन काळात रोम, चीन आणि जर्मनची प्रजा माउथवौश साठी मुत्राचा उपयोग करत होती... निषेढ निषेढ निषेढ...हे आमच्या महान परंपरेत आधीच होतं,आमच्या कडे सगळं अधीच असतं. ;-)

आपल्या स्वास्थ्या साठी शुद्ध मध अत्यंत गुणकारी मानल जात. आज डायबिटीजच्‍या रोग्यांसाठी बर्फी/मिठाई बनविण्यात साखरेच्या ऎवजी मधाचा उपयोग केला जातो. पण काय तुम्हाला माहित आहे कि मधमाशी 20 लाख फुलांचा रस एकत्र करते तेव्हां अर्धा किलो मध तैयार होतो...बरं मग?

कोण एका महाज्ञानी व्यक्तीला राष्ट्राचे प्रमुख बनविण्याची ऑफर देण्यात आली आणि त्याने ते नकारली.. ही गोष्ट असंभव वाटते. पण वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन ह्याने १९५२ मधे इजरायल चे प्रमुखपद स्वीकारायला नकार दिला होता...त्या पेक्षा विज्ञानातले शोध लावत बसणं बरं,हे त्याला फार पटकन कळलं असावं :-)

आपण कानाच्या बाजुला शंख धरला तर आपल्याला त्यातुन समुद्राच्या लाटांच्‍या आवाज ऐकू येतो. परंतु काय तुम्हाला माहित आहे कि हा आवज वास्तव मधे आपल्या कानाच्या रक्तवाहिन्यान मधे वाहणार्‍या रक्ताचा असतो...हे पर्वाच कुणितरी कानात सांगितलं ;-)

आज मोबाईलच्या दुनियेत "नोकिया" हे नाव कोणाला माहित नाही असं नाही. परंतु १८६५ मधे फ्रेडरिक आईडेस्टमनी नोकियाची सुरुवात लाकडाच्या मावा आणि पेपर मिलने केलेली, तर मोटोरोला हि आधी कार रेडिओची कंपनी होती...असं व्हय ब्वार ब्वार

जानेवारी महिन्यात मकर संक्रांती येते तेव्हा आपण पतंग उडविण्यासाठी गच्चीवर जातो, मात्र मनोरंजन आणि परंपरे साठी. परंतु काय तुम्हाला माहित आहे कि 'अमेरिकन सीविल वॉर' दरम्यान त्याचा उपयोग पत्र आणि संदेश पोचवायला होत होता...तिकडे कबुतरं नसावित,,,त्याचा परिणाम...शिवाय अपल्या सारखी ''विदुर टेक्नॉलॉजी'' नव्हती त्यांच्या कडे,मागास बिच्चारे ;-)

>चौदाव्या आणि पंधराव्या शतकामधे आईब्रो(भुवया) न ठेवण्याची प्रथा होती. म्हणूनच मोनालिसाच्या चित्रा मधे तुम्हाला भूवया दिसत नाही...ऐति-हासिक माहिती...धण्यवाद

आपण कीती तरी वेळा रोमन आकडे पाहिले असतील आणि त्याच्या नियमित उपयोग पण केला असेल. परंतु आपल्यामधल्या किती लोकांनी ही गोष्ट नोंद केली आहे की त्यात शून्य नसतो. हो, रोमन आकड्यांचा मधे झीरो नसतो. (आणि शून्याचा शोध कुठे लागला हे तुम्हा आम्हा सार्यांना ठाऊकच आहे )....आजतर ते अणखिनच स्पष्ट झाले..कसें..अं? ;-)

अंतराळवीर ढेकर नाही देउ शकत. ह्याच कारण हे आहे कि त्यांच्या पोटामधे ग्यासला प्रवाहीशी वेगळ करणार विशिष्ट धनत्वच नसत... बाबौ.. मंजी उतरताना पृथ्वीचं वातावरण भयंकर खराब होत असणार :-)

आनंद घारे's picture

3 Dec 2011 - 11:48 am | आनंद घारे

विभातै (का भौ) आता आताच मिपाच्या हाटेलात आल्या (आले) आहेत. त्यांना जरा इथल्या वातावरणाची सवय होऊद्या. अशा प्रतिसादानं बिचकायच्या(चे) कदाचित ! .)

गुरुनाथ्काळे's picture

3 Dec 2011 - 11:53 pm | गुरुनाथ्काळे

>>आज आपल्याला बाजारात वेगवेगळे माउथवौश भेटतात परंतु पुरातन काळात रोम, चीन आणि जर्मनची प्रजा माउथवौश साठी मुत्राचा उपयोग करत होती... निषेढ निषेढ निषेढ...हे आमच्या महान परंपरेत आधीच होतं,आमच्या कडे सगळं अधीच असतं. Wink

आपल्या महान परंपरेत आधीच होतं कि नाही माहित नाही. पण लहानपनी ऐकून होतो कि मोरारजी देसाई देखील हेच करायाचे.

आदिजोशी's picture

5 Dec 2011 - 11:50 am | आदिजोशी

तुम्ही स्वतःच्या प्रतिसादांपुढे तुम्ही स्वतःच टाकलेल्या स्मायलीज वरून तुमच्या टिप्पण्या विनोदी आहेत असा तुम्हाला संशय असेल तर तो मनातून काढून टाका. विनाकारण नव्या मेंबर्सना त्रास देऊ नका.

अमोल केळकर's picture

3 Dec 2011 - 10:40 am | अमोल केळकर

छान माहिती . धन्यवाद :)

अमोल केऴकर

आनंद घारे's picture

3 Dec 2011 - 11:59 am | आनंद घारे

अशा नव्या मजेदार गोष्टींबद्दल माहिती किंवा चित्रे असलेली ढकलपत्रे आजकाल नेहमी आपल्याला येत असतात. त्यांचा संग्रह करून तो उपलब्ध करण्याचा उपक्रम चांगला आहे. इतर वाचकांनी त्यात आपल्याकडील अजब माहिती जोडल्यास ती एका वेळी वाचायला मिळेल. ही माहिती कुठून मिळाली याचा संदर्भ दिल्यास ती अधिक विश्वसनीय वाटेल
असाच एक लहानसा प्रयोग मी 'शिंपले आणि गारगोट्या' या नावाच्या माझ्या अनुदिनीवर करण्याचा प्रयत्न करतो आहे.

अन्या दातार's picture

3 Dec 2011 - 12:20 pm | अन्या दातार

गोष्टी या शीर्षकाच्या धाग्यात इतिहासकालीन माहिती का बरे देण्यात आली?

(हा नवा धागा ऐतिहासिक होणार असं दिसतंय!)

स्वागत's picture

3 Dec 2011 - 4:02 pm | स्वागत

माहिती छान, पहिला लेख उत्तम, पुढच्या लेखनास शुभेच्या.

विनायक प्रभू's picture

3 Dec 2011 - 4:35 pm | विनायक प्रभू

छान माहीती.
सर्वांनी आपापल्या क्षेत्रातील अशी नवन वीन माहीतीचे धागे टाका म्हणे.

मोहनराव's picture

3 Dec 2011 - 5:20 pm | मोहनराव

का कोणास ठाऊक पण मला संध्यानंद पेपर वाचल्यासारखं का वाटतंय?

हरिकथा's picture

3 Dec 2011 - 9:27 pm | हरिकथा

छान माहिती.

विभा's picture

3 Dec 2011 - 10:55 pm | विभा

माझं तोडकं मोडकं मराठी गोड मानून घेतल्या बद्दल धन्यवाद!!..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Dec 2011 - 10:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच अनोळखी नाही. माहितीचा खजाना मिळविण्यासाठी गुगल सर्च करण अगदी सामान्य झालाय. पण काय तुम्हाला माहित आहे कि खरं तर गुगल हे १० लाखाहून पण जास्त शून्याचा आकडा साठी वापरण्या जाणारं सामान्य नाव आहे.

काय तुम्हाला माहित आहे कि खरं तर गुगल (Google) ह्या शब्दाला काही अर्थ नाही. दहा लाखाहून पण जास्त शून्याचा आकडा साठी वापरण्या जाणारं सामान्य नाव गूगोल (Googol) आहे. गुगल वाल्यांनी कंपनी ला नाव ठेवताना स्पेलिंग चुकवले होते. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2011 - 11:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान माहिती. अजून येऊ द्या.
आणि मिपावर स्वागत आहे.

-दिलीप बिरुटे

आनंदी गोपाळ's picture

4 Dec 2011 - 7:26 pm | आनंदी गोपाळ

आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच अनोळखी नाही. माहितीचा खजाना मिळविण्यासाठी गुगल सर्च करण अगदी सामान्य झालाय. पण काय तुम्हाला माहित आहे कि खरं तर गुगल हे १० लाखाहून पण जास्त शून्याचा आकडा साठी वापरण्या जाणारं सामान्य नाव आहे.

गूगल म्हणजे एकावर शंभर शून्य.

असेच अजिम प्रेमजी ह्याची विप्रो कंपनी आधी शिकेकाईचा विप्रो साबण बनवत होती.

असेच अजिम प्रेमजी ह्याची विप्रो कंपनी आधी शिकेकाईचा विप्रो साबण बनवत होती.

विप्रो अजूनही साबण तेल वगैरे बनवते.
असो
विचित्र विश्व नावाचे एक मासीक मराठीत यायचे त्यात असे एक सदर असायचे.
पुलंच्या माझी कुसंपादकीय कामगिरी (" लन्सीपे" ) या लेखात अशा लेखनाची धम्माल टर उडवलेली आहे त्याची आठवण झाली