माझे ज्या लोका॑शी छान मैत्री होते त्या लोका॑ची रास मी आवश्य नोद॑वते.
माझी रास कन्या माझ्या नवर्याची ही कन्या पण एकाच राशीचे असुन आम्ही अत्य॑त वेगळ्या मता॑चे आहोत आणि माझ्या नवर्याच्या मते अशाच जोडप्याचा स॑सार छान होतो.
पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही.
लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे.
माझ्या मित्र मैत्रिणी धनु, सि॑ह, आणि तुळ ह्या राशीच्या लोका॑शी माझे छान जमते.
मेष राशीशी अजिबात जमत नाही.
प्रतिक्रिया
7 Jun 2008 - 10:04 am | यशोधरा
मेष किंवा वृश्चिक का हो काका?
7 Jun 2008 - 11:12 am | रिमझिम
माझी रास मिथुन ,पण मी कधी कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही.
7 Jun 2008 - 6:02 pm | शितल
हो, मला ही वाटते डा॑बिसकाका॑ची रास सिह॑ असावी .
7 Jun 2008 - 8:20 pm | धमाल मुलगा
मी अस्सल...पक्का....अगदी अर्क असा वृश्चिक....
एखाद्यावर जीव टाकला तर साला स्वतःच्या हाताने स्वतःची गर्दन त्याच्यासाठी उतरवून देणार्...पण जर एखादा तिरक्या चालीनं वाकड्यात शिरला तर मग मात्र त्याची गर्दन स्वतःच्या हातानं उतरवून गावाच्या वेशीवर टांगायला कमी नाही करणार!
अतिशयोक्तीचा भाग सोडून देऊ आपण, पण आहे हे असं आहे.
पण माझी 'सन-साईन' 'जेमिनी' आहे :) म्हणजे मिथून की हो....इथुन तिथून मिथून :)) (आता कळलं आमच्या प्रतिसादांतल्या उथळपणाचं कारण?)
त्यामुळे वृश्चिकेची नांगी बर्याचदा मिथुनेच्या घोळात दडून जाते.
ह्याउप्पर आणखी काय बोलावे? वृश्चिकेचा हलकटपणा, क्रुरता, केलेले वार लक्षात ठेऊन त्याचा सूड घेण्याची वृत्ती..
मिथुनेचा खेळकरपणा, सहज मैत्री करण्याची कला, फार वेळ लांबट तोंड करुन बसता न येता सतत दाताड वेंगाडून हसत राहणे, चकाट्या पिटणे...इ.इ. सगळे प्रकार ह्या एकाच चिमुकल्या देहात तुम्हाला आढळून येतील :)
7 Jun 2008 - 11:33 pm | मयुरयेलपले
आम्हि सिंह आणि आमचे कन्या राशिशि फार चांगले जमते...
तशि सिंह रास शब्दांचि कोटि करुन इनोद करणारि...
आमचि आई सिंह (रास ) " हेड & शोल्डरनि खांदे पण धुतात का?"
आपला मयुर
8 Jun 2008 - 12:01 am | शितल
सि॑ह राशीचे माणसे आयुष्य छान जगतात. पण ते फक्त स्वतःच दुसर्याला त्या पासुन त्रास होतो ते, ते गृही त धरत नाहीत.
हो कन्या राशीचे सि॑ह राशीशी चा॑गले जमते, पण नवरा बायको जर एकाची सिह॑ आणि एकाची कन्या असेल तर ते एकमेका॑ना मागे ओढ्तात.
आपल्या राशी पासुन सहावी रास असलेल्या व्यक्ती शी लग्न करत नाहीत म्हणजे त्या॑चे जमत नाही.
8 Jun 2008 - 12:58 am | मयुरयेलपले
सि॑ह राशीचे माणसे आयुष्य छान जगतात. पण ते फक्त स्वतःच दुसर्याला त्या पासुन त्रास होतो ते, ते गृही त धरत नाहीत.
त्रास??? क्रुपया जरा स्पष्ट सांगाल का?? (स्वःता मध्ये सुधारणा करण्यासाठि)
आपला मयुर
8 Jun 2008 - 1:12 am | शितल
म्हणजे कसे ते पहा मयुर साहेब,
सि॑ह राशीची लोक मस्त रूबाबात राहतात, छान मस्त पैसा खर्च करतात फक्त स्वतःच्या दिसण्यावर आणि आवडी निवडी बाबत ते कोणतीही ऍडजेस्टमे॑ट करत नाहीत, कितीही महाग असली तरी आवडे खातर ती घेणारच, आणि देण्या घेण्यात ही हात आवरता नाही सगळे कसे दिव्य भव्य असते.
त्यामुळे दुसरा झाकुन जातो नाही का?
बाकी मी म्हणेल तीच पुर्व दिशा असे,पण प्रेमाने सा॑गाल तर जीव ही देतील.
8 Jun 2008 - 1:41 am | मयुरयेलपले
सि॑ह राशीची लोक मस्त रूबाबात राहतात, छान मस्त पैसा खर्च करतात फक्त स्वतःच्या दिसण्यावर कोणतीही ऍडजेस्टमे॑ट करत नाहीत
हे मान्य
आणि आवडी निवडी बाबत ते कोणतीही ऍडजेस्टमे॑ट करत नाहीत
९०% करतो
कितीही महाग असली तरी आवडे खातर ती घेणारच, आणि देण्या घेण्यात ही हात आवरता नाही
मि बहुतेक अपवाद आहे, फुकट ते पौष्टिमाननारा मि...देत नाय घेत पण नाय... आपला वसुल च आहे
आपला मयुर
14 Aug 2008 - 8:05 pm | निमिष सोनार
माझी चंद्र रास = वृषभ
लग्न रास = मीन
सूर्य राशी (पाश्चात्य) = मीन
प्रथम स्थानी (लग्नी) मीनेचा शुक्र (गुरुच्या राशीत शुक्र)
तृतीय स्थानी वृषभ राशीत गुरु-चंद्र युती (शुक्राच्या राशीत गुरु)
माझे प्रश्नः
(१) प्रथम स्थानी (लग्नी) मीनेचा शुक्र असल्यास काय होते? ते चांगले की वाईट?
(२) माझ्यावर शुक्राचा की गुरुचा जास्त प्रभाव आहे?
---निमिष सोनार, पुणे
15 Aug 2008 - 10:52 pm | गारवा
मला रास भविष्य कळ्त नाहि..माझी रास ॠषभ आहे..मला माझ्झा राशि बद्दल कुणी माहिती कळवा
15 Aug 2008 - 11:03 pm | प्राजु
माझी रास कोणती असेल सांग बघू??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Apr 2010 - 7:23 am | शुचि
माझी चंद्र रास कर्क. मी रडले नाही अशी एकही जागा नाहीये जळी स्थळी काष्ठी पाषाणी रडून झालय .
लग्न मिथुन .... पुस्तक वाचनाचा अतोनात नाद. उथळपणा सुद्धा बराच :D
सूर्य रास धनू की मकर ते एक देवालाच माहीत. - २२ डिसेंबर
मला आवडणार्या लोकांमध्ये मंगळ ग्रहाचं प्राबल्य खूप असतं - वृश्चिक अथवा मेष - लढाऊ लोकं मला पटकन आवडतात. माझा मंगळ खूप छान आहे. वृश्चिकेचा. त्याला तोडीस तोड व्यक्ती आवडतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
11 Jan 2011 - 9:01 am | कौशी
मी मिथुन राशीची आणि नवरा धनु
आणखी माहिती येउ द्या....
11 Jan 2011 - 9:55 am | नरेशकुमार
माझी
जन्म नावावरुन येनारी रास
चालू नावावरुन येनारी रास
बोली नावावरुन येनारी रास
मिपा नावावरुन येनारी रास
या सर्व वेगवेगळ्या आहेत.
11 Jan 2011 - 10:30 am | पिवळा डांबिस
२००८ ते २०१०!!!!!!
अजूनही माझी रास कोणती हे कोणीही मिपाकर अचूक सांगू शकलेला नाही!!!!
(आणि यातच माझे यश सामावलेले आहे! जय हिंद!!)
:)
9 Feb 2011 - 7:00 pm | यशोधरा
मुळीच नाही. काका, तुमची रास यशस्वीरीत्या ओळखलेली आहे.
9 Feb 2011 - 8:37 pm | गणेशा
मस्त थ्रेड.
सगळा वाचला.
मकर बद्दल काही सापडेल म्हणुन पाहिले पण विशेष काही सापडले नाही.
मला वाटते मकर राशीचे लोक जास्त नेट वर वावरत नाहीत वाटते.