सांगायला बरे वाटतेय की आपले काही सदस्य मिळुन एक नवचित्रपट काढत आहेत. नव्या टेक्नीक नुसार या चित्रपटात प्रेक्षकाना कथेत हवा तो हवा तसा तसा बदल करण्याची सोय असेल. लव्ह ष्टोरी/ शादी / ताटातुट / व्हीलन / हीरो ला चॅलेन्ज / पोलीस/ चोर / तस्करी / लैच लाथाबुक्याने / तलवारीने / सायकल च्या चेन ने / बंदुकानी हाणामारी काय वाट्टेल ते लिहु शकता. थेटरात पिक्चर दिसताना *ज्याला जसा हवा तसा एकाच वेळेस दिसेल अशी सोय ह्या नव्या टेक्नीक मधे आहे (*ही आयडीया : मिपा कुटुंबीयांकडुन पेटंटेड)
तुम्ही यात भर घालु शकता / काटछाट करु शकता.
तर मग वाट कशाची पहाताय ? करा सुरु
चित्रपटाचे नाव आहे.
"एक होता पोल्ट्रीयात्री"
आन एक व्हती कोंबडी ....
आन मंग गाने जोरदार ट्राली षॉटवर....
कोंबडी पळाली
तंगडी धरुन
लंगडी घालायला लागली.
आन हे गाणे ऐकुन उत्तर म्हणुन डॉन्या पण गाईल
कोंबडी पळाली
तंगडी धरुन
तीला पकडली
तंदुर करुन हाणली
.........बघा नुस्ते नाव सुचवायचा अवकाश... गाणी तयार आहेत.
इनोबाने पोस्टर करायला घेतले आहे
हिरवीणीचे ज्याने त्याने आपापले बगायचे( ज्याने त्याने आपली हीरवीण स्वतःच आणावी असा बोर्ड लावलाय बघ संभाजी बागेत)
टीप: प्रेक्षकानी कथेत भर घालावी . कथेत योग्य भर घातल्यास कोणताही करमणुक कर/ चार्ज प्रेक्षकाना लावला जाणार नाही
प्रतिक्रिया
5 Jun 2008 - 6:58 pm | विजुभाऊ
अरे हो लिहायला विसरलो
चित्रपटात कंदील लाउन प्रकाश योजना असणार आहे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
6 Jun 2008 - 9:41 am | आनंदयात्री
पोल्ट्रीयात्रीच्या पोल्ट्रीत एकदा मोठा पेच निर्माण होतो, त्याचा अंडे विकायचा धंदा एकदम डाउन होतो. का म्हणुन तो कारण शोधायला लागतो. सगळ्या डिलर्स ला जाउन भेटतो, कर्मचार्यांना भेटतो. मग त्याला उमगते की आपल्या पोल्ट्रीतली अंडी पोक्कळ निघतात म्हणुन धंदा बसलाय.
मग तो प्रचंड मोठी मोहिम राबवतो हे शोधायला की आपल्या कोंबड्यांना असा कोणता रोग झाला की ज्यामुळे अंडी पोक्कळ निघायला लागलीत ? १०-२० व्हेटरनरी डाक्टरांचा थवा अविरत भिडलेला असतो त्यासाठी. काहिच सापडत नाही.
तो कंटाळतो, वैतागतो, हताश होतो अन सरतशेवटी डॉन नामक एका भाई ला शरण जातो. मग त्याला टिप मिळते की विजाभाई नामक एका त्याच्या रायव्हल ने कुटुंबनियोजन अधिकार्यांना(कंडोम वाटणार्या) पैसे खाउ घालुन त्याच्या पोल्ट्रीत त्यांची विजिट रोज संध्याकाळी ऍरेंज केलेली असते. त्या कुटुंबनियोजन अधिकार्यांचा अन विजाभाईचा बंदोबस्त करुन पोल्ट्रीयात्री निर्धास्त होतो.
=)) =)) =))
5 Jun 2008 - 7:33 pm | छोटा डॉन
>>अन सरतशेवटी डॉन नामक एका भाई ला शरण जातो. मग त्याला टिप मिळते की विजाभाई नामक एका त्याच्या रायव्हल ने कुटुंबनियोजन अधिकार्यांना पैसे खाउ घालुन त्याच्या पोल्ट्रीत त्यांची विजिट रोज संध्याकाळी ऍरेंज केलेली असते.
लै भारी ...
टेन्शन नको हां भाय, आपल्याकडे लै उपाय हायतं ...
तात्पुरता उपाय म्हणून सगळ्या कोंबड्यांना सकाळ-सकाळ योगासन करायला लाव, आहार हा "सात्विक " हवा, मी लवकरच "रेसीपी" पाठवतो. त्यासाठी सगळ्या "सुगरणतायांना" संशोधनाला लावले आहे ...
पाणी मात्र "पवित्र गंगाजल" वापर ....
सध्याच्या वापरातल्या "डबक्याचा" उपयोग "गळ किंवा नांगर" टाकून बसण्यासाठी कर ...
"राजें" कडून "टिप" मिळाली आहे, भविष्यात "शाकाहारी कोंबड्यांना व त्यांच्या अंड्यांना" चांगली मागणी येण्याची चिन्हे आहेत.
>>आपल्या पोल्ट्रीतली अंडी पोक्कळ निघतात म्हणुन धंदा बसलाय
हां, म्हणजे थोडक्यात हे "मिस्ड कॉल" प्रकरण आहे.
लक्ष ठेवावे लागेल. भविष्यात मोठ्ठे नुकसान संभवते ....
ये विजाभाई का नाम आजकल बहुत सुननेका पड रहा है, कहासे है ये पंटर ?
ह्याचा "मोदी नामक मोटाभाई" बरोबर सेटिंग आहे ऐसा ऐक्या है, फिर तो लफडा हुवा ना ...
टायरवाला भाई - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
5 Jun 2008 - 8:16 pm | llपुण्याचे पेशवेll
पोल्टीयात्री पोकळ अंड्यांचा विचार करत असता तिकडून तात्या येतो. आणि विचारतो
"कसला विचार करतो आहेस पोल्ट्रय्या".
पोल्टीयात्री: "घरात आणि विकायला कोणती अंडी पाठवावी?"
तात्या: " घरची पोल्ट्री असताना तुला का रे अंड्यांची चिंता? त्या धमाल्याने तुझ्या सर्व कोंबड्या तर पळवल्या नाहीत ना?"
पोल्टीयात्री: " अरे नाही रे. आज काल कोंबड्या पोकळ अंडी देऊ लागल्या आहेत"
तात्या: "तू इनो घालतोस का कोंबड्याना?"
पोल्टीयात्री: "हो. पण तुला कसे कळले."
तात्या: "हा हा हा. अरे साधे आहे म्हणूनच कोंबड्यांची नुसती पोटंच नाही तर आतली अंडी पण साफ होतात.अरे आजकाल इनोचा खप वाढल्याची बातमी आहे. आणि हे नवीन इनो पोट जरा जास्तच साफ करते."
पोल्टीयात्री: "तरीच. आजपासून कोंबड्याना इनो घालणे बंद. बंद म्हणजे बंद "
अशाप्रकारे पोल्टीयात्रीने कोंबड्याना(माद्या) इनो घालणे बंद केले आणि कोंबड्या परत पहील्यासारखी भरदार अंडी देऊ लागल्या. आणि लोकांनीही कोंबड्यांच्या(नर) क्षमतेवर संशय घेणे सोडून दिले.
डीस्क्लेमरः वरील कथानकातील सर्व पात्रे, घटना काल्पनिक आहेत. त्यातील कशाचाही वास्तविक जीवनाशी संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा.
पुण्याचे पेशवे
5 Jun 2008 - 8:49 pm | वरदा
मग पोल्ट्रीयात्री ने मिपावरुन सर्व सुग्रणींना कोंबड्यांसाठी उत्तमोत्तम रेसिपीज शोधुन द्यायला सांगितल्या....
वरदाची स्वयपाकातली गती यथातथाच पण तिने ठरवलं यावेळी आपण एक रेसिपी शोधून काढायचीच...
तिची रेसिपी...
घरात आणलेली सगळे धान्य निवडताना खाली गोळा झालेला कचरा फेकू नका...सगळा कोंबड्यांना खाऊ घाला...फुकट आणि होल ग्रेन्सची रेसिपी..करायला सोपी....पटकन होते आणि पौष्टीक असते....
मग सगळ्या तायांनी तिला अनुमोदन दिलं. पि.डा. काकूंनी स्पेश्शल निरोप पाठवला काकांबरोबर ' कित्ती सह्ही रेसिपी गं धान्य निवडायची कशी हे माहीतच नव्हतं आम्हाला'
बाकीच्या तायांच्या आणि पेठकर काकांच्या रेसिपीज होत्या त्या अशा....
क्रमशः.....(झालं की नाही पर्फेक्ट विजुभाऊ ष्टाईल)
6 Jun 2008 - 5:43 am | विसोबा खेचर
:)
6 Jun 2008 - 9:57 am | विजुभाऊ
ए लेको चांगले पिक्चर बघायचे सोडुन तुमी "आमची माती आमची माणसे " आणि "अन्नदाता " कार्यक्रम लिहित सुटला आहात.
अजुन दोनतीन छान गाणी टाका ना राव(!)
हे घ्या एक गाणे
जवा जुनाच पोपट हा
लागला ईनो ईनो बोलायला
गोष्ट निघाली चांगलीच खाष्ट
पोपट म्हणतो मैनाच फाष्ट
सांगुन सांगुन थकला हा पोपट
लागला डोलायला......
जवा जुनाच पोपट हा
लागला ईनो ईनो बोलायला
आता तिकडुन हिरवीण येत्ये आन म्हन्त्ये कशी
काय च्या काय...तू हिकडं बसलायस व्हयरं
आन म्या सम्दं गाव धुंडाळून आल्ये की रे...
मंग हीरो म्हंतो कसा
सम्दे गाव धुंडाळुन आलीस पर
पर माझ्या साठी नौकरी बघायची सुचलं न्हाय तुला
तुजा बापुस मला म्हंतो की या हिकडे यायचे तर पोल्ट्रीत प्रॉडक्षन वाढव
आता हे म्या कसं सांगु त्याना.
( हा आत्ता आठवलं आपल्या लक्ष्या वर चित्रित केलेलं एक गानं हाय " कोंबड्यानो अंडी द्या नायतर खुराडं सोडा" )
काय राव कै च्या कै.......जर्रा चांगला प्लॉट लिवा की........
लै छन्ना छन्नी हानामारी ठाकुर सरपंच पाटील असलं कायतरी लिवा.
कथासुत्र तुमच्या हाता दिल्यालं हाय त्याचा गुत्ता ( सूद्ध मर्हाटीत गुंता गैरसमज नकु) करु नका.
कता फुडं जाऊ द्या रं बिगीबिगी......
काटी न घोंगडं घिउद्या की रं
मला बी पिक्चर पाहु द्या की.
:::::::: पिक्चर पाहनारं ईजुभौ...
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
6 Jun 2008 - 2:59 pm | विजुभाऊ
हीरो ला नोकरी मिळते
रोज कोंबड्याना गाडीतुन फिरवुन आणण्याची.
ह्या इथे हीरो आनि हीरवीणीचे स्वित्झर्लंड ला गाणे( हीरोला नोकरी नसते मग स्वित्झर्लंडचे तिकिट कोण देते हे विचारु नका. तो ऑन साईट असाइनमेटवर गेलाय)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
6 Jun 2008 - 3:22 pm | ऋचा
मग तिकडे हिरो गाणं गात आणि नाचत असताना एक कोंबडी पळून जाते.
मग हिरोला जेव्हा कळते कि १ कोंबडी गायब आहे तेव्हा तो खाडकन "जमिनीवर" येतो.
आणि स्वित्झर्लंड च्या रस्त्यांवर फिरत सर्वांना विचारत असतो--
"कोणी कोंबडी पाहिली का कोंबडी??"
असाच तो भटकत बसतो.
(क्रमशः)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
6 Jun 2008 - 6:45 pm | वरदा
ती कोंबडी पळून जाते हिरॉइनच्या घरी तिचा बाप अनायसे आलेली कोंबडी पाहून खूष होतो...लगेच त्याच्या शेफ ला सांगतो आज चिकन तंदुरी कर्..इथे हिरॉईन त्या कोंबडीला ओळखते आणि तिला वाचवायचे प्रयत्न करायला लागते.....
पुढं काही म्हणून सुचत नाही बगा..... ~X(
6 Jun 2008 - 8:35 pm | झकासराव
हिरॉईन त्या कोंबडीला ओळखते आणि तिला वाचवायचे प्रयत्न करायला लागते.....>>>>>>>.
वरदा कथा अशी चटकन पुढे नेली तर केकता बाई लेखिकेचा फाउल धरतात बर. :)
हे बघ अस लिहाव.
त्या कोंबडीला पाहुन क्षणार्धात हिरॉइने तिला ओळखले.
(त्यावेळेच्या तिच्या चेहर्यावरचे हावभाव कमीत कमी साडेअडतीस वेळा वेगवेगळ्या कोनातुन दाखवावेत.
सोबत प्रत्येक वेळी वेगळाच धक्कादायक आवाज मागे असु द्यावा.
आणि लग्गेच एक ब्रेक घ्यावा. ;)
मग १०० एक जाहिरातीनंतर कॅमेरा तिच्या बापाच्या तोंडावर. त्याचय चेहर्यावर एकाच वेळी आश्चर्य, राग व शंका दाखवावी.
हे त्या हिऱोइनीच्या लक्षात येताच तिने समजुन न समजल्याचे नाटक करण्याचा प्रयत्न करावा.
आणि सारवासारव करावी की नाही ही कोंबडी बघताच तिला बर्डफ्ल्यु ची आठवण झाली अस. (इथे चिकनगुनिया अस लिहिल तरी चालेल) त्या बिनडोक पोरीच्या बापाला आणि प्रेक्षकाना नावात चिकन असल्याने उलट जास्तच पटेल. :)
आता पुढे लिहा बॉ.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
6 Jun 2008 - 8:38 pm | वरदा
खूपच क काकिकी बघता की तुम्ही....अगदी बरोब्बर लिहिलय.....
पुढे ती कुठचं गाणं म्हणेल हो विजुभाऊ?
8 Jun 2008 - 6:59 pm | विजुभाऊ
झकासपाव तुमचे बरोबर आहे.
वरदा तै
हीरोईन आता गाणे म्हणते.
या कोम्बड्यानो ...परत फिरा रे पोल्ट्री कडे परतुन
तिन्ही सांजा जाहल्या....येइल आता अंधाराला पूर
जाऊ नका तुम्ही पोल्ट्री पासुन दूर.
या कोम्बड्यानो ...परत फिरा रे...
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत