चला चला चला
गाढव पहायला
माराच ओझ घेऊन
फुकटच राबतय
माणूस शोधतय ?
चला चला चला
पाहू गोगलगाईला
शिंग वर दाखवी
नि पोटात पाय -
माणसाचं काय !
चला चला चला
बैल बघायला
मानेवर जूं
नाही हूं की चूं
माणूस ना तू ?
चला चला चला
कुत्रा पाहू चला
शेपूट ते वाकडे
इमानदार किती
माणसाला भीती !
चला चला चला
सापाला पहायला
दूध पाजले तरी
सवय चावायची -
जात माणसाची !
चला चला चला
माणूस पाहू चला -
निघाले की सगळे !
घाई घाई करून
स्वत:लाच विसरून ?
प्रतिक्रिया
21 Nov 2011 - 5:49 pm | गणपा
हा हा हा.. मस्त आहे.
वर वर बालकाव्याचा बाज असलेलं मुक्त काव्य आवडले.