कौन बनेगा पंचमहामनी करोड़पती
कौन बनेगा करोडपतीची सांगता झाली आणि भारताच्या तरुणाईचे आशावादी चित्र भावले. उंची वस्त्र प्रावरणे आणि बटबटीत दागदागिन्यात मढवलेल्या व्यक्तिरेखांनी घडवलेल्या नीच, पाताळयंत्री कारवायांमुळे घरोघरी हेवेदावे करत सामान्य समाज जगत असतो असे आभासी चित्र एकीकडे बनत असताना कौन बनेगा करोडपतीने (कौ.ब.क.) सुखद धक्का दिला आहे.
कौबकच्या हॉटसीटमधे बसलेल्या व्यक्ती शहरी कमी, गावा-खेड्यातील अधिक होत्या. त्यांच्यावर तयार केलेल्या चित्रफितीतून ते प्रत्यक्षात कुठे, कसे राहातात-वागतात, याच दर्शन होत होते. उत्तरे देताना त्यांच्या शारीरिक हालचालीतून एक प्रकारचा ठामपणा जाणवत असे. एखादे उत्तर खात्रीने माहित नसेल तर त्यात दिलेल्या पर्यायातील कोणते पर्याय नक्की नसतील ते ठरवून चतुराईने ते मार्ग काढत. अनेकदा प्रेक्षककक्षातून दिल्या गेलेल्या योग्य उत्तरातून तेथे बसलेल्या आमंत्रिताना ती उत्तरे माहित असल्याचे चित्र दिसत होते. तज्ज्ञ व्यक्तींनी अचूक मार्गदर्शन करून अल्प काळात आपली छाप पाडली.
स्त्रियांच्या धीट सहभागातून त्यांनी संकोचीवृत्तीवर मात केली असल्याचे दिसत होते. मिळणाऱ्या पैशाचा विनियोग कसा करणार या हमखास प्रश्नाचे उत्तर देताना विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत मी इथवर आलोय आहे आता घरातील अन्य सदस्यांवर ती वेळ येऊ नये म्हणून त्यांच्यात आनंददायक प्रेरक परिवर्तन घडवण्यात मी हे धन वापरीन असे म्हणणारे अनेक जण होते. त्यातून त्यांनी अप्पलपोटेपणा न दर्शवता प्रगल्भ विचारीपणाचे दर्शन करवले. प्रथितयश कलाकारांनी मिळवलेले धन सामाजिक कार्याला देऊन आपली बांधिलकी प्रदर्शित केली.
या कार्यक्रमात उस्फूर्तपणा होता. संवाद पाठ करून म्हटलेले नव्हते. सभाधीटपणा, उत्तरातील चतुराई, हिन्दीत त्या त्या प्रदेशातील बोलीचा गोडवा प्रेक्षकांना बांधून ठेवायला कारणीभूत झाला होता.
या सर्वांला पार्श्वभूमी होती अमिताभ बच्चन यांची. त्यांच्या प्रत्येक कृती, वर्तन, संभाषणतून आदर्श व्यक्तिमत्व कसे असते - असावे, याचा वस्तुपाठ मिळत होता. त्यांच्या मुखातून हिंदीभाषा गौरवान्वित झाली.
कौबक शेवटी टीव्हीशो असल्याने उत्कंठा वर्धनासाठी प्रकाश-ध्वनी योजनांचे प्रयोजन उचित वाटले. आता या कार्यक्रमाचा पुढील भाग भारतीयांना असाच प्रेरणादायी होईल अशी आशा वाटते.
प्रतिक्रिया
18 Nov 2011 - 4:02 pm | अन्या दातार
अगदी मनातले लिहिलेत ओकसाहेब. :)
>>या सर्वांला पार्श्वभूमी होती अमिताभ बच्चन यांची. त्यांच्या प्रत्येक कृती, वर्तन, संभाषणतून आदर्श व्यक्तिमत्व कसे असते - असावे, याचा वस्तुपाठ मिळत होता. त्यांच्या मुखातून हिंदीभाषा गौरवान्वित झाली.
साधेपणा, विनम्रता यासाठी अगदी आवर्जुन 'बिग बी'ला मानले पाहिजे.
18 Nov 2011 - 7:13 pm | छोटा डॉन
सहमत आहे ...
- (अगदी रेग्युलर नसले तरी आवडीने केबीसी पाहणारा) छोटा डॉन
25 Nov 2011 - 10:47 am | llपुण्याचे पेशवेll
शाहरुखखान आणि अन्य सेलेब्रिटी सामिल असलेले कौबक मात्र खोटे खोटेच वाटत होते.
18 Nov 2011 - 4:06 pm | शशिकांत ओक
अनिलजी.
18 Nov 2011 - 6:25 pm | अशोक पतिल
पुर्ण पणे सहमत, ओक साहेब !
18 Nov 2011 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> आता या कार्यक्रमाचा पुढील भाग भारतीयांना असाच प्रेरणादायी होईल अशी आशा वाटते.
आता कंटाळा आला राव केबीसीचा. आता नको.
बाकी, आपल्या विचारांशी सहमत.
-दिलीप बिरुटे
18 Nov 2011 - 6:40 pm | तिमा
यावेळचा केबीसी नक्कीच वेगळा आणि चांगला कार्यक्रम होता. समाजातल्या सामान्य स्तरातल्या स्पर्धकांना बोलावले हे आवडले.
18 Nov 2011 - 7:03 pm | गणपा
नक्की काय वेगळा होता हे जाणुन घ्यायला आवडेल.
केवळ संयोजक म्हणातात म्हणुन आपण पण म्हणायचं का की हा कार्यक्रम 'आम' जनतेचा होता.
जर या वेळचा आम जनतेसाठी होता तर या आधीचे केबीसी काय फक्त श्रीमंत लोकांसाठीच होते?
उगा खुळचटपणा.
बाकी ओक काकांच्या भावनेशी सहमत.
अमिताभचा डाय हार्ड फॅन नसलो तरी त्याच्या तो घनगंभीर आवाज आणि विनयशील बोलंण आवडत.
18 Nov 2011 - 6:45 pm | नावातकायआहे
मै जानता हुं ये पैसे आपके लिये क्या मायने रखते है!
क्या करोगे इन पैसोंका?
तुला काय घेण आहे?
तुझ्या खिश्यातले देतोयस का? आयला...
सुरवातिचे काही भाग बघितले नंतर विट आला.
केबिसी हा खेळ न रहाता अडल्या नडल्यांच्या भावनांशी खेळणार 'पैसे वाटप केंद्र' झाल होत.
बर झाल संपल...
18 Nov 2011 - 8:11 pm | lakhu risbud
सगळी TRP ची गणित आहेत.पाहिल्या पर्वात काही अपवाद वगळता सगळे शहरी भागातील लोक होते.आता या पर्वात ग्रामीण मागासलेल्या भागातील.पहिल्या KBC च्या वेळी या लोकंनी फोन करण्याचे प्रयत्न केले नसतील का ?
दुसऱ्याची गरिबी दाखवून स्वतःचा गल्ला भरायची कामं.बच्चन साहेबांना मग कळवळा आला की सेट वर एखाद्या गरीब विधवेला १-२ लाखाचा धनादेश दिला की संपली यांची सामाजिक जबाबदारी.नंतर आहेच मग गल्ला भरायची कामं. अशी निव्वळ भंपक आणि खोटी स्वप्नं किती दिवस विकणार त्या गरीब लोकांना,पैसा कमवताना त्यांच्या मदतीसाठी काहीतरी काहीतरी ठोस कार्यक्रम हाती घेतला तर बच्चन साहेबांचा आदर एक व्यक्ती म्हणून कितीतरी पटीने वाढेल.
19 Nov 2011 - 2:24 pm | अन्या दातार
एकतर अमिताभ बच्चनच्या सूत्रसंचालनाबद्दल चर्चा/कौतुक चालले होते.
दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक जबाबदारी म्हणून कुणालाही १-२ लाखाचा चेक देण्यात आला नाही. जे काही चेक दिले गेले ते प्रश्नांची उत्तरे देऊन मिळणार्या बक्षिसरकमेइतकेच होते.
तिसरा मुद्दा: केबीसी/बच्चन यांपैकी कुणीही "बघा किती गरिब लोक आहेत आणि टाका पैसे" किंवा "गरिब लोकांना केबीसीने कशी मदत केली ते बघा" अशी जाहिरात केलेली नाही. त्यामुळे "दुसऱ्याची गरिबी दाखवून स्वतःचा गल्ला भरायची कामं" या विधानाला काहीच अर्थ राहत नाही.
>>अशी निव्वळ भंपक आणि खोटी स्वप्नं किती दिवस विकणार त्या गरीब लोकांना
हे वाक्य काही झेपले नाही, त्यामुळे माझा पास. :)
24 Nov 2011 - 6:04 pm | शशिकांत ओक
अनिल,
आपला प्रतिसाद योग्य. तरीही वरील धागा फक्त अमिताभजींच्या व्यक्तिमत्वावर किंवा संभाषणपटुत्वावर आधारित नव्हता. व्यक्तिशः ते कोणाला आवडतात किंवा नाही याचा धाग्य़ातील कथनाशी संबंध नाही. एकंदरीत त्या कार्यक्रमातून दिसलेले ग्रामीण तरुणाईचे विचार आणि आत्मविश्वास यावर मला भावलेले ते एक शब्द चित्र होते. असो.
सहज आठवले की त्या कार्यक्रमात एक हरियाणा- कर्नालच्या खुशालचेंडू विदुषींनी भाग घेताना सांगितले की मला कामाचा अत्यंत तिटकारा आहे. माझे पती वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत म्हणून प्रत्येक कामाला सरकारी नोकर ठेवलेले आहेत. मला शॉपिंगचा फार शौक आहे या इथे मिळणारी रक्कम तर मी माझ्यावर उडवणार आहे. मी क्लासेस घेते पण त्यातील रक्कम मी माझ्यावर उडवते शिवाय पतीच्या पगारातून त्यांचेही पैसे उडवायला मला कमी पडतात. एकदा शॉपिंगला निघाले की पर्स मोकळी झाल्याशिवाय मी परतत नाही.
एका दोरीच्या झोपाळ्यावर मस्त झोके खात त्याना रिकामटेकडेपणाची मस्ती एनजॉय करताना त्याच्यावरील फिल्म मधे दाखवल्याने त्यांची मजा मारायची जिंदगीपाहून त्याच्या पतिराजांना विचारले गेले कि कसे काय तुम्हाला परवडते. काय करू, तिचा शौक आहे. पुढे ते म्हणाले, ते सोडा. शॉपिंगला ती गाडीतून जाते. पण कार पार्किंग करायला तिला कंटाळा म्हणून तेथेच ती दुकानासमोरच गाडी पार्क करते. भले त्याच्यामुळे इतर वाहनांना व चालणाऱ्यांना कितीही का त्रास होईना. त्या भागाच्या कार्यक्रमात अमितजींसकट सर्व दर्शकांना एका अजब नमुन्याचे दर्शन झाल्याचे भाव होते.
19 Nov 2011 - 12:39 pm | रणजित चितळे
नमस्कार आपल्याला. केबिसी आवडला बच्चन साहेबांनी छान सुत्रसंचालन केले.
19 Nov 2011 - 1:22 pm | सचिन
टी आर पी ची गणिते काहीही असोत....कार्यक्रम आपल्याला जाम आवडला, आणि आवडतच राहील.
पूर्ण कुटुम्बासहित पहाण्याजोगे किती कार्यक्रम असतात हल्ली ??
19 Nov 2011 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार
केबीसी मुर्ख आहे आणि केबीसीला नावं ठेवणारे महामुर्ख आहेत, केबीसी आवडणारे अतिमुर्ख.
संपला विषय.
शतमुर्ख
परा
20 Nov 2011 - 7:19 pm | स्मिता.
केबीसी मुर्ख आहे आणि केबीसीला नावं ठेवणारे महामुर्ख आहेत, केबीसी आवडणारे अतिमुर्ख.
आमच्यासारखे लोक, ज्यांनी केबीसी पाहिलंच नाही, ते सगळे शहाणे (दीड नव्हे!) म्हणावे का?
19 Nov 2011 - 2:35 pm | विनायक प्रभू
हे सर्व वाचणारा मी अनंत मुर्ख
19 Nov 2011 - 4:46 pm | श्रावण मोडक
सहमत.
म्हणजे, मास्तर अनंत मूर्ख आहेत, असे विधान करत नाहीये मी. मीही अनंत मूर्ख आहे, असं मला म्हणायचं आहे.
19 Nov 2011 - 3:01 pm | आत्मशून्य
शशिकांतजी सूरेख, अशाच आशयघन, कडक, लज्जतदार, तरतरीत , रसरशीत मूसमूसलेल्या उत्साहवर्धक धाग्यांची लेखमाला आपल्याकडून अपेक्षीत आहे. धन्यवाद.
19 Nov 2011 - 4:04 pm | मृगनयनी
शशिकान्त'जी... छान लेख! आज म.टा. ला देखील आपला हा लेख वाचला.
मी 'केबीसी' रेग्युलरली नाही पण बर्यापैकी बघते... अमिताभ अजूनही आवडतो..
आपला वेगळ्या विषयावरील लेख वाचुन बरे वाटले... :)
19 Nov 2011 - 10:21 pm | आनंदी गोपाळ
म्हंजे हे ओक साहेब मटा मधे लिहितात??
वॉव!
=))