मिठीत कळी उमलली
राया तुम्ही प्रेमाची फुलबाग केली
तुमच्या मिठीत कळी उमलली
वाट कितीक पाहीली थकलं डोळं
आज उशीरा का येनं केलं?
रुजूवात कराया मोहोर उठवा गाली
तुमच्या मिठीत कळी उमलली
सजवून माझी काया नखरा केला
जवळ घेता तुम्ही गोड गुन्हा झाला
नजरेचा तिर मारता अंगी वीज चमकली
तुमच्या मिठीत कळी उमलली
कमरपट्टा उगा मला का रुतू लागला?
शालू अवजड झाला आज का अंगाला?
चोळी ऐन्याची नको तिथं उसवली
तुमच्या मिठीत कळी उमलली
- पाषाणभेद
१६/११/२०११
प्रतिक्रिया
17 Nov 2011 - 4:51 pm | मदनबाण
वाह वा... वाह वा... ;)
(शॄंगार प्रेमी) ;)
17 Nov 2011 - 5:34 pm | आत्मशून्य
.
18 Nov 2011 - 10:39 am | मिसळलेला काव्यप्रेमी
लावणी आणि कविता यामध्ये कुठेतरी आहे हि रचना!
आवडली.
18 Nov 2011 - 11:59 am | डावखुरा
तुमच्या मिठीत कळी उमलली......गुदगुल्या...
18 Nov 2011 - 1:10 pm | अत्रुप्त आत्मा
कमरपट्टा उगा मला का रुतू लागला?
शालू अवजड झाला आज का अंगाला?
चोळी ऐन्याची नको तिथं उसवली
तुमच्या मिठीत कळी उमलली..... हा....SSSSS थंडी वाढली हो शाहीर...आंग बेचैन झालं की वो... येकदम रोमेंटीक ल्हिलसा की राव :LOVE: