प्रेम
तो
रस्त्यावर तो फिरत होता,
त्याचे कपडे फाटके होते.
कोट उसवलेला होता आणि
त्याला ठिगळे होती.
त्याच्या उसवलेल्या बुटातून
पाणी ठिबकत होते,
तो म्हणाला, 'होतो.'
मी विचारले,'प्रेमात?'
'नाही'. तो म्हणाला. 'आयटीत'.
अडाणी.
तुम्ही जर चांगली पुस्तके वाचत नसाल,
तर अभिनंदन.
तुम्ही बहुमतात आहात.
तुम्ही जर वाचतच नसाल,
तर, वेल,
मला तुमचा हेवा वाटतो.
दिशाहीन
कुठे जायचे हे ठरले नसेल तर
प्रत्येक रस्ता हा आपलाच आहे
शेवटी
प्रत्येक रस्यावर कुठे ना कुठे बार असतोच.
श्रीमंत
निसर्ग आणि स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर
तुम्हाला जगता येणे अवघड आहे.
जगाच्या मतांप्रमाणे चालत राहिलात तर मात्र
तुम्ही आता जसे जगता तसेच जगत राहाल.
दिनचर्या.
सकाळी प्रयत्न कर
दुपारी पुन्हा प्रयत्न कर
संध्याकाळी चांगल चुंगलं जेव
रात्री इसबगोल घे
दुसर्या दिवशी सकाळी तरी होईलच.
खलाशी
दिवस लहान होते आणि रात्री मोठ्या होत्या.
सूर्यप्रकाश जवळ्जवळ नव्हताच.
बोटीवरच्या केबीन्समधे
वातावरण उदासवाणे होते.
हिवाळ्यात हे असे असतेच.
त्यात विशेष ते काय?
प्रेम
जास्त अंदाज, तर्क,
कमी प्रेम !
जास्त प्रेम,
संशय, निव्वळ संशय!
घर
ज्यात तुम्ही रहाता
त्याला तुमचे घर म्हणता येतेच असे नाही.
कधी कधी तुम्ही
भाड्याच्या घरात राहात असता.
नष्टचर्य.
मुले आणि संशोधन यांच्यात विलक्षण साम्य आहे.
दोन्हीत तुम्ही गुंतवणूक करता. पुढे काय होणार याची तुम्हाला कल्पना नसते,
आणि ते तुम्ही सांगूही शकत नाही.
काही कारणांमुळे तुम्ही दोन्हीही बंद करू शकता.
(असे तुम्हाला वाटते)
संशोधन फसले की
तुमचा धंदा बंद होऊ शकतो
मुलांचे बंद करणे फसले
की थोरलीच्या लग्नात धाकटा पाचवीला असतो.
मित्र.
माणसाच्या आयुष्याचे चांगले आणि वाईत असे दोन भाग केले तर -
चांगला भाग चांगला आणि वाईत भाग वाईत असतो.
किंवा
वाईत भाग वाईत आणि चांगला भाग वाईबाहेर असतो.
यश
जर तुम्हाला एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल
किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचे स्वप्न बघत असाल तर त्या दिशेने लगेच पाऊल टाका.
संध्याकाळपर्यंत थांबू नका
संध्याकाळी तुम्हाला पाहिजे त्यी दिशेलाच तुमचे पाऊल पडेल,
याची हल्ली खात्री नसते.
प्रतिक्रिया
15 Nov 2011 - 6:08 am | पाषाणभेद
मलाही आवडलेली काही वाक्ये आहेत ही
15 Nov 2011 - 7:44 am | जयंत कुलकर्णी
//चांगला भाग वाईबाहेर असत//
सांभाळा वाईकर रागवतील. :-)
असो स्वसंपादनाची सुविधा नसल्यामुळे संपादकांना विनंती की वाइत चे त्यांनी वाईट करावे. ( चिंतू नये) :-)
15 Nov 2011 - 10:29 am | मी-सौरभ
हे बघा लोक काय म्हंतात वाईबद्दल
15 Nov 2011 - 11:32 pm | वाहीदा
कॉलींग रेवती ताई ... कॉलींग रेवती ताई ..
असो,
आमच्या 'वाई' त काही वाईट नाहीच आहे मुळी !
एकदा जाऊन या मग कळेल ..
पण, संजोपरावांचे विडंबन एकदम झकास :-)
~ (अभिमानी वाईकर) वाहीदा
16 Nov 2011 - 3:11 pm | प्यारे१
ओ आपा, हम भी हय ना वाई के.... आप जो बोले एक्दम करेक्ट बोले..
ये रेवतीक्का वाईची हाय काय???? ;)
16 Nov 2011 - 3:58 pm | वाहीदा
म्हणून तर तिला बोलावले ... आपला पण कंपू आहे ! ;-)
16 Nov 2011 - 7:02 pm | रेवती
आधी पुण्यावर फोकस होता आता वाईवर गेलाय याचा आम्हाला आनंदच आहे. ;) सगळी गावे थोडी थोडी प्रकाशझोतात राहिली पाहिजेत. वाईला कुणी काही म्हटलं तरी मला आठवतं ते ढोल्या गणपतीचं दर्शन घेऊन घाटावर फिरणं. कृष्णामाईच्या उत्सवातला प्रसाद.
विडंबन मनोरंजक झाले आहे.
16 Nov 2011 - 7:04 pm | रेवती
तशी पुणेकर आहे पण वाईला दोन वर्षे राहिले आणि या गावानं केलेली जादू अजून तशीच आहे.
15 Nov 2011 - 7:49 am | पैसा
मूळ धाग्याच्या आधी विडंबन वाचलं, ते आवडलं. मग मूळ धागा वाचला आणि परत विडंबन वाचलं, मग आणखी आवडलं!!!
15 Nov 2011 - 5:44 pm | राजेश घासकडवी
वाक्यं आवडली. स्वप्नाची वातूळ हवा भरल्यावर मस्त सोडा पिऊन करपट ढेकर काढल्यावर बरं वाटतं तसं वाटवणारी.
हिवाळ्यात हे असंच होतं... आणि कधी कधी ते भाड्याचं घर असतं वगैरे छान.
15 Nov 2011 - 8:21 am | ५० फक्त
मस्त मस्त मस्त, मुळ धाग्यातल्या वाक्यांपेक्षा जास्त वास्तववादी वाक्यं.
15 Nov 2011 - 8:28 am | मराठी_माणूस
मस्त
15 Nov 2011 - 8:36 am | रामदास
कुठे जायचे हे ठरले नसेल तर
प्रत्येक रस्ता हा आपलाच आहे
शेवटी
प्रत्येक रस्यावर कुठे ना कुठे बार असतोच.
हे पटले आहे.
15 Nov 2011 - 9:28 am | ऋषिकेश
ठ्ठो!!!!!
रावसाहेब.. _/\_
मस्त
15 Nov 2011 - 10:10 am | प्रभाकर पेठकर
मुळ कवितांपेक्षा विडंबनच भावले.
(ज्या पोटतिडिकेने केले आहे त्या भावनेशी सहमत)
15 Nov 2011 - 11:05 am | मी ऋचा
एक्क नम्बर!!
15 Nov 2011 - 11:20 am | विसुनाना
मूळ वाक्ये गुलाबाची पण प्लास्टिकची फुले वाटली.
विडंबनातली वाक्ये धोतर्याची पण खरीखुरी फुले वाटली.
- हे विडंबन सर्वाधिक आवडले. ('भाड्या'वरील स्लेष)
15 Nov 2011 - 11:49 am | श्रावण मोडक
सहमत.
15 Nov 2011 - 1:38 pm | दादा कोंडके
कदाचित अनुवादित आहेत म्हणुनही तसं वाटत असेल.
मूळ क्वोट्स ची मजा आनुवादात नाही.
अवांतरः एका जुन्या खाद्यपदार्थ विशेषांकात विविध देशातील रोचक म्हणींचा अनुवाद दिला होता,
एक काकडीबद्दचं वाक्य वाचलं होतं ते असं,
"एक काकडी घावी, तीचे छान काप करावेत,
त्यावर मग मस्त मीरपुड आणि विनेगर लावावी,
आणि मग ते सगळं फेकून द्यावं."
पण मूळ* वाक्यातली गंमत त्यात नव्हती असं वाटलं.
*"A cucumber should be well-sliced, dressed with pepper and vinegar, and then thrown out"
16 Nov 2011 - 4:09 pm | स्मिता.
मूळ वाक्ये गुलाबाची पण प्लास्टिकची फुले वाटली.
विडंबनातली वाक्ये धोतर्याची पण खरीखुरी फुले वाटली.
असेच म्हणते. विसुनानांचे शब्द अगदी चपखल बसलेत.
15 Nov 2011 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार
एकदम टकाटक.
वाक्य न वाक्य आवडेश.
15 Nov 2011 - 11:46 am | अन्या दातार
__/\__ __/\__ __/\__
कमाल आहे तुमची.
15 Nov 2011 - 11:52 am | सूड
मान गये !!
15 Nov 2011 - 1:52 pm | मोहनराव
दे दणादण!!
मस्तच!!
15 Nov 2011 - 4:19 pm | जव्हेरगंज
भारीच आहे..
15 Nov 2011 - 4:20 pm | जव्हेरगंज
भारीच आहे..
15 Nov 2011 - 5:18 pm | वेताळ
मुलांचे बंद करणे फसले
की थोरलीच्या लग्नात धाकटा पाचवीला असतो
संध्याकाळी तुम्हाला पाहिजे त्यी दिशेलाच तुमचे पाऊल पडेल,
याची हल्ली खात्री नसते.
एकदम सही......आवडले.
15 Nov 2011 - 6:12 pm | जयवी
कमाल :)
16 Nov 2011 - 2:43 pm | समीरसूर
एक नंबर!!!
कल्पनाशक्तीला मनापासून सलाम!!
--समीर
16 Nov 2011 - 3:30 pm | स्वानन्द
आई शप्पथ!!! हहपुवा!!
16 Nov 2011 - 7:34 pm | मी-सौरभ
सगळे षटकार मारताना हा डॉट बॉल का???
>>>मित्र.
माणसाच्या आयुष्याचे चांगले आणि वाईत असे दोन भाग केले तर -
चांगला भाग चांगला आणि वाईत भाग वाईत असतो.
किंवा
वाईत भाग वाईत आणि चांगला भाग वाईबाहेर असतो.
बाकी ह ह पु वा झाली हे वे सां न ल
17 Nov 2011 - 5:59 pm | वपाडाव
माणसाच्या जेवणात चांगले अन वाइट असे दोन भात केले तर.....
चांगला भात चांगला अन वाइट भात वाइट असतो....
किंवा चांगला भात आत अन वाइट भात बाहेर असतो....
17 Nov 2011 - 7:49 pm | मी-सौरभ
भा हा री ही
17 Nov 2011 - 8:16 pm | रेवती
काही रितभात आहे की नाही?