सोन्याचा मुकुट
हिऱ्यांचा हार
सोन्याच्या पादुका
रत्नजडित सिंहासन
सोन्याचे मखर
सर्वांच्या डोळ्यांत ठसले
त्या
सोनेरी धामधुमीपासून
दूर - - - -
कोपऱ्यातल्या
एका गरीबाच्या
मिटलेल्या डोळ्यांतून
ओघळणारे ... मोती ...
फक्त साईलाच दिसले ;
आणि
(सोन्यापेक्षा सामान्यांवर
माया जडलेले -)
साई
उदासपणे स्वत:शीच हसले !
प्रतिक्रिया
12 Nov 2011 - 10:21 am | मिसळलेला काव्यप्रेमी
पाभेंची याच विषयावरील रचना इतक्यात वाचली.
तुम्ही दोघे ठरवून लिहीता काय? ;)
हिरे-माणीक, सोन्या-मोत्यांपलीकडले साई बघणे सगळ्यांना जमतेच असे नाही.
कवीला हि विसंगती बोचली नाही तरच नवल!!
12 Nov 2011 - 10:02 pm | पैसा
साईना सोन्याचे मुकुट घालणारे एवढा विचार कुठे करतात हो?
13 Nov 2011 - 11:58 pm | अभिजीत राजवाडे
कवितेचा विचार भावला. अचुक निरिक्षण.
14 Nov 2011 - 12:44 am | पाषाणभेद
छान कविता आहे. भावनांशी सहमत.