देवळातला देव भिकारी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
12 Nov 2011 - 2:51 am

देवळातला देव भिकारी

नकाच मजला अर्पू कोणी
गंध, अक्षदा, फुले, माळा
नका मजला शेंदूर फासू
नकाच द्या कळसा झळाळा

कोण कोठला देव मज समजले
उगाच येवूनी रांगा लावूनी
पाया पडण्या, हार वाहण्या
व्यापार्‍याची वस्तू करूनी
देवळात मज कोंबले

व्यर्थ फुकाचा नमस्कार करता
अन्नछत्रात जेवूनी
भरल्या पोटी लाडू प्रसाद खाता
न लागणारे नोटा दागीने मुकूट सोनेरी
का मजला देता ?
पापपुण्याचा खोटा हिशेब मांडता?

नकाच मजला तेथे भेटू
चालू असते माझी मुशाफिरी
धनाचे नच लालूच मजला
वृत्ती माझी आहे फकीरी
देवळातला देव भिकारी

- पाषाणभेद
१२/११/२०११

कवितासमाज

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Nov 2011 - 10:18 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अगदी मनातले बोल्लात!!
आजकाल लोक सगळ्या मंदिरात मोठ्या मोठ्या रांगा लावतांना दिसतात.
कुठल्याही मंदिरात जाऊन शांतपणे बसू म्हटले तर आता ते शक्य नाही.
मंदिरात जी गोष्ट मिळवण्यासाठी जावे असे वाटते तीच गोष्ट हरवली आहे. मनःशांती!!!
सुंदर रचना!!

विदेश's picture

12 Nov 2011 - 11:50 am | विदेश

धनाची नच लालूच मजला
वृत्ती आहे माझी फकीरी -

काही जणांना हीच भावना 'बाबां' बद्दल वाटत असणार .
पण वास्तव फारच 'भीषण ' वाटत आहे !

स्वागत's picture

12 Nov 2011 - 8:09 pm | स्वागत

संदीप खरे यांच्या कवितेत सुधा हे भाव डोकवून जातात

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवत लाच, लावतो बोली
तो मूळात येतो इछा अर्पून साऱ्या
अन्‌ धन्यवाद देवाचे घेउन जातो

:- स्वागत
नवीन सभासद

सचिन's picture

13 Nov 2011 - 8:11 pm | सचिन

नकाच मजला तेथे भेटू
चालू असते माझी मुशाफिरी
धनाचे नच लालूच मजला
वृत्ती माझी आहे फकीरी
देवळातला देव भिकारी ..... हे अगदी खरय.

काही वर्षांपूर्वी चन्द्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या फेमस झाल्या होत्या...त्यातली एक आठवली.

देवळात गेले म्हणजे लोक दुकानातल्यासारखं करतात
चार आठ आणे टाकून काही ना काही मागतात