आपल्या लाडक्या लोकलला-
(चाल अरुण दाते यांनी गायलेले -येशील येशील येशील राणी , पहाटे पहाटे येशील )
------------------------------------------------------------------------------
येशील येशील येशील गाडी वेगात लवकर येशील?
तिकीट काढुन, वेगात पळुन खिडकीची जागा तू देशील !! येशील येशील येशील--
सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ!
तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु !
सर्वांना भिडुन, डब्यांना खेचुन मुक्कामी मला तु नेशील !! येशील येशील येशील--
मेल एक्स्र्पेस, लाल सिग्नल अडथळा ओव्हरहेडचा !अडथळा ओव्हरहेडचा !
गर्दीच्या क्षणाचे टायमिंग साधुन रांगेत असंख्य गाड्या !
कल्याण, सायन, दादरकरीत, व्हि टी ला मला तु नेशील !!येशील येशील येशील---
वाजता पाऊल घेई चाहुल स्टेशन वरचा टि. सी.
कुणा पकडेल, कुणाला सोडेल, मिळता सावज भारी !
मुक्याने व्यवहार झाकुन टाकता, नवीन सुरवात होईल!!
येशील येशील येशील गाडी वेगात लवकर येशील?
तिकीट काढुन, वेगात पळुन खिडकीची जागा तू देशील !!
प्रतिक्रिया
4 Jun 2008 - 11:51 am | विसोबा खेचर
वाजता पाऊल घेई चाहुल स्टेशन वरचा टि. सी.
कुणा पकडेल, कुणाला सोडेल, मिळता सावज भारी !
मुक्याने व्यवहार झाकुन टाकता, नवीन सुरवात होईल!!
मस्त! :)
आपला,
(लोकलट्रेनप्रेमी) तात्या.
4 Jun 2008 - 12:34 pm | फटू
एकदम मस्तच...
पुन्हा,
(एक वर्ष गोरेगाव ते चर्चगेट आणि एक वर्ष ठाणे ते छशिट प्रवासात धक्के दिलेला आणि खाल्लेला)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
4 Jun 2008 - 1:12 pm | पद्मश्री चित्रे
>>सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ!
तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु ..
मस्तच..
रोजचाच अनुभव असुन ही वाचायला आवडलं...
पहिल्याच पावसाच्या सरीने आजारी पडलेल्या म्.रे. ची प्रवासी
फुलवा
4 Jun 2008 - 1:15 pm | मनस्वी
छान आहे विडंबन.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
4 Jun 2008 - 6:37 pm | शितल
विड॑बन छान झाले आहे,
वाजता पाऊल घेई चाहुल स्टेशन वरचा टि. सी.
कुणा पकडेल, कुणाला सोडेल, मिळता सावज भारी !
मुक्याने व्यवहार झाकुन टाकता, नवीन सुरवात होईल!!
हे तर एकदम सह्ही.
4 Jun 2008 - 6:47 pm | वरदा
सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ!
तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु !
सर्वांना भिडुन, डब्यांना खेचुन मुक्कामी मला तु नेशील
खरं खरं पटलं
(८ वर्ष अंबरनाथ ते ठाणे, कुर्ला, व्हीटी, अंधेरी सगळ्या मुंबईच्या गाड्यात धक्के खाण्यात आणि देण्यात तरबेज)
वरदा
4 Jun 2008 - 7:00 pm | डोमकावळा
एकदम लोणावळा-पुणे लोकलनी गर्दाळ चुंबन (:-?) दिल्यासारखं वाटलं... ;;)
- चुंबनप्रेमी डोम
4 Jun 2008 - 11:56 pm | बेसनलाडू
मस्त विडंबन.मजा आली.
(लोकलप्रेमी)बेसनलाडू