उन्हाळ्याच्या सुट्टि निमित्त आज बर्याच वर्षानी आम्हि मित्रमंडळि एकत्र जमलो होतो... गप्पांचे भरपुर फड रंगुन झाल्यावर सगळेजण आता हळुहळु बोअर व्हायला लागले होते... आणि आता ऊन लागतय म्हणुन घरात बसणं आमच्यानि बा शक्य नव्हत... दुसर्या दिवशी सकाळी ५ जणांनि रायगडला जायच ठरवलं मी, ओम्या, निल्या, चेतन, आणि आषिश... तसा रायगड काहि फारसा आमच्या घरापासुन लांब नाहि... चालत गेल्यास १० कि.मी (डोंगर चढुन) आणि रस्त्याने ४० कि.मी (वाहनाने), म्हणुन चालत जायच ठरवलं (घरी न सांगता) आदल्या दिवशि तयारि म्हणुन ४ ग्लुकॉन-डि चे पुडे घेतले. आदल्या रात्री बर्फाच्या कपाटात ४ पाण्याच्या बाटल्या टाकल्या.
लवकर उठुन सकाळि ४.३० ला घर सोडलं , सोबत एक सॅक त्यात ग्लुकॉन-डि चे पुडे , पाण्याच्या चिल्ड बाटल्या, बॅटरी आणि प्रथोमपचार पेटि बास... अजून तेव्हा आंधारच होता. सर्व मंडळि जमल्यावर ५ ला डोंगराचि उभि चढाई सुरू केली. कश्मिर मधे जवान जसे चालतात तसे (खांद्यावर सॅका घेउन )एका लाईनित आम्हि सगळे डोंगर चढत होतो. सगळेजण म्युटच बटण दाबल्ल्यासारखे शांत होतो. कारण डोंगरात अंधार असेपर्यंत तरी जनावरांची भिति राहते म्हणुन, आम्हि त्यांचि चाहुल घेत आणि आमचि चाहुल त्यांना लागु न देता चालत होतो .. सकाळि लवकर उठुन शी करायला आलेल्या पक्षांचा किलबीलाट एकु यायला लागला. आणि पुर्वेला सुर्य देवतेचि वर्दि घेवुन आलेले बरेच रंग क्षितिजावर चमकु लागले.
तसा ओम्या जोरात ओरडला "डुक्कर..."आणि सुटला पळत आम्हि आलेल्या दिशेने परत, खरोखर आहे कि नाहि पाहण्या आगोदर मागचे चार जणहि भेटेल त्या झाडावर चढले.. काय कळायच्या आत समोर ४०-४५ फुटावरुन २५-३० रानडुकरांचा एक कळप धाडधाड करत सुसाट पळत गेला... सगळे जण झाडावर स्तब्ध, सकाळच्या गारव्यातपण सगळे जण घामानी ओले झाले होते. जरावेळानि सगळ्यांनि एकमेकाकडे पाहिल आणि एकमेकांचि हालत पाहुण हासायला यायला लागल.. २ मिनटात आले सगळे खाली आणि ओंकारला हाका मारु लागले.. तसा जवळच्या झुडपातनं आवाज आला " मी नाय येत जा तुम्हि.. " ,"मग आंडि घाल ४-५ आम्हि येइपर्यंत.." चेतन. तसा तो (पुरुष) चवताळुन आला बाहेर "साल्यांनो मला पुढे केलं आणि येताय मागणं खुशाल चालत, दिलि आसति एखाद्या डुकरान धडक तर महिनाभर हागायचे वांदे झाले आसते "(आमचा हाशा). काढलि त्याचि समजुत गोड बोलुन आणि घेतला परत सोबत बाबाला. चालत पुढे जिथुन डुक्कर गेले तिथ आलो, एकदा विरुद्ध बाजुला बघितल, मागे एखादा राहिला नाहि ना (डुक्कर)? नाहितर महिनाभर वांदे. एक एक घोट पानी पिउन परत लेफ्ट राइट सुरु केल.
आता सुर्य डोंगरा आडुन डोकवत होता.. जणु विचारत होता.. कुठं ?? कुठं माहित होत पण.. कसं(?)कोणालाच माहित नव्हत... जोपर्यंत ऊन कमी आहे तोपर्यंत सगळ्यांना जोरात चालायला सांगितल, सर्वांचे शर्ट आंगावरुन कमरेवर गेले.. करवंदिच्या झुडपातुन वाट काढताना आक्षरशः वाट लागत होति.. आताशि ७.३० झाले होते, पण आद्रतेमुळे घामानि सगळेजण भिजुन गेले होते.. आता सगळ्यांनि एकमतानी विश्रांति घेण्याचा निर्णय घेतला...
(पहिलाच प्रयत्न क्रुपया चुका लक्षात आणुन देणे. शुध्द्लेखनाच्या सोडुन!!)
प्रतिक्रिया
4 Jun 2008 - 3:14 am | शितल
चा॑गले झाले आहे लिखाण अजुन विश्रा॑ती न॑तर पुढील वाटचाल काय ते कधी कळणार. (पुढील लिखाण केव्हा चढवणार)
5 Jun 2008 - 12:35 am | मयुरयेलपले
शितल ताई धन्यवाद...
5 Jun 2008 - 12:12 pm | पक्या
चांगला आहे प्रयत्न. अजून पुढचेही येऊ द्यात लकवर.
5 Jun 2008 - 5:52 pm | ध्रुव
--
ध्रुव
5 Jun 2008 - 6:29 pm | स्वाती राजेश
सहल मस्त चालू आहे, पुढील भाग लवकरच टाका....
डुक्करांची गंमत छान.....:) ऍक्च्युली गंमत तुमची झाली पण वर्णन छान केले आहे...
पहिलाच प्रयत्न छान आहे..
5 Jun 2008 - 6:46 pm | आनंदयात्री
>>सकाळि लवकर उठुन शी करायला आलेल्या पक्षांचा किलबीलाट एकु यायला लागला
=)) =)) =))
पक्षीनिरिक्षणाच्या हजार तर्हा .. असो !
6 Jun 2008 - 8:24 am | फटू
मस्त लिहिलंय... पुढच्या भागाची वाट पाह्तोय...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
7 Jun 2008 - 6:00 pm | मयुरयेलपले
पक्या, ध्रुव , स्वाती राजेश, आनंदयात्री ,पुन्हा सतिश गावडे यांचे आभार..... लोड शेडिंग आहे थोडा धिर धरा
आपला मयुर
11 Jun 2008 - 4:25 pm | धमाल मुलगा
अरे मयुर, तू पण आमच्याच पंथातलाच दिसतोयस की :)
मस्तच.....
च्यामारी...=))
अग्गायायायायायाया......च्यायला, फाटायचीच बाकी राहिली असेल नाही का रे?
बाकी, असले पक्के नमुने प्रत्येक ट्रेकच्या ग्रुपमधे असलेच पाहिजेत असा अलिखित नियम वगैरे आहे की काय कळत नाही :)
जब्बरा रे...
पुढचा भाग कधी?
- (मावळ खोर्यातला भटक्या) ध मा ल कातकरी!
11 Jun 2008 - 5:22 pm | राजे (not verified)
असले पक्के नमुने प्रत्येक ट्रेकच्या ग्रुपमधे असलेच पाहिजेत असा अलिखित नियम वगैरे आहे की काय कळत नाही
१००% सहमत.
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगा... ;)